सध्या देशात पेट्रोलचे भाव दिवसे दिवस वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत ३९ पैशांची तर डिझेलच्या दरात ४७ पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरुच असल्याने महागाईचा आगडोंब उसळणार आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. पण या गोष्टी मध्ये देशात सर्वात महागडे पेट्रोल हे महाराष्ट्रातील या शहरात मिळत आहे.
जगात जर्मनी भारतात परभणी अशी ओळख असणाऱ्या परभणी मध्ये देशात सर्वात महागडे पेट्रोल मिळत आहे. आज परभणी मध्ये पेट्रोल ९० रुपये लिटर झाले आहे. तर दुसऱ्या नंबर ला अमरावती चा नंबर लागतो आहे तिथे ८९.०३ हा भाव पेट्रोल चा झाला आहे तर तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर आणि औरंगाबाद यांचा नंबर लागतो आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याच्या कारणाने पेट्रोलच्या किमती भारतात वाढल्या आहेत. शेजारील राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तान मधील पेट्रोल च्या किमती मध्ये होतेय दिवसेंदिवस घसरण त्या ठिकाणी पेट्रोल ६३ रुपये लिटर आहे. ७० रुपये लिटर असणारे पेट्रोल इम्रान खान सत्तेवर आल्यापासून कमी होत गेले आहे. पण मोदीजी ने बहोत हुई मेहगाई कि मार म्हणत सत्ता मिळवली पण पेट्रोलच्या किमतीवर नियंत्रण ठेवले नाही.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरात हि आहे पेट्रोल डिझेल ची किंमत मुंबई – पेट्रोल – 87.77, डिझेल – 76.98 पुणे – पेट्रोल – 87.57, डिझेल – 75.60 ठाणे – पेट्रोल – डिझेल – नाशिक – पेट्रोल -88.15, डिझेल – 76.16 औरंगाबाद – पेट्रोल – 88.82, डिझेल – 78.04 नागपूर – पेट्रोल – 88.26, डिझेल – 77.50 कोल्हापूर – पेट्रोल – 87.95, डिझेल – 75.99 सोलापूर – पेट्रोल – 88.82, डिझेल – 77.60 अमरावती – पेट्रोल – 89.03, डिझेल – 78.27 सिंधुदुर्ग – पेट्रोल – 88.69, डिझेल – 76.70 अहमदनगर – पेट्रोल – 87.62 डिझेल – 75.66
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…