देशात एकीकडे पेट्रोल चे दर गगनाला भिडलेले असताना. दुसरी कडे एका गावात लोकांना पाण्या च्या नळाद्वारे पेट्रोल येत आहे. तुम्हाला हि बातमी खोटी वाटत असेल पण हि बातमी खरी आहे. आता हे पेट्रोल नळाने येते तर लोकांना आनंद झाला असेल असे तुम्हाला वाटत असेल पण गावकरी खुश नाही झाले त्यांना नळाला शुद्ध पाणी हवे आहे. सध्या सारा गाव पाण्यासाठी परीशान झाला आहे. आणि हि घटना कुठे दूरच्या ठिकाणची नाही तर आपल्या जवळील पुणे जिल्ह्यातील आहे.
डुडुळगावातील रहिवाशांच्या घरातील नळातून अचानक पेट्रोल यायला लागल्याची चर्चा सुरू झाली. बोअरिंगच्या नळातून हे पेट्रोलमिश्रित पाणी यायला लागल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मोशी-आळंदी रस्त्यावरील डुडुळगावातील तळेकर नगरमध्ये हा प्रकार घडला असून तो कसा घडला याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काहींचं म्हणणं असं आहे की पेट्रोल जमा करून ठेवण्याच्या टाकीला गळती लागली असावी आणि हे पेट्रोल बोअरिंगच्या पाण्यात मिसळलं असावं त्यामुळे पेट्रोल मिश्रित पाणी येत असावे.
सध्या या प्रकारामुळे आजुबाजुच्या गावात या घटनेची उलट सुलट चर्चा होत आहे. एवढे पेट्रोल महाग झाले असून हि पेट्रोल बोरिंग च्या पाण्याच्या नळाला येत असल्याने सर्वत्र अप्रूप वाटत आहे. पण या पाण्यात पेट्रोल चे प्रमाण अत्यल्प असल्याने हे पाणी मिश्रित असणाऱ्या पेट्रोल चा कोणाला वापर हि करता येत नाहीय. काही तरुण या पाण्यापासून पेट्रोल वेगळे करायचे प्रयोग सुद्धा करून पाहत आहे. त्यामुळे या प्रकाराने गावातील माहोल एकदम बदलून गेला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…