आपण सर्वाना माहितीच आहे की नीता अंबानी या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. परंतु हे खूप कमी लोकांना माहिती असेल की त्यांचे आणि मुकेश यांचे लग्न झाले त्यावेळेस त्या फक्त ८०० रुपये महिना असलेली नोकरी करत होत्या. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सर्वात श्रीमंत भारतीय असलेले मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या लग्नानंतर सुद्धा शिक्षक म्हणून नोकरी करत होत्या. आज आपणखासरेवर जाणून घेणार आहोत नीता अंबानी यांच्याविषयी माहिती नसलेल्या गोष्टी-
नीता या सर्वात श्रीमंत परिवाराची सून असूनसुद्धा एका शाळेत नोकरी करायच्या. नुकतीच त्यांना सरकारकडून वाय श्रेणी ची सुरक्षा भेटली आहे. नीता अंबानी यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. खूप कमी जणांना माहिती असेल की नीता यांनी लग्नासाठी मुकेश यांच्या समोर एक अट घातली होती.
ती अट होती की लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांना नोकरी करण्यापासून अडवण्यात नाही येणार. लग्नाच्या आधीपासूनच नीता यांना लहान मुलांना शिकवण्याचा खूप छंद होता. नीता यांनी लग्नानंतर मुलांना शिकवण्याची अट मुकेश यांच्यासमोर ठेवली होती. यावर मुकेश हे तयार झाले आणि त्यांनी नीता याना शिकवण्याची परवानगी दिली. त्याने एका मुलाखतीमध्ये आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना ही माहिती दिली.
अधिक माहिती साठी खाली दिलेला व्हिडीओ अवश्य बघा-
नीता यांनी सांगितले की ज्या शाळेत त्या शिकवत होत्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला सुद्धा माहिती नव्हते की त्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. नीता यांनी एका मुलाखतीत एक मजेदार किस्सा सांगितला, त्या म्हणाल्या १९८७ च्या वर्ल्डकप वेळी एका विद्यार्थ्यांच्या वडिलांनी त्यांना मॅचचे २ तिकीट आणून दिले, परंतु नीता अंबानी यांनी ते घेण्यास नाकारले.
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वर्ल्डकपचे स्पॉन्सर रिलायन्स होते. नीता अंबानी मॅच बघण्यासाठी प्रेसिडेंट बॉक्स मधील व्हीआयपी जागेवर बसलेल्या होत्या. तिथे त्या मुलाच्या वडिलांनी त्यांना पाहिले व ते हैराण झाले. त्यांनी त्यांना विचारले की तुम्ही इथे कशा? तेव्हा त्यांना कळले की त्या भारतातील सर्वात श्रीमंत परिवारातील सून असून त्या तिथे शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अंबानी, बच्चन व तेंडुलकरच्या घरी जाते हिच्या हायटेक डेअरीतील दूध…