Saturday, January 28, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

…पण राम कदम चुकीला माफी नाही ! एका बापाचं राम कदमांना पत्र

khaasre by khaasre
September 6, 2018
in बातम्या
0
…पण राम कदम चुकीला माफी नाही ! एका बापाचं राम कदमांना पत्र

तुमचं वक्तव्य ऐकल्यानंतर वारंवार मनात विचार येतोय की “काछ, राम कदमांना एक मुलगी असती…. मी स्वत:राम कदमांना सांगितलं असतं

“मला तुमची मुलगी आवडते”!!…

हे ऐकूण राम कदमांची काय अवस्था झाली असती? कदमांनी तिला पळवण्यात मदत केली असती का? कुठला बाप हे कृत्य करेल का? आपली मुलगी कोणासोबत तरी फिरतेय, हे जेव्हा एका बापाला कळतं ना, तेव्हा बापाच्या पायाखालची वाळू कशी सरकते, याची जाणीव तुम्हाला होणार नाही. त्याच्यासाठी एका मुलीचा बाप असणं गरजेचं असते.

मला वाटतं तुम्ही आमदार जरी असलात तरी बाप होण्यासाठी लागणारी गुणवत्ता तुमच्याकडे नाहीय, हे तुम्ही केलेल्या वक्तव्यातून दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीचा बाप तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आज कित्येक घरांत मुलगी पळून गेल्याची घटना घडलेली आहे. पळून गेलेल्या मुलीचा बाप, आई, भाऊ कसं जगतात हे एकदा जाऊन पहा, मगच आपण काय वक्तव्य केलंय याचा विचार करा. एखादीची बहिण पळून गेल्यामुळे दुस-या बहिणीकडे देखील त्याच नजरेनं पाहिलं जातं, किती त्रास होतो, त्या बहिणीला आधी विचारा मगच पोरी पळवायची भाषा करा.

आज ज्या धरातली मुलगी पळून गेलीय त्या घरात राम कदम तुम्ही जाऊन या, त्या हतबल बापाचा हातात हात घेऊन विचारा खरंच मी चुकीचं वक्तव्य केलंय का? हातात घेतलेला हात कदमांवर उचलल्याशिवाय राहणार नाही. आज असे किती तरी बाप आहेत, ज्यांनी तळहातावर जपलेल्या पोरींला गमवल्यानं उध्वस्त झाले आहेत. आपली पोरगी पळून गेली हे ऐकून किती तरी बापांना हार्ट अटैक आले आहेत, कोणाला पॅरालायसिस झाला आहे तर, कुठल्या बापाचं मन कायमचं सुन्न झालं आहे. आयुष्यात पोलिस स्टेशनशी कधीच संबंध आला नाही अशा बापाला जेव्हा पोरगी पळून गेल्यावर पोलिस स्टेशनला जावं लागतं ना, कदम….जाऊन विचारा त्या बापाला, काय अवस्थ होते ती !! आई ढसाढसा रडत असते, बाप कोमात गेल्यासारखा उभा असतो तुमच्या सारखे पोरीला पळवून आणणारे मात्र त्या आई बापाची हाय घेत असतात कारण कोणाच्या सुखासाठी कोणाला तरी तुम्ही दुःखी करत असता एकीकडे इतरांच्या आई बापाला तीर्थ क्षे्त्राला पाठवण्याचं काम तुम्ही करता, दुसरीकडे त्याच आई बापाच्या पोरींना पळवायची भाषा करता? कुठे फेडाल ही पापं? पण लक्षात घ्या आजच्या युगात जे कर्म करतो ते इकडेच फेडावे लागतात. माफ करा तुम्ही हभप आहात तुम्हाला मी काय प्रवचन देणार पण तुम्ही डॅशिंग आणि दयवानही आहात त्यामुळे लोकांच्या पोरी उचलायची ताकद तुमच्यात आहे असं तुम्ही समजता पण आजकालच्या पोरी डेन्जर आहेत त्याच्या नादाला लागू नका. त्याच्या अंगाला काय, केसाला जरी धक्का लागला तर माझ्यासारखे हजारो, लाखो बाप तुमच्या समोर उभे राहतील.

प्रत्येक बापासाठी मुलगी कितीही मोठी झाली तरी छकुलीच असते. लग्नात अक्षता टाकताना मुलीच्या सुखासाठी अश्रू लपवतो ना तो असतो बाप रात्री कितीही उशीर झाला तरी निवांत झोपलेल्या पोरीला बघून सुखावतो ना त असतो बाप आणि तुम्ही आमच्या छकुलीला पळवायची भाषा करता. तुमच्या तोंडून ही भाषा शोभत नाही.

एक लक्षात ठेवा!! हा महाराष्ट्र कुठल्या राजकीय गुंडांचा नाहीय. हा महाराष्ट्र आमच्या छ्त्रपतीं शिवाजी महाराजांचा आहे. जिकडे प्रत्येक महिला सुरक्षितच असायला हवी, हा महाराष्ट्र आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे कारण संविधानमुळे ती स्वत:ला सुरक्षित समजते, हा महाराष्ट्र आमच्या फुलेंचा आहे कारण प्रत्येक महिलेला साक्षर होण्याचा अधिकार आहे, हा महाराष्ट्र आपल्या तमाम माता भगिंनींचा आहे ज्यांना स्वतंत्र जगण्याचा, विचार करण्याचा अधिकार आहे. या रणरागिनी आहेत कदम यांच्या युवतींचा नादलागू नका. या तरूणींनी जर दुर्गेचं रुप धारण केलं तर तुमचं राम नावतले शब्द उलटे होतील, काय होईल मग “मरा”च.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज म्हंटलं की संचारतं असं ऐकलंय म्हणजे जेवढ्या जोरात “जय” बोलता येईल तेवढं जोरात ते “जय” बोलतात. महाराष्ट्रात याच छ्त्रपतींचं नाव घेऊन सत्तेवर आला आहात जरा खरंच आपण छत्रपतींना मानत असाल तर दुखावलेल्या माता-भगिनींना उत्तर द्या. कधी दानवे, तर कधी छिंदम तर कधी परिचारिक मुख्यमंत्री महोदय काय चाललंय काय? तुमच्या राज्यात? महाराष्ट्रातल्या जनतेनं किती सोसायचं? कारवाई होणार की नाही? कदमांनाही क्लिन चिट दिली नाही म्हणजे झालं. पण आता तुमच्या क्लिन चीटची वाट कोण बघत नाहीय निवडणुका जवळ आल्या आहेत कोणाला क्लिन बोल्ड करायचं हे जनता ठरवेल.

…..पण राम कदम चुकीला माफी नाही !!

वैभव परब, पत्रकार
09870993080

अधिक वाचा- आमदार राम कदम यांना मराठा मुलीचे ओपन चॅलेंज, बघा व्हिडीओ..

Loading...
Previous Post

पुण्यात जॅग्वार कार घेतल्याच्या आनंदात वाटले सोन्याचे पेढे… एवढ्या किमतीला सोन्याचा पेढा

Next Post

पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य…

Next Post
पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य…

पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In