पुणे तिथे काय उणे म्हटले जाते याच पुण्यात काही आगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला ऐकायला नेहमी मिळतात.. कधी गोल्डन मॅन साठी तर कधी सोन्याचे शर्ट इत्यादी साठी आपल्याला हटके गोष्टी ऐकायला मिळतात. आता सोन्याची पेढे पुण्यात कोणी वाटली असे म्हटले तर आपला विश्वास बसेल का ?? नाही बसणार पण हे खरे आहे कि पुणे मध्ये आता सोन्याचे पेढे सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आणि ती वाटण्यात पण आली..
तर धायरी गावाचे सुरेश रामनाथ पोकळे या व्यक्तीने जग्वार एक्स एफ हि महागडी कार घेतली. एवढी महागडी कार घेतली तर तिचे सेलेब्रेशन देखील एकदम शाही व्हावे अशी त्यांची इच्छा होती. साधे पेढे कोणीही वाटते आपण लोकांना सोन्याची पेढे द्यावीत अशी त्यांनी कल्पना मांडली. व हि कल्पना त्यांनी काका हलवाई कडे बोलून दाखवली. त्यांनीहि याला होकार दिला आणि सोनेरीवर्ख असलेली पेढे बनवली आणि पोकळे कुटुंबियांना दिली.
सुरेश रामनाथ पोकळे यांचा वडिलपार्जीत शेतीचा व्यवसाय होता अत्यंत हलाखीच्या परिस्थिती मधून त्यांनी वाटचाल करून आज परिसरात नावलौकिक कमावला आहे. त्यांनी लोकांना काहीतरी खास देण्याच्या इच्छेतून सोन्याची पेढे बनवून घेऊन आपल्या आप्तस्वकीयांना वाटण्याची कल्पना मांडली होती.
या पेढ्यांची किंमत किती असेल असा अनेकांना प्रश्न पडला तर आम्ही आपल्यासाठी या पेढ्यांची किंमत घेऊन आलो ७ हजार किलो दराने काका हलवाई यांनी हि पेढे बनवून दिले आहेत. पोकळे कुटुंबियांना दिलेल्या पिढ्यात ड्रायफ्रूट केसर वरून सोनेरीवर्ख असे दिले त्यांनी किती पेढे वाटले याबद्दल माहिती भेटली नाही.
पण त्यांच्या सोनेरी पेढ्याची पुण्यात चर्चा मात्र रंगली. आणि पुण्यातील हा सोनेरी पेढ्याचा हटके प्रयोग सामोरे आला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…