सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे त्यात एक व्यक्ती सिगारेट ने रॉकेट सोडत आहे. त्या व्यक्तींच्या चपळाई ने उडवल्या जाणाऱ्या रॉकेटमुळे सर्वत्र याच व्हिडीओ ची चर्चा होत आहे. स्पायडरमॅन पण या व्यक्तीसमोर काहीच वाटणार नाही एवढी या व्यक्तीने ११ सेकंड मध्ये १९ रॉकेट उडवून एकदम हवा तयार केली. त्यांच्या व्हिडीओ मुळे सध्या त्यांच्या बद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. तर पाहूया त्या व्यक्तीचा व्हिडीओ नंतर त्यांच्या बद्दल ची माहिती
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर होत आहे. असे कोणते माध्यम राहिले नाही कि या सिगारेटने व्हिडीओ सोडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ तिकडे वायरल झाला नाही.. ट्विटर वर या व्यक्तीच्या व्हिडिओला मारिओ नावाच्या अकाउंट वरून टाकल्यानंतर त्या व्हिडीओ ला तब्बल २९ हजाराहून अधिक शेअर आल्या आहेत. तर फेसबुक वर हि हजारो लाखो लाईक शेअर मिळत आहेत. या व्हिडीओ मध्ये सिगारेट पिऊन रॉकेट पेटवले जात असली तरी आरोग्यासाठी सिगारेट हि अपायकारक असते तर व्हिडीओ मधील व्यक्तीची कॉपी करू नये. असे आम्ही आवाहन करत आहोत.
सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न पडला आहे कि हि व्यक्ती कोण आहे आणि का एवढे रॉकेट आकाशात सोडत होती. तर आम्ही आपल्या करीत त्या व्यक्तींची माहिती आणली आहे. या व्यक्तीचे नाव मल्ला संजीव राव हे आहे. हे आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम या जिल्ह्यातील पीसीनकाडा या गावातील रहिवासी आहेत. मल्ला संजीव राव यांचे त्यांच्या गावी फटाक्यांचे दुकान आहे व सोबत शेती पण ते करत असतात.
बघा व्हिडीओ-
त्यांच्या गावी वाईएसआर काँग्रेस चे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी आले असताना त्यांच्या स्वागताला मल्ला संजीव राव यांनी या अनोख्या पद्धतीने रॉकेट उडवले आणि तेव्हा त्यांचा हा व्हिडीओ काढण्यात आला आज त्यांना त्या व्हिडीओ ने प्रचंड प्रसिद्धी दिली आहे. त्यांनी सर्वाना आवाहन केले आहे कि त्यांची कॉपी करायचा प्रयत्न करू नये अन्यथा अपघात होऊ शकतो. त्यांना या गोष्टीबद्दल पुरेपूर माहिती असल्याने ते सिगारेट ने रॉकेट पेटवू शकले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…