मोदी सरकार आल्यानंतर अनेक महत्वपूर्ण बदल भारतीय रेल्वे मध्ये झालेले आपल्याला दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जर तुम्ही काही तुमची समस्या मांडली तर त्यावर तुम्हाला रेल्वेकडून उत्तरही मिळत आहे. रेल्वे जेवढा सोशल मीडिया चांगल्या गोष्टीसाठी वापरत आहे, तेवढाच सोशल मीडियाचा वापर रेल्वेचा अपप्रचार करण्यासाठी आणि खोटी माहिती पसरवण्यासाठी देखील केला जात आहे.सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो वायरल झाला असून त्यामध्ये रेल्वेचा एक डब्बा अर्थवट छत असलेला आहे. या डब्यामध्ये एक पण सीट देखील नाहीये. ज्यामध्ये काही लोक उभा असलेले दिसत आहेत.
या फोटोसोबत जो मेसेज वायरल झालाय त्यामध्ये लिहिण्यात आलंय कि ‘लोकल ट्रेनो मे AC की सुविधा देकर मोदीजी ने विपक्ष के मुँह पर मार तमाचा और कहा ये होता है विकास ???’. हा मेसेज सोशल मीडियावर खूप वायरल झालाय. प्रियांका गांधी यांच्या नावाने असलेल्या एका पेजवर तर याला १३ हजार लोकांनी शेअर केले आहे.
काय आहे या फोटोची सत्यता?
कमेंट मध्ये अनेकांनी हा फोटो एडिट केलेला फेक असल्याचे सांगितले. पण हा फोटो फेक नाहीये. स्टेशनचं नाव बघितलं तर ते कहलगाव स्टेशन असल्याचे समोर आले. कहलगाव हे बिहारच्या भागलपुर मध्ये आहे. तेथील पत्रकारांच्या मते कहलगाव पासून ९० किमी अंतरावर आशियातील सर्वात मोठा रेल्वे कारखाना आहे. तिथे दुरुस्तीसाठी रेल्वे जात असताना कोणी फोटो काढला असेल.
कहलगाव स्टेशन प्रभारी यांच्या मते हा डब्बा अश्याप्रकारे खास डिझाईन करून घेण्यात आलेला आहे. या डब्यात वरून सामान टाकता यावे यासाठी असा डिझाईन करण्यात आला आहे. हा डब्बा खासकरून रेल्वेच्या चाकांची वाहतूक करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये लोकांना बसण्यास परवानगी नाहीये, पण कधी कधी प्रवासी यामध्ये चढतात. मालगाडीच्या चाकांची वाहतूक महाग पडते त्यामुळे हा डब्बा वापरला जातो.
यामधुन हा फोटो खरा असून हि रेल्वेची दैना नसून हा डब्बा तशाप्रकारे डिझाईन करण्यात आल्याचे दिसते. फोटोसोबत जो मेसेज वायरल झाला आहे तो मात्र खोटा आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…