इंटरनेट वर चांगल्या गोष्टी सोबत वाईट गोष्टी सुद्धा प्रसारित होत असतात. इंटरनेट वर काय वायरल करावे यासंबंधी कोणतेही बंधन नसल्याने कोणीही काहीही गोष्टी अपलोड करून वायरल करते. आता एक अशीच गोष्ट फेसबुक आणि ट्विटर वर वायरल होत आहे ज्या गोष्टीला देशातील प्रतिष्ठित म्हणवणारे लोक हि फॉरवर्ड करत आहेत. तर नागा साधूला मारहाण झाल्याचा व्हिडीओ त्या सोबत हिंदी मध्ये हा मेसेंज “ये देहरादून है जो एक नागा साधु को बुरी तरीक़े मार रहा है, इसी उत्तराखंड को देवों ओर ऋषि मुनियो की धरती कहते है ,क्या देखकर तुम्हें अभी भी बकाई में साधु मुनि की धरती लगती है?
इन सूअरों को सजा मिलनी चाहिए यह कौन है और क्यों नागा बाबा साधुओं को इस तरह से मारा जा रहा है?
जिन भोले भाले देवे भूमि के लोगों के लिए उत्तराखंड का सपना देखा गया था वो ज़िन्दगी भर प्रवास करते रहेंगे । जय श्री राम,,,जय हिन्द” वायरल केल्या गेला.
या मेसेंज ला मोठमोठ्या पत्रकार आणि सन्मानित व्यक्तीने हि फॉरवर्ड केले आहे. या व्हिडीओ चे वायरल सत्य तपासले असता असे समजून आले आहे कि हा व्हिडीओ देहरादून येथील पटेल नगर येथील आहे. २४ ऑगस्ट रोजीची घटना आहे. एक नागा साधूचा वेष धारण करून भीक मागत होता. एका घरी हा साधू गेल्यावर त्या घरातील शुभम या मुलाने आपल्या बहिणीला सांगितले कि या साधूला अन्न व पैसे दे .. ती मुलगी त्या साधूला अन्न व पैसे देत असताना त्या साधूने अत्यंत अभद्र व्यवहार केला विनयभंग करायचा प्रयत्न केला. त्यामुलीने हि आरडाओरड केल्यावर त्या मुलीचा भाऊ आणि त्यांच्या गल्ली मधील लोक जमा झाले त्यांनी त्या ढोंगी साधूला पकडून मारहाण केली. हा साधू पूर्ण दारूच्या नशेत होता. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यात साधूला मारहाण करणारे कोणीही मुस्लिम वैगेरे नव्हते तर ते हिंदूच होते. आपल्या बहिणीचा विनयभंग करायचा प्रयत्न केला म्हणून राग कोणत्याही भावाला असणार तर तो मारहाण करणारच. तर तेव्हा त्या साधूला मारहाण झाली व नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पण वायरल व्हिडीओ मध्ये मुस्लिम मारहाण करत आहेत अशी माहिती देण्यात आली होती.
कोण आहे तो साधू या बाबत माहिती घेण्यात आली तर त्या नागा साधूचा वेष घालणाऱ्या व्यक्तीचे नाव सुनील नाथ होते त्याच्या कडे एक डायरी मिळाली त्यात त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर मिळाला संपर्क केला असता तिने तो आपला नवरा असल्याचे मान्य केले व नागा साधूचा वेष घालून तो भीक मागण्याचा धंदा असल्याचे हि सांगितले. तसेच त्यांना ६ मुले असल्याची माहिती तिने दिली. तर कोणत्या नागा साधूला ६ लेकरे बायको असेल?? त्यामुळे वायरल होणारा व्हिडीओ हा चुकीचा आहे त्यातून समाजात एक द्वेषाचे वातावरण तयार होते. देहरादून येथील पोलिसांनी हि हा व्हिडीओ मुस्लिम विरुद्ध नागा साधू असा नसल्याचे सांगितले आहे. आणि असा व्हिडीओ वायरल करणाऱ्या विरुद्ध सायबर गुन्हे दाखल करू असे म्हटले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…