क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्र्यांची अनेक प्रकरणे आपण पाहिली आहेत. अनेक अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटर सोबत लग्न केल्याचे अनेक उदाहरणे हि आहेत. पण सध्या मात्र एका अभिनेत्रीने आपल्या पेक्षा २० वर्षांनी मोठ्या असणाऱ्या एका क्रिकेटरच्या रिलेशनशिप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्या गोष्टीमुळे खळबळ उडाली आहे.
इंडियन क्रिकेट टीमचे कोच रवी शास्त्री आणि ‘एअरलिफ्ट’ची अभिनेत्री निमरत कौर यांच्यात नाते तयार झाले आहे, मिररने दिलेल्या बातमीनुसार , गेल्या दोन वर्षांपासून रवी शास्त्री आणि निमरत कौर कथितरित्या एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या दोन वर्षांत दोघांनीही याची या कानाची त्या कानाला खबर होऊ दिली नव्हती. पण आता ही बातमी उघड झाली आहे. आत्तापर्यंत दोघेही सार्वजनिक जीवनात फारसे एकत्र दिसले नाहीत. अर्थात २०१५ पासून अनेकदा ही जोडी एका जर्मन कारच्या लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली आहे. येथूनचं दोघांची लव्हस्टोरी लॉन्च झाली आहे.
रवी शास्त्री यांनी 1990 मध्ये रितू सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र 22 वर्षांनी म्हणजेच 2012 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. रवी शास्त्री आणि रितू सिंह यांच्यात अनेक काळापासून वाद सुरु होते. त्यानंतर दोघांनी संसार मोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांना अलका नावाची एक मुलगी आहे. रवी शास्त्री यांचे संबंध अमृता सिंह या अभिनेत्रीशी सोबत असल्याची चर्चा होती पण त्या काळात त्यांचे नाते पुढे गेले नाही. रवी शास्त्री आता एका लहानवयाच्या अभिनेत्री सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाले आहे. यांचे नाते पुढे कोणत्या स्टेजला जाईल हे येणारा काळच सांगेल..
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…