अनेकांना घरी शेती करावी वाटते परंतु जागेचा अभाव आणि मातीचा अभाव या सर्वावर उपाय म्हणजे हायड्रोपोनिक शेती आहे म्हणजेच मातीविरहीत शेती आज खासरे वर बघूया कशी करता येईल हि शेती घरी, या शेतीमध्ये माती ऐवजी फक्त पाण्याचा उपयोग केल्या जातो. आणि फक्त पाण्यावर आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने झाडे हि चांगल्या प्रकारे वाढतात. झाडाला आवश्यक असलेली मूलद्रव्य बाहेरून पुरविली जातात. या पद्धतीत वापरले जाणारे पाणी परत वापरात आणल्या जाते हि एक या पद्धतीची जमेची बाजू आहे. आज अनेक लोकांनी या पद्धतीचा वापर करून करोडोने उत्पन्न घेतलेले आहे या बाबत आम्ही खासरे वर मागेही लेख लिहिला होता. शहरीकरणा मुळे जमिनी कमी होत आहे त्यामुळे हि पद्धती एक सुवर्ण संधी म्हणून उपलब्ध झाली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…