बॉलीवूड मध्ये येण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असते. अन त्या स्वप्नाचे बादशाह आहेत अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन ज्यांना पूर्ण जग युगाचे महानायक म्हणून ओळखते. या वयातही त्यांच्या अभिनयाचे सर्वच जण चाहते आहेत. सिनेमांसोबत ते अनेक सामाजिक कार्याशी सुद्धा जोडले गेले सोबतच त्यांची जगात पण चांगली प्रतिमा आहे. बिग बी यांची जेवढी प्रतिमा आहे तेवढेच त्यांचे वजनही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की या महानायकाने सुद्धा आयुष्यात अशा काही चूका केल्या आहेत ज्यांना परत करण्याविषयी ते विचारही करू इच्छित नाहीत. आज आपण अमिताभ यांच्या जीवनातील अशाच चुका बघणार आहोत ज्या त्यांच्या चाहत्यांना माहिती असायला हव्यात.
1. राजकारणात प्रवेश होती सर्वात मोठी चूक-
राजकारणात प्रवेश ही अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती जी स्वतः अमिताभ बच्चन सुद्धा मान्य करतात. अमिताभ हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून राजकारणात आले होते. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी विरोधी नेत्यांच्या विरोधात उभे करण्यासाठी तगडे उमेदवार हवे होते. अलाहाबाद येथून हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात अमिताभ बच्चन यांना उत्तरावण्यात आले. अमिताभ यांनी प्रचंड मतांनी बहुगुणा यांच्यावर विजय मिळवला.
पण सिनेमातील करिअरकडे त्यांचं जास्त लक्ष असल्याने विरोधक याचा फायदा उचलू लागले. त्यादरम्यान त्यांचे बरेच हिट सिनेमे येऊन गेले. राजकारणापासून दूर जात असलेल्या अमिताभ यांच्या या गोष्टीचा फायदा घेत विरोधकांनी त्यांचे नाव बोफोर्स, फेअरफेक्स आणि पनडुब्बी घोटाळ्यात गोवले. याच दबावात त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.
2. मिडियासोबत झालेला वाद-
अमिताभ बच्चन यांचे 1995 मध्ये मीडिया हाऊस सोबत अनेक वाद झाले होते. इथपर्यंत की बिग बी स्टारबस्टला बंद करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या कामात ते अयशस्वी राहिले.
3. बूम आणि निशब्द सारख्या बी-ग्रेड सिनेमात काम करणे-
आपल्या फिल्मी करिअर मध्ये या सिनेमात काम केल्याचा अमिताभ यांना पश्चाताप होतो. निशब्द या सिनेमात आपल्या पेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत प्रेम आणि बाकीच्या गोष्टी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आवडल्या नव्हत्या. तसेच बूम तर एवढी थर्ड ग्रेड आणि वल्गर सिनेमा होता की अमिताभ आजही त्यामधील दृश्य लज्जास्पद वाटतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…