देशाची सेवा करणाऱ्या सर्व सैनिकांना तुम्ही पाहिलेच असेल. सर्वांचा युनिफॉर्म सारखाच बघायला मिळतो. मग ते वेगवेगळ्या राज्यात कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांचे युनिफॉर्म तुम्ही बघू शकता. सर्व सुरक्षा यंत्रणांच्या सैनिकांचे केसही तुम्हाला सारखेच म्हणजे छोटे बघायला मिळतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्व सैनिकांचे केस छोटेच का असतात. सर्वच सैनिकांची कटिंग एकसारखीच का केली जाते. जर नाही माहिती तर आज आन जाणून घेऊया.
तरुण मुलं जेव्हा पण सैन्यात भरती होण्यासाठी जातात तर ते पूर्ण केसांसाहित भरती होतात. पण ट्रेनिंग ला गेले की त्यांचे केस पूर्ण बारीक कापले जातात. सर्वाना एकसमान छोटे केस ठेवण्यास सांगितले जाते. कोणत्याही भरतीच्या सेंटरला गेलात तर तुम्हाला सर्वांची हेअर स्टाईल एकसमान दिसेल. मग प्रश्न पडतो की सर्व सैनिकांचे केस छोटे का असतात. सैनिकांना कोणत्याही क्षणी युद्धासाठी जावे लागू शकते. अशा परिस्थितीत त्यांना जंगलात डोंगरदऱ्यात राहावे लागू शकते. त्यामुळे त्यांना डोक्यावर हेल्मेट आणि अनेक प्रकारचे सुरक्षाशी निगडित यंत्र घालावे लागतात. जर अशावेळी त्यांचे केस मोठे असतील तर त्यांना ते उपकरणं वापरण्यास अडचणी येऊ शकतात. सोबतच केस मोठे असल्याने गर्मी पण जास्त होते.
अनेकदा सैनिक जेव्हा निशाणा लावतात तेव्हा त्यांना शांती आणि स्थिर असणे आवश्यक आहे. अशावेळी जर थोडीशी हवा जरी आली तर केसांमुळे त्यांना अडथळा निर्माण होऊ शकतो. हवेने केस डोळ्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही व केसांच्या हालचालीमुळे निशाणा चुकू शकतो. त्यामुळे सैनिक केस बारीकच ठेवतात. याशिवाय अजून एक कारण म्हणजे आजकाल अनेक नवीन तंत्रज्ञानाच्या बंदूक आल्या आहेत. ज्यामध्ये एकसुद्धा केस अडकला तर बंदूक खराब होऊ शकते. यामुळे अधिकारी सुद्धा सैनिकांच्या केसांवर नजर ठेवतात.
सैनिकांना अनेक परिस्थितीचा सामना करावा लागतो. जसे की पाऊस, नदी नाले या सोबत. अशावेळी केस खूप कामी पडतात. छोटे केस लवकर सुखतात. ज्यामुळे भिजले तरी सर्दी ताप होण्याची शक्यता कमी होते. छोटे केस ठेवल्याने या धोक्यांपासून वाचू शकत असल्याने सैनिक नेहमी छोटे केस ठेवतात.
बऱ्याच वेळा सैनिकांना विशेष परिस्थितीमध्ये अनेक दिवस अंघोळ करण्यास नाही मिळत. ज्यामुळे त्यांच्या केसांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. इन्फेक्शन पासूम बचाव करण्यासाठी सुद्धा केस छोटे ठेवले जातात. शत्रूसोबत थेट सामना झाल्यास पण केसांमुळे अडचण निर्माण होऊ शकते. केस छोटे असण्याचे हे सर्व फायदे असल्याने सैनिकांचे केस आपल्याला एकसारखे म्हणजे छोटेच बघायला मिळतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…