मुंबई अंडरवर्ल्डची सुरवात या माणसापासून झाली होती. या अगोदर मुंबईचे वातावरण एवढे गढूळ नव्हते. हाजी मस्तान आला आणि मुंबईवर राज्य करून गेला. आजपर्यंत मुंबईवर अनेक लोकांनी राज्य केले परंतु हाजी मस्तानचे नाव नेहमी लक्षात राहणारे आहे. ‘कुली’, ‘दीवार’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ते काही वर्षापूर्वी येऊन गेलेला ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, या सर्व चित्रपटातील नायक एकाच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरून साकारण्यात आलेले आहे तो म्हणजे हाजी मस्तान मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला डॉन आज बघूया हैदर मस्तान मिर्झा उर्फ हाजी मस्तान विषयी काही खासरे माहिती..
मस्तान हैदर उर्फ हाजी मस्तानचा जन्म १ मार्च १९२६ मध्ये तामिळनाडूच्या कुड्डालोर जवळील पनईकुल्लम गावामध्ये झाला. अतिशय गरीब कुटुंबात हाजी मस्तान यांचा जन्म जाला होता. मस्तानचे वडील हैदर मिर्झा अत्यंतगरीब शेतकरी होते. गरीबीमुळे त्यांनी १९३४ मध्ये पोटपाण्याकरिता मुंबईची वाट धरली. हैदर कफरोडमध्ये सायकल दुरस्तीचे छोटे दुकान चालवत होते.
भारत छोडो आंदोलन त्याच्या जोशात होते तेव्हा हैदर मिर्झाची ओळख झाली गालिब शेख या व्यक्तीसोबत आणि याच व्यक्तीने त्याला ऑफर दिली तू कुळीचे काम करतो यात कपड्यामध्ये काही माल लपवून आनत चाल त्याचे हैदर मिर्झाला पैसे मिळत असे. त्यानंतर त्याची ओळख वाढत गेली आणि हाजी मस्तानने सुकुर नारायण बखियासोबत १९५६ मध्ये स्मगलिंगच्या धंद्यात प्रवेश केला. दोघांनी आपले भाग वाटूनही घेतले होते. मस्तान मुंबई पोर्टला सांभाळत होता. स्मगलिंगमध्ये त्याने खुप पैसा मिळविला. पांढरे शुभ्र कपडे, पांढरी मर्सिडीज बेंझ कार ही मस्तानची खास ओळख होती. असं म्हणतात की दिवार आणि कुली मध्ये अमिताभ बच्चनच्या बिल्ल्याचा नंबर ‘७८६’ हा खरं तर हाजी मस्तान याच्या बिल्ल्याचा नंबर होता.
डॉन म्हटल्यावर शौकतर येणारच तर हाजी मस्तानला होता शौक सिगारचा त्याही सध्या सिगर नाहीतर विदेशी सिगर महागड्या सिगार तो घेत असे. हाजी मस्तानने कधीही खून खराब केले नाही असे म्हटले जाते त्याने स्वतः कधीच कोणावर गोळी चालविली नाही. आणीबाणीच्या काळात त्याला तुरुंगात जावे लागले. त्याचे संबंध अनेक नेत्या सोबत आले होते. जनतेमधून त्याला भयंकर प्रतिसाद होता त्यामुळे तो कारागृहात चांगली हिंदी बोलायला शिकला आणि कारागृहातून बाहेर आल्यावर त्याने राजकीय इनिंग सुरु केली आणि १९८० मध्ये स्मगलिंगचा धंदा कायमचा बंद केला. त्याने दलित महिला सुरक्षा महासंघाची स्थापना केली होती. तसेच नशा विरोधी अभियानामध्ये सहभाग घेतला होता.
अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉंटेड गुन्हेगार दाऊद अब्राहिम कधीकाळी हाजी मस्तानसाठी काम करायचा. 1980 मध्ये हाजी मस्तानने हे क्षेत्र सोडल्यानंतर दाऊदने ते सांभाळले होते.मस्तानने पुर्वी चित्रपट निर्मिती करुन पाहिली. त्याला चित्रपटांमध्ये खुप रस होता. अभिनेत्री सोनासोबत विवाह केल्यानंतर त्याने काही चित्रपटांची निर्मिती केली.
मुंबई अंडरवर्ल्डचा राजा हाजी मस्तान ला बॉलीवूडसोबत चांगले संबध होते. त्यला मधुबाला खूप आवडत होती परंतु तिच्या सोबत लग्न करायचे त्याने ठरविले सुद्धा होते परंतु परिस्थतीत अभावी तिच्या सोबत लग्न झाली नाही त्यानंतर हाजी मस्तान याने सेम टू सेम मधुबाला सारख्या दिसणाऱ्या अभिनेत्री सोना यांच्या सोबत लग्न केले. हाजी मस्तानसोबत अभिनेता दिलीप कुमार, शशी कपूर, धर्मेंद्र, फिरोज खान, आणि अमिताभ यांच्या ओळखी होत्या. किंबहूना चांगला स्नेह होता. १९९४मध्ये हाजी मस्तानचे निधन झाले. परंतु बॉलिवूड त्याला विसरले नाही. त्याच्यावर अनेक चित्रपट निर्मिती झाली. त्यापैकी अमिताभचा कुली’, ‘दीवार’, ‘मुकद्दर का सिकंदर’, अजय देवगनचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटांचे नावे घेता येतील.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…