नेटफ्लिक्स वर जगभरात गाजत असलेली सिरीज म्हणून सॅक्रेड गेम्स ला सर्वजण ओळखतात. हि सिरीज अत्यंत लोकप्रिय झाली. जगभरातून सर्व प्रेक्षकांनी तिला आवडीने डोक्यावर घेतले. हि सिरीज विक्रम चंद्रा यांच्या sacred games या कादंबरी वरून बनवली आहे. २७ जुलै रोजी हि सिरीज नेटफ्लिक्स वर आली आणि तेव्हा पासून तिने सर्वाना भुरळ लावली. या वेबसिरीज चे ८ भाग प्रसारित झाले आहेत. या भागांना जी नावे दिली होती आणि एक वेगळ्या प्रकारचे चिन्ह वापरली हाती त्याबद्दल लोकांना उत्सुकता आहे. नेटफ्लिक्स च्या भागांना जी नावे दिली होती ती हिंदू पुराणातील असून त्या मागे एक अर्थ दडलेला आहे.तर चला पाहूया काय आहे त्या टायटल मागील अर्थ
१) पहिल्या भागाचे नाव आहे अश्वस्थामा असून अश्वस्थामा हा द्रोणाचार्य आणि क्रॅपीचा मुलगा असून त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या गळ्यातून घोड्यांचा आवाज निघाला म्हणून त्याचे नाव अश्वस्थामा असे ठेवण्यात आले होते. त्याच्या कपाळावर एक मणी होता त्या मणी मुळे त्याला कोणीही हरवू शकत नसे. त्याच्या वडिलांची हत्या केल्याने रागात अश्वस्थामा ने पांडवांची सर्व मुले रात्री जाऊन मारली त्यानंतर अभिमन्यूच्या विधवा पत्नीच्या गर्भावर त्याने ब्रम्ह अस्त्र चालवले पण कृष्णाने ते रोखले. पण ब्रम्ह हत्या पाप असल्याने त्याला सोडले नंतर अर्जुनाने अश्वस्थामा च्या कपाळातील मणी काढला व श्री कृष्णांनी त्याला शाप दिला कि तो असाच ६ हजार वर्ष भटकत राहील. अशी धारणा आहे कि तो अजूनही पृथ्वी वर आहे.
२) दुसऱ्या भागाचे नाव आहे हलाहल.. हलाहल म्हणजे समुद्र मंथनातून ज्या चौदा जी द्रव्य आली त्यापैकी पहिले म्हणजे हलाहल विष निघाले. हे विष अत्यंत विषारी होते आणि त्या विषामुळे भूतलावरील देव दानव जळत होते तेव्हा महादेवांनी ते विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले.
३) तिसऱ्या भागाचे नाव अतापी वातापी असे असून .. अतापी आणि वातापी हि दोन दैत्य होती. एका ऋषीला आपल्याला प्रचंड बलवान पुत्र द्यावे अशी मागणी केली तेव्हा ऋषीने त्यांना पुत्र नाही दिला म्हणून अतापी ब्राम्हणांच्या हत्या करायचा त्यासाठी तो आपल्या भावाला वातापी ला बकऱ्याचे रूप घ्यायला लावी व त्याचे मास ऋषीमुनींना खाऊ घातल्या जाई. मास खाल्ल्यानंतर अतापी हा मृत्यजय मंत्राचा जप करी आणि त्याचा भाऊ ऋषींच्या पोटातून पोट फाडून बाहेर येई. नंतर त्यांच्याकडे अगस्त ऋषी आले त्यांनी त्यांचा पाहुणचार स्वीकारून मास भक्षण केले. नंतर अतापीने मृत्युंजय मंत्र म्हटला पण त्याचा भाऊ वातापी बाहेर आला नाही. ऋषीने त्याला खाऊन पचवले होते. शेवटी तो शरण आला आणि दोघांना जीवदान दिले.
४) चौथ्या भागाचे नाव ब्रम्हहत्या असून याचा अर्थ देवराजा इंद्राने विश्वगुरू नामक ऋषी हे दैत्यांसाठी सुद्धा यज्ञा दरम्यान वाटा काढून ठेवतात हे पाहून त्यांना त्याठिकाणीच रागात ठार मारले. त्याने ब्रम्ह हत्या केल्याने ब्रह्महत्या हि त्या ठिकणी आली व इंद्राला गिळून घेत होती. तिच्यापासून सुटका करायला इंद्र हा १ लाख वर्ष पाण्याखाली फुलात दडून बसला.
५) पाचव्या भागाचे नाव आहे सरमा.. सरमा हि देवलोकातील कुत्री होती. यमराजाच्या जवळील चार डोळ्याची कुत्रे होते ती सरमाची मुले होती. सरमाने देवांची अनेक गोष्टी मध्ये मदत केली आहे. आणि जगातील सर्व कुत्रे हे सरमा पासून जन्मली अशी धारणा आहे.
६) सहाव्या भागाचे नाव प्रेतकल्प असून त्याचा अर्थ हा हिंदू पुराणानुसार गरुड पुराणातील उत्तर भाग आहे त्याला प्रेतकल्प बोलल्या जाते. त्या भागात माणसाच्या मृत्यूनंतर आपण वेगवेगळ्या योनीत प्रवेश करतो आणि त्याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देण्यात येतात त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
७ सातव्या भागाचे नाव रुद्र असून त्याचा अर्थ हा विध्वंस असा होतो. हिंदू पुराणातील एक हिंदू देवता म्हणून रुद्राची ओळख आहे तर भगवान महादेवाचे हि एक नाव रुद्र असून त्यांना हि राग येऊ नये अशीच सर्वजण इच्छा व्यक्त करतात जर त्यांना राग आला तर ते विध्वंस करतील अशी त्यांना भीती असते. रुद्र ला उग्र भयंकर असे म्हणून ओळखले जाते.
८ आठव्या भागाचे नाव ययाती असे असून त्याच्या बद्दल माहिती घेतली असता चंद्रवंशी राजा नमुश याचा ६ मुलांपैकी एक होते. त्याची आई अशोकसुंदरी हि शिव पार्वतीची मुलगी होती. ययाती यांचे लग्न दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या देवयानी या मुलीसोबत लग्न झाले तिच्या सोबत दासी म्हणून संमिष्टा हिला पाठवण्यात आले आणि वचन घेतले कि तो आपली पत्नी देवयानी शिवाय कोणासोबत हि शरीरसंबंध ठेवणार नाही. पण तो संमिष्टा सोबत शरीर संबंध ठेवतो म्हणून शुक्राचार्य शाप देऊन त्याला वृद्ध बनवतात मग उशाप म्हणून त्याला जर कोणी तरुण व्यक्तीने शरीर दिले तर त्याचे तारुण्य वापस येईल असे सांगितले जाते तेव्हा ययातीच्या मुलाने त्याला आपले शरीर दिले व ययाती एक हजार वर्ष शारीरिक भोग उपभोगतो तेव्हा त्याला समजते कि हि भूक कधीच संपणारी नसते.