Sunday, January 29, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

क्रांतिकारी लमाणी बंजारा समाज… रंजक माहिती

khaasre by khaasre
August 11, 2017
in बातम्या
6
क्रांतिकारी लमाणी बंजारा समाज… रंजक माहिती

ब्रिटीशाच्या काळी बंजारा समाज क्रांतिकारी म्हणून ओळखला
जात असे. तोआदिवासी जमातीत गणला जाई. मात्र, आदिवासींना मिळणाऱ्या सवलतींसाठीहा समाज आजही पात्र समजला जात नाही.

लंबाडी, सिंगाडी बंजारी, धेडोरोबंजारी, लमाणी अशा वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेला हा समाज भारतभर मात्र एक भाषा, एक संस्कृती’ टिकवून आहे. गोरमाठी ही त्यांची भाषा. या भाषेलाही अद्याप राजमान्यता मिळालेली नाही.

काही जमातींना “जन्मजात गुन्हेगार’ समजलं जावं, असा कायदा भारत स्वतंत्रहोण्यापूर्वी ब्रिटिशांनी 1871 मध्ये केला होता. या कायद्यानुसार 198 जमातीगुन्हेगार ठरवल्या गेल्या होत्या. यात
भारतातली सर्वात मोठी आदिवासी जमात असलेली बंजारा ही जमातही होती. ही जमात लंबाडी, सिंगाडी, बंजारी, धेडोरोबंजारी, लमाणी आदी नावांनी ओळखली जात होती. त्या काळात भारतात शेकडो राजे राज्य करत होते आणि या सर्व राजांना खाण्या-पिण्याच्या आणि कपड्यालत्त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी पुरवण्याचं काम या बंजारा समाजाकडं असे. ही जमात भारतातल्या राजेरजवाड्यांना खारीक, खोबरं, मीठ, धान्य पुरवी.हजारो बैलांच्या पाठींवर हे साहित्य लादून या जमातीची भटकंती सुरू असे. त्याकाळी दळणवळणासाठी आजच्यासारखे रस्ते नव्हते. जंगलांतून, डोंगरांतून,नदी-नाल्यांतून शेकडो-हजारो किलोमीटर प्रवास पायीच करावा लागे. बंजारा म्हणजे त्या काळाचे मोठे व्यापारीच म्हणा ना.

राजेराजवाड्यांना असं साहित्य पुरवणाऱ्या या जमातीला ही रसद पुरवणं सोईचं जावं, यासाठी खास कायदा करण्यात आला होता.
जिथं जिथं बंजारा समाजाचे तांडे व्यापारासाठी भारतात फिरतील, तिथं तिथंबंजारांच्या बैलांसाठी “तीन घाट का पानी,’ “बैल का चारा’
मोफत दिला जावा, असा हा कायदा होता. त्यात कुणी अडथळा आणला, तरतीन खून माफ करण्याचं फर्मानही त्या काळी काढण्यात आलं होतं असे म्हणतात!

हे सर्व बंजारा लोक गोरेपान, उंच, धिप्पाड, डोक्‍याला मुंडासं बांधलेले,खांद्यावर रुमाल टाकलेले, मिशांचे मोठमोठे आकडे असलेले असे असत. त्यांच्या या अशा पेहरावांमुळे ते उठून दिसत असत. त्यांना वाटेत लुटण्याचा किंवा अडवण्याचा प्रयत्न कुणी केल्यास त्यांनी केलेल्या प्रतिकारादाखल दोनतीन लोक ठार झाले,
तरी त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होत नसे. कारण, त्यांना राजांनी तशी मुभा दिलेली होती! बंजारा स्त्रियाही गोऱ्यापान, नाकीडोळी नीटास,अनेक प्रकारचे दागदागिने ल्यायलेल्या, मनगटापासून ते दंडापर्यंत हस्तिदंताच्यापांढऱ्या बांगड्या घातलेल्या असायच्या. बाहेरगावी फिरताना आपलं सौंदर्यथेटपणे दिसू नये म्हणून शरीरावर व चेहऱ्यावर त्या गोंदवून घेत असत. ही गोंदणंखूप मोठी असत.

केशभूषा करताना केसांना वेगवेगळ्या प्रकारचे आळेपिळे त्या देत. अशा केसांवर आरसे लावून त्यांवर सोन्या-चांदीचे दागिन्यांनी त्या सजवत.केसाच्या वेण्या चेहऱ्यावर सोडून सारा चेहरा त्या झाकून घेत. या बंजारांची-लमाणांची चालण्याची गती मोठी विलक्षण असे. वेगवान आणि
झपाट्याची.त्यावरून एक उक्तीही प्रचलित झाली होती – “लमाणी चालले झपाट्यानी आणिफुफाटा उडतो वहाणांनी.’

बरोबर गडीमाणसं नसताना गुंडांनी या बायकांना अडवलं, तर सोबतच्या छोट्या-मोठ्या शस्त्रांनी त्या स्वसंरक्षणार्थ वार करत असत. ही शस्त्रं त्यांनी त्यांच्याकेसात दडवून ठेवलेली असत. कुणी तलवारीचा वार करू लागला, तर तो वारत्या हातातल्या हस्तिदंती बांगड्यांवर झेलत
आणि प्रतिकार करत. त्या काळी तलवारी-भाले-बर्चे ही शस्त्रं सर्रास वापरली जायची.

वार झाला तर तो पगडीवर कसा झेलायचा याचं प्रशिक्षण पुरुषांना आणि हस्तिदंती बांगड्यांवर कसा झेलायचा , याचं प्रशिक्षण स्त्रियांना त्या काळी दिलंजाई. थोडक्‍यात, परिस्थितीनं या जमातीला लढाऊ
बनवलं होतं. ही जमात क्रांतिकारी असल्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात.
मोहेंजोदाडो संस्कृतीत कष्ट करणाऱ्या बैलाला जसं पूजनीय स्थान होतं, तसंचस्थान बंजारा समाजातही बैलाला आहे.

शीखपंथीयांनी मानवी मूल्यांवर सर्वात आधी भर दिल्याचं
इतिहासात आढळतं. “कुठलीही मूर्तिपूजा नको’, “मानवता हाच खरा धर्म,’
“देशभक्ती व देशाचं संरक्षण याला प्राधान्य आणि तेच खरं धर्माचं
कर्तव्य’ अशीगुरू नानक यांची शीखधर्मीयांना शिकवण होती. गुरू नानक यांची ही शिकवणप्रथम अमलात आणणारे बंजारा लोकच होते. म्हणूनच दिल्ली, हरियाना, पंजाबया राज्यांत मोठ्या प्रमाणात शीखपंथीय बंजारा लोक दिसून येतात. उत्तरप्रदेशासारख्या राज्यात मुस्लिधर्मीय बंजारा लोकही आढळून येतात. बंजाराजमात ही हिंदू, मुस्लिम, शीखधर्मीय असली, तरी तिची बोलीभाषा भारतभरएकच आहे. ती म्हणजे गोरमाठी. इतर जमातींपेक्षा वेगळे संस्कार घेऊनजगणाऱ्या साऱ्या बंजारा जमातीची संस्कृती भारतभर एकच आहे. या जमातीचीभटकंती भारतभर असे.

“बस्ती बस्ती, परबत परबत गाता जाए बंजारा’, असं एक हिंदी
सिनेगीत आहेच.

बंजारा समाजात एक कर्ता पुरुष होऊन गेला. त्याचं नाव सेवालाल महाराज.

त्यांनी भारतातल्या चारपाच कोटी गोरबंजारा लोकांचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांना दिशा दिली. सेवालाल महाराजांना या जमातीत खूप मान
असे. पाहुरा यादेवीचंही स्थान या जमातीत अतिशय महत्त्वाचं आहे. या जमातीतला आणखीएक लढाऊ आणि कर्तृत्ववान पुरुष म्हणजे लकेशा बंजारा. या बंजारांना दिल्लीमध्ये लंबाडी असं संबोधल्यास त्यांना आदिवासींच्या सवलती मिळतात आणि लमाणी बंजारा म्हटल्यास ते सवलतींपासून वंचित राहतात. आंध्र, कर्नाटक,दिल्ली इथं ही जमात आदिवासी ठरते, तर अन्य
राज्यांमध्ये गुन्हेगार जमात असूनही त्यांना जमातीच्या सवलतींपासून वंचित ठेवलं जातं.
महाराष्ट्रात यांचीगणना ओबीसींमध्ये केली जाते.

15 ऑगस्ट व 26 जानेवारीला भारतातल्या आदिवासींचं सांस्कृतिक जीवन किती महान आहे, ते
दाखवण्यासाठी बंजारालोकांच्या वेशभूषांचं प्रदर्शन भरतं. नृत्यप्रकार दाखवणारे कार्यक्रम होतात. याजमातीच्या संस्कृतीचं असं केवळ प्रदर्शन भरतं; पण आदिवासींना मिळणाऱ्या सवलतींपासून त्यांना वंचितच ठेवलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना राज्यघटनेत अधिकार देण्यात आलेला नाही.

लकेशा बंजारांची शौर्यगाथा ऐकताना अंगावर शहारे येतात.

त्यातली एक कहाणी अशी सांगितली जाते – आपल्याला कुणी प्रतिकार करूनये, आपली जरब बसावी म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी एका शीखक्रांतिकारकाचं शिर धडावेगळं
करून ते दिल्लीत भरचौकात टाकून दिलं होतं. “या धडाला कुणी हात लावला, तर त्याला देहदंडाची शिक्षा होईल,’ असं ही ब्रिटिशांनी बजावल्यामुळं त्या मृतदेहाच्या आसपास कुणीही
फिरकत नव्हतं. दोनदिवस तो मृतदेह चौकात तसाच पडून होता. त्या वेळी केवळ लकेशा बंजारा याक्रांतिकारकानं हिंमत दाखवली व त्या क्रांतिकारकाचा मृतदेह आपल्या बैलाच्या पाठीवर टाकून त्यानं तो त्याच्या तांड्यातल्या झोपडीत आणला आणि झोपडीला आग लावून देत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ही बातमी सर्वत्र पसरून लकेशाबंजाराचं नाव प्रसिद्ध झालं. लकेशा बंजाराच्या
या कर्तबगारीची उतराई म्हणून दिल्लीत शीख समाजानं त्याच्या नावानं गुरुद्वाराची स्थापना केली.

संसद भवनाजवळ हा गुरुद्वारा आहे. एकदा याच गुरुद्वारामध्ये विमुक्त घुमंतू आदिवासी कार्यकर्त्यांची बैठक होती, तेव्हा लकेशा बंजारा जमातीच्या कार्यकर्त्यांनी आमची अत्यंत प्रेमानं आणि आदरानं त्या गुरुद्वारात राहण्याची व खाण्या-पिण्याची सोय केली होती. या बंजारा जमातीला स्वातंत्र्य पूर्वकाळात आदिवासी म्हणून सोई-सवलती होत्या. बैलांवर धान्यधुन्य, मीठ लादून येजा करणाऱ्या या लोकांना पुढं बंजारा हे नाव देण्यात आलं. लाभण नदी वरून मिठाच्या गोण्या भरून साऱ्या समाजाला हे मीठ या जमातीनं पुरवलं; पण या मिठाला भारतीय जागले काय, असा प्रश्‍न मला पडतो.

या जमातीची “एक भाषा, एक संस्कृती’ असूनही तिला एका वर्गवारीत घेण्यात आलेलं नाही. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून इकडं आलेल्या 15-20 लाख सिंधी भाषकांच्या सिंधी भाषेला भारतात मान्यता मिळते; मात्र भारतात जिथंजिथं बंजारा जमात आहे, तिथं तिथं बोलल्या जाणाऱ्या
गोरमाठी भाषेला मात्रआजही साधी मान्यता मिळालेली नाही.

आदिवासी असूनही आदिवासींच्या सोई-सवलती मिळवण्यासाठी ही जमात पात्र नाही. वेगवेगळ्या
राज्यांच्या क्षेत्रीयबंधनात अडकलेल्या या समाजाची स्वातंत्र्यानंतर आजही एकजूट होऊ शकलेलीनाही. ती होऊ देण्यात आलेली नाही. ही मोठीच शोकान्तिका नव्हे काय?

माहिती आभार

श्री.दिपक राठोड
संस्थापक अध्यक्ष
वसंतराव नाईक प्रतिष्ठान,औसा.
9403970297

Loading...
Tags: BanjaraIndia
Previous Post

सलमान,ह्रितीक ह्यांना सुध्दा लाजवेल असा IPS अधिकारी…

Next Post

मुंबई मराठा क्रांती नंतर काय ?

Next Post
मुंबई मराठा क्रांती नंतर काय ?

मुंबई मराठा क्रांती नंतर काय ?

Comments 6

  1. Rathod Vilas Haribhau says:
    5 years ago

    I love story

    Reply
  2. नंदू भाऊ पवार कोनगांम ता.भिवंडी मुंबई says:
    5 years ago

    सारी दनीयार गोरमाटी न येक भासा येक बोली न देयेर कारन छं आपणे वडीती आजीक कोयी छाती ठोकन सरकारे ती लढे वाळो कोनी मळो ? कींवा समाजेन आछो नेता नेतृत्व करेवाळो कोनी मळो? आपणे मायीती दूसरेरो हामाली ,
    दूसरेरो जे जे कार करेवाळ आज गलीती लेताणीं दीली ताणूं
    रोज लाखेती मनकीया दकाव छं, पणन गोरमाटी सारू वाते, गोरमाटी र जे जे कार करेवाळो, खरो गोरमाटी र धाटीती चाले वाळो, सधीया तरी *मारतीया रामचंधीया भूकीया बापू सवायी ये जग दनीयाम दूसरो मनकीया आज तरी दूसरो कती दकान पडरो कोनी छं ?
    आजीक थोडसेक लोक छं पणन वोर मायी वोंदूरो कती न कती वेगळोज मूदा आव छं ? आसो जेर जेर परीती
    आपणो आपणो गोर कररे छं आछं वात, कायी लके म गलत वेगी वीय तो माफी? नंदू भाऊ पवार कोनगांम ता.भिवंडी मुंबई 9011681888 / 7385855000

    Reply
  3. rahul Rathod says:
    5 years ago

    acha hai bhai puri store pada supar bhai

    Reply
  4. Nitin Rathod says:
    5 years ago

    Nice information

    Reply
  5. Dr.Rajendra B.Rathod. says:
    5 years ago

    Very Excellent & informative,

    Reply
  6. Tushar pawar says:
    5 years ago

    Thnxxx ..sir for sach a important information

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In