शाळांमध्ये मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात कधी पालकांना वाटू शकते कि या गोष्टीचा माझ्या मुलांना काय संबंध आहे? ते शिकून त्यांचा काय फायदा आहे. एका शाळेत वर्ग तिसरी मधील मुलांना आग लागली तर काय करायचे यासंबंधी आपत्ती व्यवस्थापन चे शिक्षण देण्यात आले होते. हे शिक्षण तेव्हा तिसरी मध्ये असणाऱ्या जेन सदावर्ते हिने पण शिकले होते. या शिक्षणाचा कसा केला वापर आणि कसे वाचवले तिने अनेकांचे प्राण अवश्य वाचा.
मुंबई मधील परेल भागात क्रिस्टल टॉवर मध्ये अचानक आग लागून त्याठिकाणी ४ लोकांचा मृत्यू झाला तर २० हुन अधिक लोक जखमी झाले. हि घटना अधिक भीषण झाली असती पण एका १० वर्षीय मुलीमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्या मुलीची नाव जेन सदावर्ते असून ती तिसऱ्या वर्गात असताना तिने आगी वर कशा प्रकारे नियंत्रण ठेवायचे व त्यातून आपला जीव कसा वाचवायचा याचे प्रशिक्षण घेतलेले. त्यावर तिने शाळेत असताना प्रोजेक्ट सुद्धा बनवला होता. काल लागलेल्या आगीत जेन हिने आपल्या जवळ राहणाऱ्या सर्व रहिवाशांना आगीतून कशाप्रकारे सहीसलामत बाहेर पडायचे याबाबत मार्गदर्शन केले.
जेन सदावर्ते आपल्या परिवारासोबत क्रिस्टल टॉवर मधील १६ व्या मजल्यावर राहत होती. अचानक इमारतीमध्ये आग लागल्या नंतर जेन ने आपल्या शेजाऱ्यांना सांगितले कि त्यांनी गोंधळ करू नये. तिने सुती कपडा आणि पाणी यांच्या मदतीने सुती कपड्याचे मास्क बनवले आणि ते सर्वांना आपल्या तोंडावर लावायला लावले या मुळे आगी मध्ये हि त्यांना स्वास घेण्यास मिळाले. व गुदमरून जाण्यापासून सर्वजण वाचले. तिने जे काही ध्येय दाखवले त्याबद्दल सर्वजण तिचे कौतुक करत आहेत.
या आगीवर अग्निशामक दलाने २ तासात नियंत्रण मिळवले. व क्रेनच्या साहाय्याने इमारतीच्या रहिवाशांना अग्निशामक दलातील जवानांनी बाहेर काढले. व सर्वानी जेन सदावर्ते ने जी काही बहादुरी दाखवली तिला भेटलेल्या माहितीचा तिने जो काही वापर केला त्याबद्दल सर्वानी कौतुक केले. कधी आपण घेतलेले ज्ञान आपल्या उपयोगी पडेल याचा नेम नसतो. त्यामुळे आपण माहिती एकमेकांना शेअर करावी.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…