सेक्स वर्करची मुलगी मोठी होऊन सेक्स वर्कर बनेल अशी जास्तीत जास्त लोकांची मानसिकता असते. पण आज आपण अशा एका मुलीची कहाणी बघणार आहोत जीचा जन्म तर रेड लाईट एरियामध्ये अन ते सेक्स वर्कर न बनता आज लाखो करोडो लोकांसाठी एक प्रेरणा बनली आहे. देशातील 2 नंबरच्या सर्वात मोठ्या रेड लाईट एरिया कामठीपुरा मुंबई मध्ये जन्मलेल्या आणि 22 वर्षाची होई पर्यंत तिथेच राहिलेल्या शीतल जैनची.
रेड लाईट एरियात जन्मल्याने तिला मोठं झाल्यावर वेश्या व्यवसाय करावा लागेल हेच सांगितले जायचे. पण कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की ती वॉशिंग्टनला जाईल आणि काही तरी मोठी उपलब्धी मिळवेल.
शीतलला लहानपणी पासून ड्रम वाजवायचा आणि डांसची आवड होती. पण रेड लाईट एरियामध्ये जन्मल्याने तिच्या स्वप्नामध्ये अडथळे यायचे. शीतलला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. हिंसा आणि भेदभावाचा सामना सुद्धा तिला करावा लागला. शीतलला एका NGO ने अमेरिकेत एक वर्षाच्या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेण्यासाठी खूप मदत केली. शीतलला वॉशिंग्टनमध्ये प्रवेश मिळाला व तिचे आयुष्य पालटून गेले.
शीतल आज समाजासाठी एक प्रेरणा बनली आहे. शीतलला ड्रम वाजवण्यात अजून परिपक्व व्हायचं आहे. शितलचे आयुष्य इतके वेदनादायी राहिले आहे की तुम्ही विचारही करणार नाही. शीतलच्या वडिलांनी तिचे अनेकवेळा यौनशोषण केले होते. शीतलने कठोर मनाने जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की तिचे वडील रात्री झोपेत असताना तिचे यौनशोषण करायचे.
शीतल आता तिचे स्वप्न जगात आहे. तिला एक वर्षाचा कोर्स पूर्ण करण्यासाठी स्कॉलरशिप सुद्धा मिळाली आहे. शितलचे ब्रिटनमध्ये अनेक शो सुद्धा झाले आहेत. अमेरिकेतून परतल्यानंतर शीतल रेड लाईट एरियामधील छोट्या छोट्या मुलांसाठी काही तरी करू इच्छिते. ती एखादी कंपनी जॉईन न करता लहान मुलांची शाळा सुरू करून त्यांना शिकवू इच्छिते. शीतल सध्या बंगळुरूच्या मेक अ डिफेरन्स या NGO सोबत काम करते. शीतल लवकरच रेड लाईट एरियामधील मुलांसाठी म्युझिक क्लास सुरू करणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…