आपल्याला तुरटी फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतात असंच माहिती असते. पण तुरटीचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते जे की अनेक आजारांना दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. संधीवात दूर करण्यासाठी तर तुरटी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही तुरटीचे महत्वपुर्ण फायदे बघूया…
तुरटीमध्ये असलेले मॅग्नेशियम संधीवाताच्या वेदना दूर करते. यासाठी तुम्हाला गरम पाण्यात तुरटी टाकायची आहे आणि त्या पाण्याने ती जागा शेका. तुमच्या वेदना कमी होतील. तुरटी केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. कोमट पाण्यात तुरटी टाकून डीप कंडिशनर तेवढ्याच प्रमाणात मिसळून ते मिश्रण केसांना लावा. 15-20 मिनिटांनी ते थंड पाण्याने धुवा. तुमचे केस दाट होण्यास मदत होईल. तुम्हाला असे आठवड्यातून एकदा करायचे आहे.
तुरटी पाण्यात टाकून आंघोळ केल्यास तुमचा ताण कमी होण्यासही मदत मिळेल. आठवड्यातून तीन वेळा ही क्रिया करा. तुरटी खाज किंवा सनबर्न दुर करण्यासाठी देखील उपयोगी पडू शकते. तुरटीचे मिश्रण त्या जागी लावल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.
तुरटीत जे मॅग्नेशियम असते त्याने मसल्स रिलॅक्स होतात. वेदना होत असलेल्या ठिकाणी तुरटीने मसाज करा. तसेच तुरटीने स्किनच्या डेड सेल्स सुद्धा निघतील. सोबतच तुमच्या नसांमधील वेदना आणि जॉईंट पेन कमी होईल. यासाठी गरम पाण्यात तुरटी टाका आणि वेदना होणारा भाग त्यामध्ये बुडवून थोडा वेळ ठेवा. तसेच बाथटबमध्ये तुरटीचे पाणी मिसळून अंघोळ केल्यास हार्ट अटॅकची शक्यता कमी होते आज धोका टाळता येतो.
तुरटीच्या पाण्यात 15 मिनिट पाय टाकून बसल्यास पायांची सूज, दुर्गंधी, थकवा, आणि फंगल इन्फेक्शन सारख्या समस्या दूर होतील.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…