एका युवकाने दोन मुलीसोबत विवाह केला हे लग्नपत्रिका व फोटो भयंकर वायरल झाले आहे. बघितल्या नंतर हे लक्षात येईल कि हि घटना महाराष्ट्रातील आहे. परंतु असे का झाले असेल याचा शोध घेण्याचा आम्ही पर्यंत केला आणि सत्य आपल्या समोर देत आहोत.
तर झाले असे कि हि घटना बिलोली तालुक्यातील कोटगयाळ येथील आहे बुधवारी हा विवाह सोहळा येथे पार पडला आहे. दोन्ही वर्हाडी मंडळीसह पालकांनाहि विवाह मंजूर असल्याने माजी आ. रावसाहेब अंतापुरकर यांनी ह्या प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास आशीर्वाद दिला. कोटगयाळ येथील गंगाधर शिरगीरे यांना चार मुली ज्यात पहिली अंशतः मतीमंद आहे. दुसऱ्या व तिसऱ्या मुलीचे लग्न झाले. चौथी राजश्री लग्नाला आली. मोठी धुरपताबाई मतीमंद असल्याने तिच्याशी कोण विवाह करणार ?
असे विचार शीरगिरे कुटुंबियात सुरु झाले. यादरम्यान राजश्री हिला स्थळ येऊ लागले त्यावर लहान बहिणीने अभिमानास्पद भूमिका घेतली आहे कि, माझ्याशी विवाह करायचा असेल तर मोठ्या बहिणीला स्वीकारावे लागेल. समराळा ता. धर्माबाद येथील सायन्ना उरेकर यांचा साईनाथ नावाचा मुलगा विवाहास तयार झाला. दोन्ही पालक व नातेवाइकाच्या मर्जीनुसार पत्रिकाही छापण्यात आली आहे.दोन वधू व एक वर अशी पत्रिका पहावयास मिळाली. २मे बुधवारी सकाळी ११ वाजता धूरपताबाई व राजश्री यांचा विवाह साईनाथसोबत पार पडला.
दोन्ही गावच्या निमंत्रित गावकऱ्यासह हा विवाह सोहळा पार पडला. मोठी बहिण मतीमंद त्यामुळे तिच्याशी लग्न करण्यास कुणी तयार होत नाही. हे बघत असलेली छोटी बहिण समोर आली. खाली क्लिक करून आपण लग्नातील फोटो बघू शकता.
माझ्याशी लग्न करायचे असेल तर मोठ्या बहिणीशी लग्न करावे लागेल. अशी अटच तिने टाकत एक मोठा आदर्श निर्माण केलेला आहे. गरीब कुटुंबातील मुलीने सर्वासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..