महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अजूनही हेलिकॉप्टर विषयी लोकांमध्ये चांगलेच आकर्षण बघायला मिळते. मग त्यातली त्यात एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीला हेलिकॉप्टरने सासरी पाठवले तर चर्चा तर होणारच ना. हौसेसाठी काय पण असाच काहीसा प्रकार कर्जत मध्ये घडला आहे. कर्जातमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीला चक्क हेलिकॉप्टरने सासरी पाठवले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीची चांगलीच चर्चा होत आहे. फक्त कर्जत आणि शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या लग्नाविषयी चर्चा होत आहे. ही व्यक्ती आहे कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक तारेक सय्यद.
तारेक सय्यद यांच्या मुलीचा विवाह बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील महंमद आयाज अय्यद यांच्याशी रविवारी पार पडला. यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष आणि इतर शहरातील प्रतिष्ठित मंडळी लग्नाला उपस्थित होती.
मुस्लिम समाज हा धर्म आणि परंपरा यास प्राधान्य देणारा समाज आहे. पण मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने अशाप्रकारे आपल्या मुलीला हेलिकॉप्टरने सासरी पाठवण्याची घटना दुर्मिळच आहे. मिजबा आणि महमंद यांच्या धार्मिक परंपरेनुसार विवाह झाल्यानंतर ते सजवलेल्या गाडीत हेलिपॅडकडे आले. कर्जतमधील दादाराव पाटील कॉलेजच्या मैदानावर हेलिपॅडची विशेष सोय यासाठी करण्यात आली होती. तसेच मुलाच्या पाटोदा या गावी सुद्धा हेलिकॉप्टर उतरण्याची सोय करण्यात आली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…