नुकतेच मुंबई विद्यपीठाचे निकाल जाहीर करण्यात आले. या निकालानंतर एक नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. ते म्हणजे डॅनियल मेंडॉन्सा या बीएसडब्ल्यू मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे. डॅनियल चर्चगेट येथील निकेतन महाविद्यालयात बीएसडब्ल्यूचं शिक्षण घेत आहे. त्याने मुंबई विद्यापीठातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. डॅनियलचे यामुळे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. पण डॅनियलचे नाव चर्चेत येण्यामागे एक वेगळं कारण आह. ते म्हणजे डॅनियल मेंडॉन्सा हा द्विलिंगी आहे. द्विलिंगी असल्यामुळे डॅनियलच्या जीवनात नेहमीच खूप संघर्ष करावा लागला. जाणून घेऊया द्विलिंगी डॅनियलच्या संघर्षाची कहाणी खासरेवर…
डॅनियलच्या जीवनात त्याच्या जन्मापासूनच संघर्ष आला. डॅनियल द्विलिंगी असल्याने त्याला 4 वर्षाचा असताना वडिलांनी एका तृतीयपंथीकडे विकले. पण आईने त्याला पुन्हा घरी आणले. आईने त्याचा खूप चांगला सांभाळ केला, त्याला खूप जपलं. त्याला लहानपणापासून चांगले शिक्षण दिले. आज डॅनियल बीएसडब्ल्यूची परीक्षा विद्यापीठातून द्वितीय येऊन उत्तीर्ण झाला आहे.
यापूर्वी आपण लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर या कम्युनिटी बद्दल ऐकून होतो. पण डॅनिअल हा द्विलिंगी असल्याने त्याला समाजात वावरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. डॅनियलच्या शिक्षणदारम्यान त्याला महाविद्यालयाकडून सुद्धा खूप मोलाचे सहकार्य मिळाले. शिक्षण चालू असताना डॅनियलला पुरुषांच्या टॉयलेट मध्ये जाण्यास संकोच वाटायचा. पण निर्मला निकेतन महाविद्यालयाने डॅनिअलसाठी 3 वर्षे वेगळ्या टॉयलेटची व्यवस्था केली. डॅनियलचे महाविद्यालयातील सर्व स्टाफ आणि कर्मचाऱ्यांसोबत खूप सलोख्याचे संबंध होते. विद्यापीठातून द्वितीय आल्याने महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ लिडविन डाईस यांनी त्याचे कौतुक करून अभिमान व्यक्त केला.
डॅनियलला शरीर पुरुषाचे असले तरी त्याला मासिक पाळी येतात. डॅनियलच्या वेगळ्या वागण्या-बोलण्याने त्याला समाजात वागताना खूप त्रास सहन करावा लागायचा. बायल्या, छक्क्या म्हणून डिवचले जायचे. याच त्रासाला कंटाळून डॅनियलने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुदैवाने दोन्ही वेळ तो वाचला.
डॅनियलची इच्छा आहे की समाजाने त्याला स्वीकारावं. त्याच्या द्विलिंगी असण्याला समाजात मान्यता मिळावी आणि त्याला आदर मिळावा यासाठी तो सध्या झगडत आहे. डॅनियलला समाजसेवा क्षेत्रात करिअर करायचे आहे. एका पुरुषासोबत लग्न करून बाळाला जन्म द्यायची इच्छाही डॅनियलने व्यक्त केली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…