इतिहासात अनेक महिलांवर अन्याय झालेल्या घटना आहे अनेक कुप्रथेचा महिलांना सामना करावा लागला. मग ते राजाचे शासन असो का लोकशाही आजही महिला त्यांच्या अधिकाराकरिता लढत आहेत. महिलांना आपल्या हक्क आणि अधिकारा करिता अनेक संघर्ष करावे लागली. आज आपन २१व्या शतकात आहो. परंतु भूतकाळात बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल कि महिलांना अधिकार मिळविण्याकरिता किती संघर्ष करावा लागला. अशीच एक गोष्ट स्वतंत्र पूर्व काळातील केरळ मधील आज खासरेवर तो प्रसंग आणि तो क्रूर नियम बघूया..
महिलांना शरीर पूर्ण झाकण्याचा अधिकार नव्हता. तीरुवंतपूरम येथे त्रावणकोर ब्राम्हण राजाचे राज्य होते. त्यांनी लागू केलेल्या नियमानुसार दलित महिलांना स्तनाचा कर द्यावा लागत असे. जर कर दिला तरच त्यांना राहण्याचा अधिकार होता. आणि स्तनाच्या आकारावरून हा कर ठरविल्या जात असे. या नियमानुसार स्त्रियांना आपले स्तन हे उच्चवर्णीय लोक समोर झाकण्याचा अधिकार नव्हता. दलित महिलांना दागिने घालण्याचा अधिकार नव्हता. आणि दलित पुरुषांना मिश्या ठेवण्याची परवानगी नव्हती. हा नियम फक्त दलित समाजास राजांनी लागू केला होता. या नियमामुळे स्त्रियांना जागोजागी अपमानित होण्याची वेळ येत असे.
या नियमाच्या विरोधार नागेली नामक एका महिलेने आवाज उठविला. नागेली तीरुवंतपूरम येथील चरथला येथील एक दलित स्त्री तिने उचललेल्या साहसी पावलामुळे हा नियम बंद करण्यात आला. तिचे कुटुंब गरीब असल्यामुळे तिला स्तनाचा कर देणे शक्य नव्हते. प्रांत अधिकारी जेव्हा स्तनाचा कर घेण्यास तिच्या घरी आला तेव्हा तिने यास विरोध केला आणि आपले स्तन एका झटक्यात कापून केळाच्या पानात प्रांत अधिकार्यास दिले. हे बघून अधिकारी पळून गेले आणि नागेलीचा मृत्यू रक्तस्त्रावामुळे जागेवरच झाला. तिच्या मृत्यूची बातमी सगळीकडे वणव्याप्रमाणे पसरली आणि सुरु पेटला वणवा त्रावणकोर राजा विरुद्ध आणि त्याच्या या निर्दयी नियमाविरुद्ध या घटनेनंतर नागेलीच्या नवऱ्याने तिच्या चितेत उडी मारून जीव दिला.
ह्या सर्व प्रकारामुळे राजा हादरला आणि त्याने मुकुट, त्रावणकोर या भागातील स्तनावरील कर रद्द केला. आजही या भागास नागेलीच्या नावावरून ओळखतात. नागेलीच्या या क्रांतिकारी पाउलास खासरेचा सलाम…
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..