Saturday, January 28, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

कसा बनवला जातो अफु? वाचा फायदे व तोटे…

khaasre by khaasre
February 9, 2018
in बातम्या
0
कसा बनवला जातो अफु? वाचा फायदे व तोटे…

अफू हा अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो. हेरॉईनची तस्करी हा जगातील एक प्रमुख गुन्हा आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश असून जगातील एकूण अफूच्या ७० टक्के उत्पादन येथेच होते.

गांजाप्रमाणे अफू हेही मुळात एक औषध म्हणून उपयुक्त आहे. ते गांजापेक्षा जास्त प्रभावी आहे. अफूची झाडे उत्तर भारतात जास्त आहेत. याच्या बोंडापासून निघालेला चीक सुकल्यानंतर अफू होते. बोंडेपण वापरली जातात, तसेच त्यातले बी (खसखस) खूप वापरले जाते. अफूपासून मॉर्फीन, कोडीन, नार्कोटीन, पॅपॅव्हरीन, थेबाइन वगैरे अल्कलॉइड्स व त्यांची संयुगे प्राप्त होतात. ही रसायने वेदनाशामक आहेत. मात्र हल्ली त्यांचा मादक पदार्थ म्हणून जास्त उपयोग होतो. आणि त्यामुळेच अफूच्या शेतीला सरसकट परवानगी नाहीये.

अफू हि पॅपॅव्हेरेसी कुळातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम असे आहे. या वनस्पतीपासून अफू हा एक मादक विषारी पदार्थ मिळतो. तो अफूच्या कच्च्या फळांना चिरा पाडून मिळवला जातो. चिरा पाडल्यावर फळातून रस पाझरतो आणि हा रस वाळवून घट्ट केला की अफू हा मादक पदार्थ मिळतो. या अफूची लागवड प्राचीन काळापासून होत आली आहे.

अफू हे तीन महिन्यांचे पीक आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर मध्ये ही लागवड केली जाते.कांद्याच्या बियाण्यात मिसळून अफूचे बी जमिनीवर फेकले जाते. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात या पिकाला फुले येतात. फुले गळून पडल्यानंतर त्यापासून बोंड तयार होते. या हिरव्या दिसरणाऱ्या बोन्डाला चिरा मारून त्यातून द्रव्य पदार्थ एकत्र केला जातो. याच द्रव्य पदार्थापासून अफू आणि चरस तयार केला जातो. त्यामुळे या अफूचा वापर बोंडापासून हेरॉइन, चरस आणि गांजा बनवण्यासाठीच केलां जात असल्याचं नार्कोटिक्स विभागाचं म्हणणं आहे.

आज जगात अफूचं सर्वाधिक उत्पादन अफगाणिस्तानामध्ये होतं. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे. अफूचे शुध्दीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती इत्यादी बाबी सर्वस्वी भारत सरकारच्या आधिपत्याखाली होतात. भारत हा जगातील एकमेव मान्यता प्राप्त अफू निर्माण करणारा देश आहे.

अफूमध्ये वेदनाशामक आणि तापशामक अशी दोन द्रव्ये असतात. यांतील पहिले द्रव्य(मॉर्फिन) हे अत्यंत उपयुक्त आहे. याने मेंदूवर सुरुवातीस उत्तेजन पण नंतर निद्रा आणणारा परिणाम होतो. एकूण वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. उत्साह,कामवासना, विचारशक्ती इ. वाढतात पण हे सगळे कमी मात्रा दिल्यावर. जास्त मात्रा दिल्यावर श्वसनक्रिया, हृदयक्रिया बंद पडून मृत्यू येण्याचा संभव असतो, कारण यामुळे मुख्य म्हणजे मेंदूचे काम थंडावते. औषध म्हणून अफू पचनसंस्थेच्या अनेक आजारांवर उपयुक्त आहे. जुलाब उलटी थांबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो पण आतडयाचे चलनवलन थंडावणे ही त्याच्या कामाची पध्दत आहे, यामुळे दुष्परिणामही होतात. अफूमुळे मलावरोधाचा परिणाम होतो. अफूने कोरडा खोकला कमी होतो. अफू सर्व इंद्रियांमध्ये दाह विरोधी काम करते, त्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते.

अफू बनतं कसं?

मसाल्याचं पदार्थ म्हणून ओळखलं जाणारं खसखस आणि खसखशीचं हिरवी बोंड म्हणजेच अफू. या हिरव्या बोंडाना ब्लेड अथवा कात्रीने कापल्यानंतर त्यातून एक चिकट पदार्थ बाहेर होतो आणि तो म्हणजेच अफू. अफू हे ६० ते १२० सेंमी. उंची असणारं झुडूप आहे. याची पानं साधी, कमी जास्त करवती काठाची, तळाशी खोडास वेढून राहणारी असतात. बिया लहान, पांढऱ्या व विपूल असून त्यांनाच खसखस म्हणतात.

अफूच्या झाडाच्या बीला खसखस म्हणतात. जानेवारी महिन्यात बी पेरल्यानंतर साधारणतः तीन महिन्यात रोपटी वाढून त्याना गुलाबी,पांढ-या रंगाची फुले येतात..या फुलांच्या मागे लहानशे बोंड असते. साधारणतः १५ दिवसानंतर त्याचा आकार लिंबाएवढा होता. मग फुले गळून पडतात बोंडे पिकली की त्यापासून अफूचा रस बाहेर काढतात. अफू काढल्यावर ती बोंड वाळवली जातात.आणि मग त्यापासून खसखस बाहेर येते.

खसखस म्हणजे पॅपॅव्हर सॉन्मिफेरम असं शास्त्रीय नाव असलेल्या अफुच्या बिया. अफू हा पदार्थ वैद्यकीय दृष्ट्या उपयुक्त असलेल्या अल्कालॉइडांसाठी प्रसिध्द आहे. फळांपासून मिळणारी अफू चवीला कडू, स्तंभक, मादक, वेदनाहारक असून ती बध्दकोष्ठता निर्माण करते. जुलाब आणि हगवणीमुळे होणा-या विकारांवर ती उपयुक्त ठरते. तिच्या बिया पौष्टीक असतात. याच खशखशीपासून तेल काढतात. तर खाद्यपदार्थांमध्येही खसखस वापरतात. अफूचा मादकपणा खशखशीमध्ये नसतो. खशखशीचे तेल खाण्यासाठी आणि विषेशकरून चित्रकारांचे रंग व साबण तयार करण्यासाठी वापरतात.

Loading...
Previous Post

काय असतो नागमणी ? जाणुन घ्या वायरल विडीओ मागील धक्कादायक सत्य…

Next Post

लेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी

Next Post
लेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी

लेदर ओरीजनल कि डुप्लिकेट ओळखण्यासाठी या आहेत साध्या ट्रिक्स लेदर वस्तू घेताना पडतील उपयोगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In