काही दिवस अगोदर युट्यूबवर एक विडीओ वायरल झाला ज्यामध्ये सापाच्या डोक्यातुन एक खडा काढण्यात येतो. तथाकथित विडीओ मधे त्या खड्यास नागमणि सांगण्यात आले आहे. युट्यूब वर वेगवेगळ्या लोकांनी हा विडीओ अपलोड केला जवळपास १ करोड लोकांनी हा विडीओ बघितला व लाखो लोकांनी हा विडीओ शेअर केला आहे. आज खासरे वर बघुया काय आहे या विडीओची सत्यता…
विकीपेडीयाच्या माहितीनुसार या खड्याचा उपयोग सर्पदंश झाल्यावर उपचारासाठी करण्यात येतो. परंतु या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक दुजोरा दिलेला नाही आहे. दक्षिण भारतात हा काळसर रंगाचा खडा कोब्रा सापाच्या डोक्यावरील भागात सामान्यतः आढळून येतो. हा खडा थोडाफार चमक ही देतो. खड्याचा रंग सापानुसार वेगवेगळा असतो. परंतु हा खडा नाही हा नागमणि नसुन सापाने न वापरलेले विष काही दिवसाने स्थायु स्वरूपात रुपांतरीत होते त्यामुळे हा खडा तयार होतो. हा खडा काढल्यामुळे सापाचा मृत्यू होत नाही याला चमक असण्याचे खास कारण हे आहे की या चमकदार पणामुळे अनेक जिव त्याकडे आकर्षित होतात व साप आपला भक्ष पकडू शकतो.
काही देशात सर्पदंश झालेल्या ठिकाणावर हा खडा ठेवल्या जातो असे म्हटल्या जाते की हा खडा विष ओढुन घेतो. तसेच काही जागेवर दुध व पाण्यात हा खडा टाकुन काही वेळ ठेवल्या जातो व नंतर खडा बाहेर टाकुन पाणि पिल्याने विष शरीरातुन निघुन जातो असा समज आहे परंतु यास वैज्ञानिक मान्यता नाही. हा खडा जवळ असल्यावर साप जवळ येत नाही असाही समज आहे. परंतु हिंदू पुराणानुसार १०० वर्ष पूर्ण झालेला साप जो कोणालाही चावला नाही त्याच्या डोक्यावर खरा नागमणी तयार होतो व हा आकाराने मोठा व अंधारात प्रकाशमय असतो. कदाचीत औषधी कंपन्यांना हे सत्य समोर येऊ द्यायचे नसल्याने या खड्या विषयी सर्वाना अज्ञात ठेवले असेल.
आपल्याला हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका