सुरत जिंकल्यावर शिवरायांनि मुद्रण यंत्र ईंग्रजाकडुन मिळवले होते परंतु मशिनचा जानकार मानुस नसल्यामुळे ति मशिन चालली नाही नंतर ति सौराष्ट्रातील एका व्यापारास देण्यात आली व आजही तो छापखाना सौराष्ट्रात सुरू आहे शिवरायांच्या नावाने, ति मशिन त्यावेळेस चालली असती तर आज ईतिहासाची उठाठेव करायच काम पडल नसत.
अर्ण यंत्राचा(छापखाना) इतिहास-
शिवाजी महाराजांनी इंग्रजांकडून घेतलेला हा छापखाना त्यांना चालवणे शक्य न झाल्यामुळे त्यांनी तो 1674 साली भीमजी पारेख नावाच्या गुजराथीला विकला अशी माहिती श्री कन्हैयालाल मूनशी यांनी आपल्या ग्रंथात दिली आहे. पण या माहितीला महाराष्ट्राच्या इतिहासात विश्वसनीय आधार सापडत नाही.
भोसले राजघराण्याशी निगडित अशी छापखाण्याविषयी आणखी माहिती उपलब्ध आहे. तंजावरच्या सरफोजीराव भोसले या मराठी राजाने 1806 साली छापलेले ‘एकशेदहा ईसापनीती कथा’ हे पुस्तक मिळाले आहे. या छापखाण्यात छापलेले काही संस्कृत ग्रंथ सुद्धा आहेत. याच छापखाण्यात 1809 साली एकनाथांच्या भावार्थ रामायणाच्या युद्ध कांडाच्या काही प्रति छापण्यात आल्या आहेत. त्याकाळी छापखान्याला अर्ण यंत्र असे दुसरे संस्कृत नाव मिळाले.
संदर्भ :- मराठि मुद्रक (कृ.के.राहाळकर)
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…