महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेण्या या पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. पण या लेण्यांव्यतिरिक्तअभिमानाची वास्तु औरंगाबाद जिल्ह्यात आहे. ती म्हणजे यादवांची राजधानी राहिलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला. औरंगाबादची शान असलेल्या, शहरापासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेल्या दौलताबाद या किल्याचे मूळ नाव देवगिरी आहे. महाराष्ट्रातील उत्तम किल्यांमध्ये देवगिरी किल्याची गणना होते. देवगिरी किल्ला हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.
मोगलांनी या किल्यावर आक्रमण केल्यावर याचे नाव दौलताबादचा किल्ला म्हणून प्रसिद्ध झाले. दौलताबाद ला एकूण चार कोट आहेत. सर्वात बाहेर असणाऱ्या अंबरकोटची निर्मिती निजामशाही सरदार मलिक अंबरने केली होती. गावाच्या अवतीभवती अजूनही या कोटाचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. कोटाच्या आतल्या तटबंदीला महाकोट असे संबोधले जाते. किल्याचा मुख्य भुईकोट असलेल्या महाकोट मध्ये किल्याचे खूप अवशेष आहेत. यानंतर किल्याची मुख्य तटबंदी म्हणजे काळाकोट.
राष्ट्रकूट राज्यातील शिवल्लभ याने इ.स. 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला. दक्षिणेच्या इतिहासात या किल्ल्याला फार महत्व होते. किल्याचा डोंगर हा 60 फूट उंचीचा असून त्याच्या भोवती त्याच्या भोवती 50 फूट रुंदीच्या खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फिट उंचीच्या तासून काढलेल्या कडा चढाई करण्यास अत्यंत कठीण आहेत.
किल्ल्यामध्ये महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस चांदमिनार नावाचा मनोरा दिसतो. मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोऱ्याची उंची 210 फूट असून बुंध्याचा परीघ हा 70 फूट आहे. यामध्ये एकूण चार मजले आहेत. इथे एक पंचधातूंची किल्ले शिकन तोफ ठेवलेली आहे. या तोफेला मेंढा तोफ म्हणूनही ओळखले जाते. किल्यावर असलेले भारतमातेचे मंदिर किल्याची शोभा वाढवणारे आहे. 1950 मध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने 180 स्तंभाच्या या हेमाडपंती मंदिरात भारतमातेची मूर्ती स्थापन केली. या मंदिरासमोर 150 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल हत्ती हौद आहे.
अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेतील पहिले पाऊल दौलताबाद किल्यावरच टाकले होते. हा किल्ला यादव साम्राज्याची राजधानी होता. त्यानंतर इ.स. 1318 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने हरपाळदेवाला ठार मारून हा किल्ला ताब्यात घेतला होता. मुहम्मद तुघळकाने इ.स. 1327 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली होती. त्यानंतर किल्याचे नाव दौलताबाद ठेवण्यात आले. 1950 मध्ये निजामाचे राज्य खालसा केल्यानंतर हा किल्ला स्वातंत्र्य झाला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…