अनुष्का आणि विराट नेहमीच आपल्या नात्याला घेऊन चर्चेत राहिले आहेत मात्र त्यांनी कधीच उघडपणे नात्याची कबुली दिली नसली तरी सोशल साईट्स वर ते दोघे फोटोस टाकत असत. विराट आणि अनुष्काची भेट २०१३ साली एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली आणि तेव्हापासूनच ते दोघे डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या. शेवटी त्यांनी काल इटलीमध्ये अगदी छोट्याच्या समारंभात लग्न केले यात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र शामिल होते.
विरनुष्काच्या लग्नाबद्दल काही खास गोष्टी
१) विराट आणि अनुष्काचे लग्न टूसक्यानी इटली येथे झाले. हे जगप्रसिद्ध ठिकाण असून वर्ल्ड हेरिटेज साईट्स पैकी एक आहे.
२) विराट आणि अनुष्काच्या मेहंदी पासून लग्नापर्यंतच्या सर्व कपड्याचे डिजाइन फॅशन डिजायनार सब्यासाची यांनी केले आहेत. लग्नामध्ये अनुष्कानी पिंक लेहेंगा व सोबतच भरगच्च दागिने घातले होते तर विराटनी बनारसी पॅटर्नची रॉ सिल्क शेरवानी घेतली होती. सांगितल्या जातंय की अनुष्काचा लेहेंगा बनवायला ३० दिवसाचा कालावधी लागला.
३) विराट आणि अनुष्काच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी दिल्ली येथील वेडिंग प्यानर देविका नरेन यांच्याकडे होती. तर जोसेफ राधिका यांनी फोटोग्राफी केलीये. छेफ रितू दालमिया यांच्या कडे खाण्याची पूर्ण जबाबदारी होती.
४) येत्या २१ डिसेंबर रोजी दिल्ली येथे फॅमिलीसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.
५) २१ च्या फॅमिली रिसेप्शन नंतर मुंबई येथे बॉलीवूड स्टार आणि खेळाडूसाठी डिसेंबर २६ ला एक रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे.
६) मुंबई येथील रिसेप्शन आटपल्यानंतर अनुष्का विराट सोबतच साऊथ आफ्रिकेला जाणार आहे. साऊथ आफ्रिकेत जानेवारीमध्ये म्यॅचेस असणार आहेत. नव वर्षाला हे दोघे सोबत राहतील आणि त्यानंतर अनुष्का परत मुंबईला येऊन आनंद राय यांच्या चित्रपटासाठी शूटिंगच्या कामात लागेल यामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान पण आपल्याला दिसणार आहे.
भावी आयुष्यासाठी अनुष्का आणि विराट यांना खासरे परिवारातर्फे खूप शुभेच्छा… माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका..
Credit:- Ashwini Khandagale
लग्न करायच्या आधी ह्या दहा गोष्टी नक्की करा…