केरळ, तामिळनाडू, लक्षव्दीप आणि आता महाराष्ट्र, गुजरातमध्ये ‘ओखी’ वादळानं अक्षरश: थैमान घातलं आहे. पण या वादळाचं नाव ‘ओखी’ कसं पडलं आणि वादळांना नावं कशी दिली जातात हे देखील फारच रंजक आहे. राज्यभरात ‘ओखी’या वादाळाने धुमाकूळ घातला आहे.सोमवारपासून मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरूवात झाली असून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हायअर्ल्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाचे नाव ‘ओखी’कसे पडले याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
वादळाचे नाव ‘ओखी’ कसे पडले?
‘ओखी’ या बंगाली भाषेतील शब्दाचा अर्थ डोळा असा आहे. बांग्लादेशने या चक्रीवादळाला ‘ओखी’ हे नाव दिले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ‘ओखी’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील वादळांना उष्णकटिबंधीय वादळ म्हटले जाते. ओखी’ चक्रीवादळाने तामीळनाडू आणि केरळमध्ये दाणादाण उडवून दिली असून मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
२००० सालापासून वादळाला नाव देण्याची पद्धत सुरु झाली आहे. बदललेल्या जागेनुसार वादळाला नाव दिले जाते. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार, थायलंडने नावे ठरवली आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८, अशी ६४ नावे ठरवलेली आहेत. भारतानं अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावं सुचवलेली आहेत. ‘ओखी’च्या झंझावातामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील किनारपट्टीवरचा समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे 4 आणि 5 डिसेंबर हे दोन दिवस मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: अरबी समुद्रात होणार भुकंप; भारतासह 11 देशांना बसणार फटका
हे आहे दुबईमधील सर्व सामान्य फोटो, सातवा फोटो बघून तुम्ही व्हाल अवाक…