भारतात पुरुषसत्ताक पद्धती चालत आल्या मुळे महिलांना त्यांच्या अधिकारा करिता लढत रहावे लागत आहे. आजही आपल्या अधिकारापासून स्त्रिया अज्ञात आहेत. अनेक क्षेत्र आजही असे आहे ज्यामध्ये फक्त पुरुषांचे वर्चस्व आहे. हा लढा सुरु राहणार परंतु आज आम्ही काही स्त्रियांना देण्यात आलेले मुलभूत अधिकार खासरे वर बघूया आणि जास्तीत जास्त प्रमाणात हि पोस्ट शेअर करा जेणेकरून या अधिकारापासून वंचित असलेल्या एखाद्या महिलेस याची मदत होईल..
रात्री करू शकत नाही अटक: सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सूर्यास्तानंतर कुठल्याही महिलेस रात्री अटक करता येत नाही. सोबत महिला पोलीस शिपाई आवश्यक आहे परंतु त्याही रात्रीच्या वेळी महिलेस अटक करू शकत नाही. अतिशय गंभीर गुन्हा असेल तर न्यायालयास अटकेचे लेखी कारण द्यावे लागते.गोपनीयतेचा अधिकार: बलत्कार पिडीत महिला खाजगीत जवाब देऊ शकतात. त्यावेळी मॅजीस्ट्रेट सोबत असावा लागतो. पिडीत महिला कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकाऱ्यास गुप्त जवाब देऊ शकतात. पोलीस पिडीतेस सर्वासमोर जवाब देण्याकरिता दबाव आणू शकत नाही.
कितीही काळानुसार देऊ शकता तक्रार: अनेक महिला समाज काय बोलेल, कुटुंब इत्यादी कारणामुळे तक्रार देण्याकरिता मागेपुढे पाहतात. अशावेळी महिला तक्रार उशीराही देऊ शकतात. अश्या वेळेस पोलीस तक्रार घेण्यास नकार देऊ शकत नाही. येवढच काय तर महिला इमेल द्वारा हि तक्रार देऊ शकतात.
झिरो FIRचा अधिकार: बलात्कार पिडीत महिलाना झिरो एफआयआरचा अधिकार आहे. पिडीत महिला कुठल्याही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकतात. त्यांना घटना घडली त्याच स्टेशनला तक्रार करणे बंधनकारक नाही आहे.
चौकशीसाठी बोलवू शकत नाही: कोणत्याही महिलेस चौकशी करिता पोलीस स्टेशनला बोलवल्या जाऊ शकत नाही. त्या महिलेची चौकशी घरीच आणि महिला पोलीस सोबत असताना करावी लागते.
गरोदर असलेल्या महिला कर्मचाऱ्याची ती गरोदर आहे म्हणून कामावरून हकालपट्टी करता येत नाही. हे नियमानुसार बंधनकारक आहे.
महिलांना कोणत्याही वेळी कोणत्याही हॉटेल मध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी करता येते. कुठल्याही हॉटेलच्या वाॅशरूम महिला वापरू शकतात. त्यांना नकार देत येत नाही.
कायद्यानुसार एखाद्या हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यास प्रवेश नाकारता येत नाही. आवश्यक असलेले कागदपत्रे घेऊन त्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. महिलांना थेट पोलीस आयुक्त किंवा उपायुक्त यांच्याकडे एखाद्याच्या विरोधात इमेल अथवा रजिस्टर पोस्टच्या माध्यमातून तक्रार नोंदविता येऊ शकते. एखाद्या महिलेस अटक केल्या नंतर तिला २४ तासात न्यायालयात हजर करावे लागते. विना न्यायालयात हजर करता तिला पोलीस कोठडीत ठेवता येत नाही. एखाद्या अविवाहित पुरषाने एखाद्या महिलेसोबत शारीरक संबंध ठेवले तर तो गुन्हा ठरत नाही. दोघाच्या सहमतीने संबंध असेल तर तो गुन्हा नाही. मुलगी आणि मुलगा दोघेही आई वडिलाच्या संपत्तीचे समान हक्कदार असतात. कायद्यानुसार दोघाचाही वाटा सारखाच असतो. लग्नाला किमान एक वर्ष पूर्ण झाल्या शिवाय कुठल्याही दांपत्यास घटस्फोटाकरिता अर्ज करिता येत नाही. किमान एक वर्ष पूर्ण होऊ द्यावे लागतात. पोलीस अधिकार्याने एखाद्या महिलेश चौकशी अथवा अटक करताना तो पोलीस आहे अशी ओळख व्हावी असा पेहराव असणे आवश्यक आहे. आणि एखाद्या महिलेवर थेट व्यभिचाराचा आरोप लावता येत नसतो.
सार्वजनिक ठिकाणी जोडीदारास मिठी मारणे अथवा कीस करणे हा गुन्हा नाही आहे. महिलेची तक्रार घेण्यास नकार देणे अथवा टाळाटाळ करणे याकरिता संबंधित अधिकार्यास ६ महिने ते २ वर्षापर्यंतचा तुरंगवास होऊ शकतो. विवाहित जोडप्यास दोन मुले किंवा दोन मुली दत्तक घेता येत नाही. एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये त्यांना दत्तक घेता येतात. पुरुष एकता असल्यास त्याला मुलगी दत्तक घेता येत नाही. एखाद्यास अटक झाली तर ती कोणत्या कारणाकरिता अटक करण्यात येत आहे हे त्याला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. एखाद्याचा रेकॉर्डेड फोन न्यायालयात आता पुरावा म्हणून ग्राह्य घरला जात आहे. बलात्काराचे जर प्रकरण असेल तर पिडीतेस मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार देखील आहे. पिडीतेस तक्रार न करता वैद्यकीय तपासणी करिता डॉक्टरकडे जाण्याचा अधिकार आहे. बलात्कार झाला किंवा नाही झाला यामध्ये डॉक्टरचे मत हा अंतिम पुरावा मानला जातो.
कामाच्या ठिकाणी महिला आणि पुरुष कर्मचार्यांना समान वेतनाचा अधिकार आहे.
वरील प्रमाणे काही महत्वाचे अधिकार महिलांना देण्यात आलेले आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी…