मित्रानो पैलवानांना खूप मेहनत केल्यानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी खूप प्रकारचे खुराक खायला लागते,त्यात तूप ,दुध ,केळी ,हंगामी फळे इत्यादिबरोबर रोज घेतला जाणारा असा एक म्हणजे थंडाई. हल्ली बाजारात अनेक शितपेयांनी उधाण मांडलेले दिसते. निरनिराळ्या सॉफ्ट ड्रिंक्स आपल्या प्रतिष्ठेची केंद्रे बनत आहेत. एकीकडे खालावत निघालेले स्वास्थ्य आणि जाहिरातबाजींच्या माध्यमातून चुकीच्या वस्तू आपल्या माथी मारल्या जात आहे. थंडाई या सर्वावर रामबाण इलाज आहे आज खासरेवर बघूया थंडाई घरी कशी बनवतात…
थंडी हे एक असे मिश्रण असते जे प्यायल्यानंतर शरीराची झीज ९५ % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते .
साधारण माणसाने सुध्दा आठवड्यातून २-४ वेळा घरीच थंडाई करून प्यावी. शरीरातील उष्णता लगेच कमी होते,ताकत प्रचंड प्रमाणात वाढते ,हाडे मजबूत होतात. त्यासाठी कृती खाली देत आहे . जरूर करा आपापल्या घरी हे ट्राय करा
साधारण १/२ लिटर थंडीची कृती देतोय .
साहित्य १)बदाम ३० नग (ज्यांना रोज करायची असेल त्यानी एकदम ५ किलो आणून ठेवावे महिनाभर जाईल) २) खसखस ३ चमचे ( थंडीच्या दिवसात हिंग घालावी ) ३) बडीशेप -५ चमचे ४ ) वेलदोडे ४ नग ५ ) १/२ लिटर दुध ( थंड असेल तर उत्तम ) नसेल तर पाणीही चालेल ६ ) साखर १ कप
कृती
मिक्सर किंवा दगडी कुंडी मध्ये मध्ये २५ बदाम टाकून बारीक पूड करून घेणे .कुंडी वापरत असला तर लिंबाच्या काठीने बारीक कुटावे. त्याचप्रमाणे खसखस ,बडीशेप ,वेलदोडे एकत्रपणे मिक्सर मध्ये टाकून त्याचीही पूड करून घेणे. पुन्हा त्या बदामाची पूड मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकणे आणि ३-४ कप दुध टाकून पेस्ट करून घेणे. त्यामध्ये खसखस,बडीशेप, वेलदोडे यांची पूड टाकणे. आता २-३ /२-३ कप असे दुध वाढवत जावा आणि मिक्सर ने ते मिक्स करत जा .शेवटी संपूर्ण दुध ज्यावेळी संपेल त्यावेळी २ मिनिटे मिक्सर चालू ठेवा. तयार मिश्रणावर फेस आल्यासारखा दिसेल .आता ते मिश्रण एका सुताच्या वाळलेल्या फडक्यातून गाळून दुसर्या तांब्यात घ्या. यामुळे संपूर्ण चोथा बाजूला होईल. त्यानंतर १ कप साखर घालून सरबत जसा खालीवर करतो त्याप्रमाणे करून घेणे. नंतर ते पिण्यास योग्य असेल.
अशाप्रमाणे तुम्ही घराच्या घरी थंडाई करू शकता.कृती अवघड नाही पण १० मिनिटे वेळ लागतो .लग्न झाले असेल तर बायकोला एकदा कृती शिकवा म्हणजे घरी आल्यावर आयती थंडाई तयार मिळेल. कारण हा त्रास मला माहिती आहे. पण जो खूप कुस्ती मेहनत करतो अथवा बॉडी-बिल्डींग करतो किंवा कोणताही मैदानी खेळ खेळतो त्याने थंडाई अवश्य घ्यावी खूप ताकत मिळते त्यातून.
दगडी कुंडीवर बनवण्याची कृतीविडिओ पहा
साभार गणेश मानुगडे फेसबुक पेज लिंक कुस्ती मल्लविद्या वेबसाईट WWw.kustimallavidya.org
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
कुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का?