Monday, February 6, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

एकेकाळी रस्त्यावर विकायचे भाजीपाला आज आहेत अब्जोधीश, वाचा डीएसकेंचा प्रवास…

Mukund Solanke Patil by Mukund Solanke Patil
November 28, 2017
in प्रेरणादायी
0
DS Kulkarni

गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आलीये. त्यामुळे गुंतवणूकदार चांगलेच गोत्यात आलेले आहेत. त्यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके यांचीही अडचण झालीये. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डीएसके यांचा आता पर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी राहिलाय. पण सध्या ते खूप वाईट काळातून जात आहेत. डीएसकेनी घर विकता विकता लोकांच्या भावनांनाही हाथ घातला आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातील घर देऊन त्यांच्या मनांवर राज्य केलं. पण आता मात्र लोकांची अडचण झाली आहे. डीएसकेंच्या मार्केटमध्ये असलेल्या वेगळ्या ओळखीमुळे गुंतवणूकदार त्यांच्याकडे आकर्षित झाले. पण आता गुंतवणूकदारांची अडचण झाली आहे. गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने लोकांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यांचा ड्रीम सिटी प्रोजेक्ट पासून त्यांची गाडी रुळावरून घसरली. स्वप्नवत वाटणाऱ्या या प्रोजेक्टसाठी डीएसकेंनी आपली पूर्ण आर्थिक टाकत लावली. पण हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला नाही. आज खासरेवर बघूया शून्यातून विश्व निर्माण करणारे बांधकाम व्यावसायिक डीएसके यांचा जीवनप्रवास.

दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके हे पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आहेत. डीएसके बिल्डर्स म्हणून ओळख असणाऱ्या डीएसकेंच ‘घराला घरपण देणारी माणसं’ हे प्रसिद्ध घोषवाक्य आहे. त्यांच्या उद्योगांचा वार्षिक टर्नओव्हर 1600 कोटींच्या वर आहे. डीएसके यांचा पुण्यातील कसबा पेठेत जन्म झाला. त्यांची आई शिक्षिका तर वडील हाय एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये वाचमन म्हणून काम करायचे. डीएसकेंच्या परिवारात आई वडील, तीन भाऊ आणि एक बहीण होते. डीएसकेंच घर जेमतेम दीड खोलीचे होते. त्यांचे मित्र छोटे मोठे व्यवसाय करायचे. डीएसके सुद्धा त्यांच्या सोबत जायचे आणि त्यांना मदत करायचे. पुढे त्यांनी पेपर टाकण्याची लाईन निवडली. हा डीएसके यांचा पहिला व्यवसाय होता. सायकलवर कॅम्पमध्ये जाऊन ते पेपर विकायचे. याशिवाय दिवाळीत फटाके विकणे, काकांच्या भाजीच्या गाड्यावर भाजी विकणे असे व्यवसाय सुद्धा केले.

एमएस कॉलेजला असताना डीएसके दीड-दोन महिन्यांकरीता किर्लोस्कर ऑइल इंजिन मध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगला गेले होते. तिथे त्यांना टेलिफोन साफ करण्याची नवीन आयडिया मिळाली. याचदरम्यान त्यांनी आपल्या ज्योती नावाच्या मैत्रिणीशी प्रेमविवाह केला. त्यांनी टेलीफोनची आयडिया ज्योतीला शेअर केली. त्यांना सुद्धा ती आवडली. यासाठी लागणारं भांडवल त्यांनी ज्योती यांचे कानातील 2 एअररिंग विकून उभा केलं. 72 रुपये भांडवलावर उभा राहिलेला टेलिफोन क्लीनिंग सर्व्हिसेस-टेलिस्मेल हा त्यांचा पहिला बिझनेस. महिन्याला यातून त्यांना सरासरी 2 हजार रुपये मिळायला लागले. 2 हजार रुपयांत निव्वल नफा 1200 ते 1400 रुपयांचा असे. त्यावेळेस बँक मॅनेजरला सुद्धा एवढा पगार नसायचा. पुढे त्यांच्या स्वतःच्या ऑफिसला त्यांनी इंटेरिअर चा खर्च परवडणार नाही म्हणून स्वतः इंटेरिअर केले. त्यांना यातून आयडिया अली की यामध्ये 40% निव्वळ नफा होऊ शकतो. त्यांनी या धंद्यात जायचा निर्णय घेतला आणि पेंट ऑल नावाची कंपनी चालू केली. पुढे ते एक-एक करत अनेक क्षेत्रात आपले पाय रोवत गेले. फर्निचर, वॉटर प्रुफिंग, प्लांबिंग, जुनी फारशी बदलून देणं(फ्लोअरिंग), मेन गेट लोखंडी करणे या सर्व गोष्टी करण्यास त्यांनी सुरुवात केली. 1973 ते 1980 ला ते घरातला कोपरा न कोपरा दुरुस्त करू लागले. लोकांची बिघडवलेली घरं दुरुस्त करत असताना आपण घरं दुरूस्त करण्यात आपण ताकद घालवतोय हे त्यांच्या लक्षात आले. त्याऐवजी स्वतःच घर बांधण्याचं त्यावेळी ठरवलं आणि 1980 साली ते बिल्डर झाले.

बांधकाम व्यावसायिक म्हणून उभारल्यानंतर त्यांनी सोबतच टोयोटाची एजन्सी, जनरल मोटर्सची एजन्सी, ऐरोमा केमिकल्स, हॉटेल व्यवसाय आणि आजकाल परवलीच्या धंद्यात अर्थात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अशा अनेक व्यवसायात त्यांनी पाय रोवले. डीएसके त्यांची एक जुनी आठवन फार गमतीने सांगतात.ती म्हणजे, बंगळुरूला वडापाव आणायला गेलो अनो टोयोटा घेऊन आलो. डीएसकेंची जंगली महाराज रोडला एक छान जागा होती. तिथे त्यांना हॉटेल सुरुवात करायची होती. त्यांनी मॅक्डोनाल्ड कडे फ्रांचायजी मागितली पण त्यांनी पुण्यात ती देण्यास नकार दिला. बंगरुळू ला घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तिथे त्यांच्या मित्राच्या मुलाच्या शोरूमला भेट दिली. त्यांना हा व्यवसाय खूप आवडला आणि त्यांनी डीएसकेचं भव्यदिव्य शोरूम सुरू केलं. याच शोरूमला पुढे जगातील बेस्ट डीलरचा अवार्ड मिळाला.

डीएस कुलकर्णीनी सामाजिक आणि शैक्षणिक गरजांसाठी डीएसके फाउंडेशनची निर्मिती केली. त्यांच्या या फाउंडेशनने अनेक उपक्रम राबविले. डीएसके हे स्वतः एक चांगले लेखक असून त्यांच्या जाहिराती ते स्वतः लिहितात. डीएसके यांच्या दिवंगत पत्नीच्या नावाने ज्योती फाउंडेशन आहे. त्यांच्या जन्मदिनी ज्योती सन्मान दिनी हे फाउंडेशन गुणवान स्त्रियांना पुरस्कार देते.

घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंच असं का झालं?

2014 पर्यंत डीएसकेंच सर्व काही सुरळीत होतं. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला तेव्हा पासून त्यांची गाडी रुळावरून घसरली. स्वप्नवत वाटणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये कल्पनेच्या पलीकडचं बिश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. मात्र या स्वप्नाच्या मागे धावताना डीएसकेंना त्यांच्या इतर उद्योगामध्ये जो नफा मिळाला होता तो टाकावा लागला. मात्र हा प्रकल्प काही सुरू होऊ शकला नाही. आणि इथूनच डीएसकेंच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहचवल्याचा आरोप होतोय.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
१०x१० ची खोली ते १००० करोड रुपयाच्या कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड…

Loading...
Tags: Businessmands kulkarnidsk
Previous Post

आयुष्यात स्वप्न बघायला वयाची अट नसते.. बिसलेरीचे संस्थापक खुशरू संतूक

Next Post

हिवाळ्यातील उन्हाचे चमत्कारिक फायदे एकदा अवश्य वाचा…

Next Post
हिवाळ्यातील उन्हाचे चमत्कारिक फायदे एकदा अवश्य वाचा…

हिवाळ्यातील उन्हाचे चमत्कारिक फायदे एकदा अवश्य वाचा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In