भारतात शुद्ध पाण्याचा व्यवसाय जवळपास ७००० करोड रुपयाचा आहे. यामध्ये सर्वात वर कोणाचे नाव घेतले जात असेल तर ते नाव निर्विवाद बिसलेरीचे आहे. खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी पाणी बॉटलला लोक बिसलेरी द्या म्हणतात. बिसलेरी एक ब्रांड बनलेला आहे. आता सर्वात विशेष गोष्ट हि आहे कि वयाच्या ८५व्या वर्षीही ते नवनवीन उद्योग सुरु करत आहेत. चला बघूया आज खासरेवर खुशरू संतुक यांचा खासरे प्रवास..
या कंपनीची स्थापना एका पारसी परिवारातून येणाऱ्या खुशरू संतुक यांनी केलेली आहे. मुंबईतील पॉश एरिया मलबार हिल मधील हे कुटुंब अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय वकील या कुटुंबात आहे. खुशरु संतुक यांना लहानपणापासून टेनिस खेळाची आवड अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी भाग घेतलेला आहे. परंतु परिवारातील वारसा पुढे चालविण्याकरिता त्यांनी वकिलीचा अभ्यास केला. शासकीय विधी महाविद्यालयातून वकिलीची पदवी पूर्ण केल्यानंतर वडिला सोबत ते वकिली सुरु करणार होते, तेव्हा त्याच्या मित्र परिवारातील एकाने त्यांना बिझनेस सुरु करण्याचा प्रस्ताव दिला. त्या मित्राचे नाव रोसीस होते. रोसीस यांचे कुटुंब भारतात मलेरियाच्या औषधाचा उद्योग चालवत असे त्यांचा कंपनीचे नाव बिसलेरी हे होते. खुशरू यांचे वडील हे अमाप संपतीचे मालक होते त्यामुळे रोसीस यांनी त्यांना त्याच्या धंद्यात पार्टनर बनविले. त्या वेळेस बिसलेरी नामक एक छोटस ऑफिस मुंबई येथे डीएन रोडवर होते.
रोसीस यांचे संबंध वेंकटस्वामी नायडू आणि देवराजुलू सारख्या भारतातील बड्या उद्योगपत्यासोबत होते आणि त्यांचा या लोकावर विश्वास सुध्दा होता. तेव्हा त्यांनी खुशरू यांना भरवश्यात घेऊन बॉटलबंद पाण्याचा व्यवसाय सुरु केला. हा काल होता १९६५ चा खुशरू त्या दिवसाची आठवण करत सांगतात कि रोसीस एक शक्तिशाली इटालियन बिझनेसमन होते. त्या सोबतच मुंबईमधल्या पाण्याची गुणवत्ता खराब होती त्यामुळे अनेक लोक बिमार पडत असे. त्याकाळात बॉटल मध्ये पाणी हा विचार कोणीही करत नसे. लोकांना वाटायचं हे फक्त उच्चभ्रू लोका करिता आहे. खुशरु यांनी रोझी सोबत मिळून लोकांचा हा भ्रम दूर केला. रोसी यांचा इटली मध्ये सुध्दा एक व्यवसाय होता “फेरो चायना” नावाणे ते वाईन बनवत असे. या सोबत थोड्या फार प्रमाणात ते पाण्याचेही उत्पादन करत असे. त्यांनी मुंबई मधील ठाणे येथे वागळे स्टेटमध्ये आपली कंपनी सुरु केली. जिथे पाण्याला डीमिनरलाईज केल्या जात असे त्यामुळे पाणी शुद्ध होत असे. परंतु नंतर लक्षात आले कि हे पाणी पचना करिता उपयुक्त नाही आहे कारण त्यामध्ये सोडियम आणि पॉटेशियम वापरल्या जात होते. यामुळे त्यांच्यावर भयंकर टीका झाली. लोकांनी त्यांना विनाकारण करत असलेले काम म्हटले परंतु खुश्रू आपल्या प्रयोगावरून हटले नाही.
खुशरू हरले नाही आणि त्यांनी हार न मानायचे ठरविले होते. त्यांचे वडील टाटा कंपनीत डायरेक्टर होते. त्यांना टाटा मधून संधी चालत आली आणि त्यांनी टाटामध्ये काम करण्यास सुरवात केली. त्यांनी १९६८ मध्ये लैक्मे सोबत काम केले आणि त्यानंतर अनेक छोट्या कंपन्यासोबत ते जुळत गेले. त्यांनी जवळपास ३० वर्षापर्यत टाटाच्या कंपन्याकरिता काम केले. ज्यामध्ये टाटा ऑइल मिल्क कंपनी, फायनान्स कंपनी पासून तर टाटा मैग्रो हिल, टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा बिल्डिंग सारख्या अनेक कंपन्या होत्या. त्यावेळेस टाटाचा व्यवसाय रशिया बरोबर होत असे. परंतु टाटाना पैश्याच्या मोबदल्यात रशिया कडून वस्तू मिळत असे. कारण रशिया कडे डॉलर नव्हते. इथून जेवढे साहित्य पाठविल्या जात असे त्या मोबदल्यात टाटाना औषधे आणि इतर वस्तू मिळत असे. यानंतर टाटानी अनेक उत्पादने केली आणि खुशरू यांच्या सोबत त्यांनी व्यवसाय इटली पर्यंत नेला. त्यांच्या देखरेखी खाली खोकल्याच्या औषधापासून ते स्कीन क्रीम सुध्दा बनविल्या जात असे जी इटलीला निर्यात होत असे. खुशरु यांना आर्केस्टाची भारी आवड होती. त्यांनी या दरम्यान जगातील अनेक संगीतकारासोबत अनेक रेकॉर्ड रिलीज केले. त्यांनी जर्मनी, इटली, जपान, रूस आणि इंग्लैंड सारख्या देशात सुध्दा म्यूजिक रिकॉर्ड एक्सपोर्ट केले. वयाच्या ६५व्या वर्षी सन २००० मध्ये खुशरु यांनी या कामातून निवृत्ती घेतली. ते सांगतात पूर्ण आयुष्यात त्यांनी आतापर्यंत फक्त २ महिने आराम केला आहे. फक्त २ महिने ते कामापासून दूर होते. त्यानंतर ते त्यांच्या आवडीकडे वळले त्यांनी जगभरात अनेक प्रसिद्ध आर्केस्टा सोबत काम करणे सुरु केले महाराष्ट्रात सुध्दा त्यांनी अनेक कार्यक्रम घेतलेली आहे.
खुशरु यांनी बिसलेरीची स्थापना करण्यापेक्षा आर्केस्टा चालविणे कठीण आहे असे सांगतात. २०१९ मध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम जर्मनी आणि इंग्लंड मध्ये आहे. सध्या त्यांचे वय ८१ वर्ष आहे परंतु आजही संपूर्ण एकाग्रतेने ते काम करत असतात. त्यांचा पहिला धंदा जास्त दिवस चालला नी परंतु त्यांनी हिम्मत नाही सोडली. ते सांगतात कि आयुष्यात एकच काम करत नाही बसावे. आणि वयाची अट स्वप्ने बघण्याकरिता नसते. कामाच्या प्रती इमानदारीने काम केल्यास यश नक्की मिळते असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यांच्या या भन्नाट प्रवासा करिता खासरे कडून त्यांना भरपूर शुभेच्छा… माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
१०x१० ची खोली ते १००० करोड रुपयाच्या कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड…