अनेकदा आपण बघतो की मुलगा आपल्या वडिलांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग ते त्यांच्या जिवंतपणी असो किंवा मृत्यूनंतर. पण आज एका पित्याने आपल्या मुलाची अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. करणार पण का नाहीत, कारण त्यांच्या मुलाने देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. ज्या उंच ठिकाणी (डोंगरावर) तो तैनात होता तिथे त्याच्या वडिलांनी किंवा कुटुंबातील कोणी सदस्यांनी एकदा यावं, अशी त्याची इच्छा होती. चला तर जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती. वडिलांकडून आपल्या मुलाची अंतिम इच्छा पूर्ण केल्याची पोस्ट भारतीय सैन्याचे माजी अधिकारी आणि केंद्र सरकार मध्ये मंत्र्यांनी आपल्या फेसबुकवर टाकली होती.
परिवारासाठी दिला होता अंतिम संदेश-
कारगिल युद्धाच्या वेळेस एका अति महत्त्वाच्या डोंगरावर भारतीय तिरंगा फडकवण्याच्या प्रयत्नात 22 वर्षीय कॅप्टन विजयंत थापर हे शहीद झाले होते. जाता जाता त्यांनी एक अविश्वसनीय विजय भारताच्या पदरात टाकला होता जो की त्या युद्धाचा एक निर्णायक क्षण होता. कॅप्टन थापर यांनी आपल्या परिवारासाठी जो संदेश सोडून गेले तो वाचल्यावर प्रत्येकाचे डोळे पाण्याने भरून येणे साहजिक आहे. त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती, ज्यात त्यांनी आपल्या परिवारातील कोणीही एका सदस्याने त्या उंच पर्वतावर यावे आणि बघावे की सैनिक देशासाठी कसे विरतेने लढतात.
प्रत्येक जन्मात करू इच्छितात देशसेवा-
त्यांनी आपल्या पत्रात अजूनही काही गोष्टी लिहिल्या होत्या. त्यांनी लिहिलं होतं की त्यांना कुठल्याही गोष्टीचं दुःख नाहीये, आणि ते जर पुढील जन्मात माणूस बनले तर ते पुन्हा भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करू इच्छितात. त्यांची इच्छा होती की त्यांचे बलीदान अन्य सैनिकांना प्रेरणा देणारं ठरावं. सोबतच त्यांची मरणानंतर अवयव दानाची सुद्धा इच्छा होती.
वडिलांनी उचलला विडा-
कॅप्टन विजयंत थापर यांचे वडील कर्नल विजेंद्र थापर यांनी आपल्या मुलाची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा विडा उचलला. परंतु कर्नल थापर यांच्यासाठी 58 व्या वर्षी 16000 फूट उंच चढणे सोपे काम नव्हते. तरुण मुलगा गमावल्याचं दुःख माणसाला असह्य वेदना देऊन जातं. परंतु वडिलांनी आपल्या मुलाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या पर्वताकडे वाटचाल सुरू केली. म्हातारे पाय, त्रासदायक तापमान आणि हवेचा दाब आणि कठीण असा चढ. आल्या मुलाचे अंतिम पत्र घेऊन एक एक पाऊल टाकत कर्नल थापर चढत गेले आणि शेवटी हा विशाल पर्वत त्यांच्या दृढ निश्चयापुढे छोटा सिद्ध झाला.
वीर पिता-पुत्राला सलाम-
जनरल व्हीके सिंह यांनी सांगितले की हा प्रवास एका मुलाच्या अंतिम इच्छापूर्ती साठी एका वडिलांची तीर्थयात्राच होती. अभिमानाने म्हणा की आपलं सैन्य हे भारतीय सैन्य आहे. इथे देशाची सुरक्षा ही बंदुकीने नाही तर त्याग, मान आणि चारित्र्याने करणे हे एक मर्यादा आहे. या वीर पिता पुत्राला सलाम.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
हजारो चीनी सैनिकांना पुरून उरला एकटा भारतीय जवान.. ७२ तासात पाठविले ३०० चीनी सैनिक यमसदनी पाठविले..