हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात समालखा हे एक छोटं गाव आहे. या गावाला यापूर्वी विशेष अशी काही ओळख नव्हती. परंतु आता या गावाला एक ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख गावातील एक प्रतिभावान मुलगी जान्हवीने दिली आहे. अवघे 13 वर्षे वय असणारी जान्हवी बारावीमध्ये शिक्षण घेतेय. हे ऐकुन तुम्हाला धक्का बसेल पण हे खरं आहे. परंतु हे तर काहीच नाही, भारतातल्या एका ग्रामीण भागात शिकलेल्या जान्हवीला हिंदी, हरियानवी सोबतच ब्रिटिश आणि अमेरीकन सारखी इंग्लीश सुद्धा बोलता येते. 13 वर्षाची जान्हवी पवार टीव्ही चॅनेल बघून हुबेहूब अँकर सारख्या बातम्या सुद्धा बोलते. यामध्ये काहीच शंका नाही की जान्हवीचा मेंदू थोडा जास्तच विकसीत झाला आहे. पण यामागे त्यांचे वडील यांचे विचार आणि त्यांची स्वतःची मेहनत सुद्धा सामील आहे.
आजपासून जवळपास 3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जवळपास सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय चॅनेलवर गुगल बॉय आणि कौटिल्यचे नाव चर्चेत होते. जान्हवीची माहिती पूर्ण जगभरात दाखवली जात होती, तेव्हा ती फक्त नवव्या वर्गातून दहावीमध्ये जात होती. आज ती बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. जान्हवीने सांगितले की तिच्या वडिलांनी लहानपणीपासुनच इंग्लिशचे तालीम देण्यास सुरुवात केली होती. तिला इंग्लिशमध्ये असणाऱ्या जवळपास सर्वच मूलभूत शब्दांची माहिती झाली होती. यानंतर जान्हवीला अवघं 2 वर्षे वय असतानाच शाळेत पाठवलं गेलं होतं. शाळेत तिच्या शिक्षकांच्या लक्षात आले की जान्हवी ती शिकत असलेल्या पुढील वर्गातील पुस्तके वाचत आहे. त्यानंतर तिला पुढच्या वर्गात पाठवण्यात आले.
हा सिलसिला असाच चालू राहिला आणि जान्हवीे अवघ्या 9 व्या वर्षी 9 वी मध्ये पोहचली. तरी पण तिचे पूर्ण लक्ष इंग्लिश शिकण्याकडेच होते. आशादीप पब्लिक स्कुलमध्ये जान्हवीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तिने यासोबतच अमेरिकन आणि ब्रिटिश शैलीमध्ये इंग्लिशवर मजबूत पकड बनवली. जान्हवीने हे दाखवून दिले की कोणतीही इंग्लीश बोलणे एवढे काही अवघड काम नाहीये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जान्हवीच्या जगात इंग्लीश शिकवण्यासाठी शाळेत साधे शिक्षक सुद्धा नव्हते. इंग्लिश शिकण्यासाठी तिने इंटरनेटचा चांगला वापर केला. युट्यूबवर व्हिडिओ बघून तिने इंग्लीश मध्ये नैपुण्य मिळवले. एवढेच नाही तर ती स्वतः सुद्धा आता युट्युबवर इंग्लीशचे क्लासेस घेते.
तसे तर नियमानुसार 10 वीची बोर्डाची परीक्षा देण्यासाठी कमीत कमी वय 15 वर्षे असणे बंधनकारक आहे. परंतु हरियाणा सरकारने जान्हवीला खूप कमी वयात ही परिक्षा देण्याची परवानगी दिली. जान्हवीचे आयएएस बनण्याचे स्वप्न आहे, पण यासाठी लोकसेवा आयोगाच्या नियमानुसार ग्रॅज्युएशनचे शिक्षण आवश्यक आहे. सोबतच 21 वर्षं वय पूर्ण असणे सुद्धा आवश्यक आहे. जान्हवी यासाठी सवलत मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे.
भाषे व्यतिरिक्त तिची सामान्य ज्ञान मध्ये सुद्धा चांगली पकड आहे. ती बऱ्याच मुद्यावरील सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरे देते. याशिवाय ती अवघ्या 50 सेकंदात विज्ञानाची आवर्त सारणी बोलते. ती खूप छोटी असताना तिला शाळेत मंचावर सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आली होती. ती इंग्लिशमध्ये सूत्रसंचालन करून सर्वाना प्रभावित करायची. जान्हवीला शाळेत मोफत शिक्षण दिले जात असे. जान्हवीचे वडील ब्रिजमोहन हे शिक्षक आहेत.
जान्हवी बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन मोटीवेशनल स्पीच पण देते. आता सध्या ती बारावी उत्तीर्ण होऊन IIT-JEE ची तयारी करू इच्छिते. 12 वर्षाच्या जान्हवीने हरियाणाच्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या समोर 8 राज्याच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भाषणही केले आहे. तिला बऱ्याच शाळा आणि विश्वविद्यालयामध्ये वक्ता म्हणून निमंत्रण येतात. जान्हवीच्या टॅलेंटने सर्वाना अचंबित केले आहे.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे खासरे पेज लाईक करायला विसरू नका…
कौतुकास्पद: 12 वर्षाची ही मुलगी गाते तब्बल 80 भाषांमध्ये गाणे…