फेकून देतो त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? केळीच्या सालीचा तुम्हाला काय उपयोग होतो हे जर समजलं, तर तुम्ही केळीची साल लगेच फेकणार नाहीत. केळीची साल अनेक गोष्टीत कामात येते. चला तर बघूया केळीच्या सालीचे फायदे खासरेवर
१.केळ्याची सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.
२.पिकलेल्या केळीची साल दातांना लावली तर दात पांढरे होतात, मात्र कच्ची केळी खाल्ले तर दात काही दिवस पिवळे राहतात.
३.केळ्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने डाग दूर होतात. तसेच त्वचेमध्ये चमक येते.
४. केळ्याच्या सालीमधील सफेद धागे काढून त्याल अॅलोव्हेरा जेल मिसळा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील.
५. केळ्याची साल चामखीळवर रगडल्याने ते दबून जातात.
६. लेदर बॅग, बेल्ट, शूज खराब दिसू लागले तर त्यावर केळाची साल रगडल्यास चमक येईल. ७. डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर केळीची साल थोडावेळ डोळ्यावर ठेवा, आराम मिळेल.
८. एखाद्या मधमाशीने, किड्याने दंश केला असेल तर त्याठिकाणी केळीची साल बारीक करून लावल्यास आराम मिळेल.
९. शरीरात एखाद्या ठिकाणी वेदना होत असतील तर त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळीची साल लावावी, आराम मिळेल.
१०. चेहर्यावरील सुरकुत्यांमुळे त्रस्त असाल तर अंड्याच्या बलकामध्ये केळीची साल मिसळून चेहर्यावर लावल्यास सुरकुत्या नष्ट होतील. ही पेव्स ५ मिनिट चेहर्यावर लावून ठेवावी, त्यानंत चेहरा स्वच्छ धुवावा.