इंगळगी दीड दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. आज दुष्काळामुळे पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. शिवारात कुठेच चारा नसल्याने माजी सरपंच, निवृत्त शिक्षक इनोंदगी कोते यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली होती. पुढचा मागचा कुठलाही विचार न करता कोते गुरुजींनी आपला ३० एक्कर मोडून जनावरांकरिता छावणी सुरु केली आणि ३०० जनावरे जगली. हे तर काहीच नाही पुढे कोते गुरुजीने केलेले काम अतुलनीय आहे चला बघूया खासरेवर हे काम…
इनोंदगी कोते असं या ७५ वर्षीय निवृत्त शिक्षक असून त्यांनी तब्बल एक किलोमीटर लांबीचा, तीस मीटर रुंद आणि दहा फूट खोलीचा बंधारा बांधला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या इंगळगी गावातला हा बंधारा सध्या चचेर्चा विषय ठरलाय. तसाच तो गावक-यांच्या अभिमानाचाही. इनोंदगी कोटे हे निवृत्त झाल्यापासून वडिलोपार्जित शेती करतात. पण गावक-यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून पदरमोड केला आणि कायमस्वरुपी मजबूत बंधारा निर्माण केला. जवळपास बारा दिवस हे काम चाललं. बाहेर गावातून यंत्रसामग्री मागवली. स्वत: दिवसरात्र वेळ दिला. पाच लाखांचा खर्च आला. सध्याच्या शेतीसाठीच्या प्रतिकूल परिस्थितीत पाच लाखांचा खर्च करणं तसं जिकिरीचं काम. पण लोकांची सोय होते म्हणून मोठ्या मानाने पदरमोड करणा-या कोटे गुरुजींनी हे काम तडीस नेलं.
वर्षानुवर्षे जे काम शासनाला जमलं नाही ते कोटे गुरुजींनी बारा दिवसात करून दाखवलं. हांजगी, तिलाटी, आचेगाव, इंगळगी या गावांना या बंधा-याच्या पाण्याचा उपयोग होणार आहे. या वयोवृद्ध आणि दिलदार शिक्षक सोबतच शेतकर्याच नाव गावातला प्रत्येकजण अभिमानाने घेतोय. समाजात आज असे लोक फरक कमी प्रमाणात आढळतात त्यापैकी एक कोते गुरुजी हे आहे. आज ज्या ठिकाणी हा बंधारा निर्माण झालाय तो एक ओढा होता. प्रयेक वर्षी पडलेला पाऊस या ओढ्यातून वाहून जायचा. नागमोडी वळणाचा हा ओढा तसा निरुपयोगी ठरला होता. गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे ओढ्याच्या दुरुस्तीची मागणी केली. अखेर कोटे गुरुजींनी गावकऱ्यांची ही मागणी स्वखर्चातून पूर्ण केली. दतीला धावून येणाऱ्या कोटे गुरुजींच्या दातृत्वाला तोड नाही.
कोते गुरुजींना खासरेचा सलाम.. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..