विदर्भातील यवतमाळ जिल्ह्य़ातुन आपली राजकीय कारकीर्द शुन्यातुन सुरू करणारे लढवय्ये नेते, मातब्बर राजकारणी, सत्तेची हाव नसणारे, आपल्या हयातीत फक्त आणि फक्त गोरगरीब जनतेच्या हितासाठी लढणारे, नेते म्हणजे आदरणीय भाऊ जाबुवंतराव धोटे. भाऊनी आपली राजकीय छाप महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण देशात निर्माण केली. एके काळी स्वतः इंदिरा गांधीजीनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर भाऊना दिली होती. अश्या या मातब्बर लोकनेत्या विषयी आज खासरेवर माहिती बघूया..
अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात भाऊ जाबुवंतराव धोटे यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला होता. पण त्यांनी पदवीचे शिक्षण अर्धवट सोडले. पुढे यवतमाळच्या नगर परिषद शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून करिअरला सुरूवात केली. तत्कालीन आमदार व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब घारफळकर यांच्या माध्यमातून त्यांना ही नोकरी मिळाली होती. भाऊचे मन हे नौकरीत काही रमले नाही त्यांनी जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध यवतमाळच्या नगर परिषद वॉर्ड क्रमांक 12 मधून त्यांनी निवडणूक लढवली. दर्डांचा पराभव करून राजकीय मैदानात उडी घेतली. जांबुवंतराव धोटे यांची ही उडी राजकीय किरकिर्दीत अत्यंत मोलाची ठरली. पुढे त्यांनी वसंतराव नाईकांसारख्या 11 वर्ष मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या बलाढ्य नेत्याला सळो की पळो करून सोडले होते. अल्पावधितच जांबुवंतराव हे नाव लोकांच्या हृदयावर कोरले गेले.
१९६४ मध्ये आमदार असताना त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांना सभागृहात पेपर वेट फेकून मारला होता. दुष्काळी परिस्थितीवर बोलू न दिल्याने त्यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. देशातील ही पहिलीच कारवाई होती. डिसेंबर १९६४ मध्ये आमदारकी रद्द केल्याने पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून त्या जागेवर पुन्हा जाबुवंतरावच ८ हजार ८८८ मतांनी विजयी झाले. ज्यांचे सदस्यत्व सभागृहाने रद्द केले होते ते जांबुवंतराव रुबाबात पुन्हा विधानसभेत आले. निवडून आल्यावर पुन्हा शपथ घेण्यासाठी अध्यक्षांनी नाव पुकारले. त्यांनी माईक हातात घेतला. ते म्हणाले, ‘ज्या जांबू धोटेचे सदस्यत्व पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही रद्द केले होते, तो जांबू धोटे मीच आहे आणि लोकांनी मला पुन्हा निवडून दिले आहे..’ तेव्हापासून सभागृहातील आमदारांच्या टेबलवरील पेपरवेट काढून टाकण्यात आले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या फॉर्वर्ड ब्लॉक पक्षाचे ते नेते होते. ते सलग पाच वेळा यवतमाळ जिल्ह्यातून आमदार म्हणून निवडून गेले. 1967 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत आमदारपदीजांबुवंतराव धोटे १९७१ मध्ये नागपूर मतदारसंघातून लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर १९७८ मध्ये इंदिरा गांधी यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९८० साली ते लोकसभेवर दुसऱ्यांदा निवडून गेले.
बाळासाहेब ठाकरेंना दिला होता जाबुवंतरावांनी आदेश….
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या बऱ्याचवेळा एकत्र बैठका होत असत. आपला फॉरवर्ड ब्लॉक पक्ष सोडून काही वर्षे शिवसैनिक झाले होते. बाळासाहेबांना पाईपमध्ये तंबाखू पेरून धुराडे सोडण्याचा भारी शौक होता. तर, भाउ धोटे हे तंबाखू-सिगारेटचे प्रचंड विरोधी होते. माझ्या बाजूला बसायचे असेल तर सिगारेट विझवा, अशी सूचना जांबुवंतराव हमखास करतात, असे प्रसंग अनेकांना ज्ञात आहेत. जांबुवंतराव धोटे यांनी एकदा बाळासाहेबांना ‘सिगारेट विझवा’ असे स्पष्ट सांगितले आणि बाळासाहेबांनी लगेच सिगारेट विझविली. भाऊ धोटे यांनी बाळासाहेबांना खरेच सिगारेट विझवा, असे म्हटले होता का या बाबत 1995 मध्ये दारव्हा (जिल्हा – यवतमाळ) येथे निवडणूक कार्यक्रमात पत्रकारांनी या सत्यतेबाबत बाळासाहेब ठाकरे यांना विचारणा केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला दुजोरा दिला होता. ५० वर्षांपासून कुठल्याही सभेला संबोधित करण्यासाठी जाबुवंतराव उभे राहिले की, त्यांना ऐकण्यासाठी आलेले सुरुवातीला ‘वारे शेर आया शेर..’ म्हणून त्यांचे स्वागत करत.
धुम्रपान आणि तंबाखू खाणारांचा जांबुवंतरावांना टोकाचा तिटकारा. पत्रकार भवनात ते आले आणि कोणी पत्रकार जरी धुम्रपान करत असला तर सरळ ते त्याला बाहेर जायला सांगत. जांबुवंतराव धोटे यांची लोकप्रियता अफाट होती आणि त्याला धाडसाची जोड होती. महिलांची झालेली छेडछाड किंवा महिलांवर होणारी शेरेबाजीची त्यांना नफरत होती. असं काही त्यांच्या आसपास घडल्याचं लक्षात आलं तर ते करणाराची गय नसे; जांबुवंतरावांचा दणकट पंजा त्याच्या गालावर मस्त आवाज करतांना अनेकांनी ऐकला आहे. महिलांचा आदर करण्याच्या याच भूमिकेतून बहुदा त्यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या नागपूरच्या महिलांकडून राखी पौर्णिमेला राखी बांधून घेण्याचा उपक्रम सुरु केला आणि तो अनेक वर्ष पाळला. वेश्यांच्या मुला- मुलींना आपलं नाव देणारा तो बापच आहे सर्वाना…
पांढरे स्वच्छ कपडे, हातात जाडजूड कडं, छातीपर्यंत वाढलेली दाढी, डोईवरच्या केसांचा बुचडा बांधलेला. झपझप पायी चालणं, एसटी बसनं प्रवास करणं आणि समोर दिसेल त्याला नमस्कार करणारा हा एकमेव नेता मी विदर्भात बघितला. अकोला येथे कृषी विद्यापीठ व्हावं म्हणून 1968 मध्ये मोठे आंदोलन उभे केले. त्यात 5 जण शहीद झाले. संपूर्ण विदर्भात हे आंदोलन झाले होते. 978 ला त्यांनी “जागो” चित्रपटात मुख्य भूमिका त्यांना केली होती.
भाऊना खासरे तर्फे मनाचा मुजरा.. माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
तीन वेळा अपक्ष निवडून येणार्या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?