तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात नुकतेच अतिरिक्त सचिव म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या आयएएस अधिकारी स्मिता सब्बरवाल यांनी इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या सर्वात तरुण अधिकारी बनल्या आहेत. यापूर्वी कधीच एवढ्या कमी वयाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयात काम केले नाही. यामागचे कारण असे की स्मिता यांनी खूप कमी वयात म्हणजेच वयाच्या २३ व्या वर्षी आयएएसची परीक्षा पास केली होती. त्यांचे आतापर्यंत चे कामकाज एवढे चांगले राहिले आहे की प्रत्येक जण त्यांचे कौतुक करत असतो. त्यांच्या सेवेला आता १५ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना ‘द पिपल्स ऑफिसर’ म्हणून ओळखले जाते.
आतापर्यंत स्मिता यांनी वारंगल, विजाग, करीम नगर, चित्तुर या जिल्ह्यात काम केले आहे. तिथले लोक आजही त्यांच्या कामामुळे त्यांची आठवण काढत असतात. त्या जिथे जिथे काम करतात तिथे त्यांची वेगळीच छाप आतापर्यंत त्यांनी पाडली आहे. मूळच्या बंगालच्या दार्जिलिंग येथील असणाऱ्या स्मिता यांचे वडील आर्मी मध्ये होते. त्यामुळे त्यांना देशातील विविध भागात राहायला मिळाले. यामुळे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सुद्धा असेच झाले. त्यांचे वडील कर्नल पी.के. दास हे सेवेतून रिटायर्ड झाल्यानंतर हैद्राबाद मधेच स्थायिक झाले. त्यामुळे स्मिता यांनी आपली १२ वि चे शिक्षण हैद्राबाद मधील सेंट एेन्स मधून केले आणि सेंट फ्रांसिस कॉलेजमधून त्या कॉमर्स मधून ग्रॅज्युएट झाल्या.
स्मिता या १२ वी मध्ये ISC बोर्डाच्या टॉपर होत्या. यूपीएससीच्या सिव्हिल परीक्षामध्ये सुद्धा त्यांना ४ थी रँक मिळाली होती. त्यावेळी त्या फक्त २३ वर्षाच्या होत्या. त्यानंतर त्यांना देशातील सर्वात प्रतिष्ठित आयएएस ची नोकरी जॉईन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पण स्मिता म्हणतात की त्यांचे कामच त्यांच्यासाठी खरे काम आहे. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्या आयएएस बनाव्यात. यासाठी त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर लगेच सिव्हिल परीक्षेची तयारी सुरू केली.
निकाल लागल्यानंतर त्यांना त्या देशातून ४ थी रँक मिळवून पास झाल्याची बातमी मिळाली. आयएएस मध्ये चांगली रँक मिळाल्याने त्यांना हैद्राबाद हे केडर मिळाले. त्यावेळी आंध्र प्रदेशचे विभाजन झाले नव्हते. त्यांना वारंगल येथील नगर परिषद आयुक्त म्हणून जबाबदारी मिळाली. तिथे त्यांनी ‘फंड योर सिटी’ या नावाने एक योजना चालू केली. नक्षलवादी प्रभावित त्या भागात त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी सहकार्य करण्याचे अपील केले. तिथल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला. स्मिता यांच्या असलेल्या चांगल्या हेतूमुळे त्या शहराचा चेहरा मोहरा बदलून गेला.
वारंगल मध्ये काम केल्यानंतर त्यांना करीमनगर जिल्ह्यात जबाबदारी मिळाली. हा तेलंगणा मधील एक मागास जिल्हा मानला जायचा. २०११ मध्ये त्यांना करीमनगरचे जिल्हाधिकारी नेमण्यात आले. तिथे त्यांनी आरोग्य सेवा व शिक्षण सेवा बदलण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अम्मा लालना या नावाने एक योजना आणत तेथील सरकारी दवाखान्यात स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर गरोदर महिलांसाठी सुद्धा मोफत तपासणी शिबीर राबवले.
अगोदर रूग्ण सरकारी दवाखान्यात येण्यास टाळत असत व स्मिता यांनी रुग्णांना सरकारी दवाखान्यात येण्यासाठी विविध योजना राबविल्या. त्या प्रत्येय दवाखान्यात स्काइप सुविधा वापरून लक्ष ठेवत होत्या. गरीब महिलांना खाजगी रूग्णालयात ३०-३० हजार रुपये खर्च करणे परवडणारे नव्हते. त्यासाठी त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून अम्मा लालना ही योजना राबविल्याची माहिती स्मिता यांनी दिली. स्मिता यांनी फकीर रुग्णालयातील सुविधाच नाही तर साफ स्वच्छता टिकवण्यासाठी सुद्धा खूप लक्ष दिले. चांगले उपकरणे त्यांनी सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून दिले. आज पूर्ण राज्यात स्मिता यांचे मॉडेल पाळले जाते. त्यांनी यासोबतच शिक्षण क्षेत्रात सुद्धा खूप भरीव कामगिरी केली त्यामुळे त्यांना पीपल्स ऑफिसर या पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मिता या गरजू लोकांसाठी नेहमी उपलब्ध असत. असे कधीच नाही व्हायचे की एखाद्याला त्यांची गरज आहे आणि त्या भेटल्या नाही.
जिल्हाधिकारी म्हणून त्या रोज २००-३०० लोकांना भेटत असत आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवत असत. यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असायचे व सरकारी कार्यालयाकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन सुद्धा बदलायचा. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर त्यांना तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात जबाबदारी मिळाली आहे. इतक्या कमी वयात इथे पोहचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
त्यांचा विवाह एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत झाला आहे जे की त्यांच्या बॅच चे आहेत. त्यांनी सोबतच मसुरी येथे ट्रेनिंग पूर्ण केली होती. तिथे ते मित्र बनले आणि दोन्ही परिवाराच्या मर्जीने पूढे त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुलं पण आहेत. मुलांना वेळ देण्याविषयी त्यांनी सांगितले की आम्हाला जे आवडायचं ते आम्ही निवडलं आहे, मग मुलांना खूप कमी वेळ मिळतो. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणाऱ्या महिला आणि मुलींसाठी त्यांचे एक प्रेरणा आहे. पण त्यासाठी त्याग सुद्धा करावा लागतो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: २ खोलीच्या घरात राहून पूर्ण केले आई वडिलाचे स्वप्न, चारही बहीण भाऊ बनले IAS-IPS.
वाचा: मोक्षदा पाटील खान्देश कन्या ते पोलीस अधीक्षक…
Comments 1