आपल्या सर्वांना माहिती आहे की पेरू हे आपल्या देशातील एक प्रमुख फळ आहे. पेरू आपण सर्वच जण खूप आवडीने खातो. असे फार कमी लोकं असतात की त्यांना पेरू आवडत नाहीत. हिरव्या रंगाचे पेरू खायला गोड असतात. पेरूमध्ये छोट्या छोट्या शेकडो बिया असतात. पेरू हे खूप सहज मिळणारे फळ आहे. अनेक जणांच्या घरांमध्ये सुद्धा पेरुचे झाडं लावलेली असतात. चला तर आज खासरेवर जाणून घेऊया पेरुचे शरीरासाठी होणारे काही फायदे.
पेरू वाढवतात रोगप्रतिकारक क्षमता-
पेरू हे खूप सहजासहजी मिळणारे फळ आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना हे खाल्याने होणाऱ्या फायद्याविषयी माहिती नसते. खूप कमी लोकं असतील ज्यांना पेरूंपासून आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्याची कल्पना असेल. पेरूमध्ये असणारे व्हिटॅमिन आणि खनिज शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासूम वाचवण्यास मदत मिळते. सोबतच पेरू आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता अधिक मजबूत करतात. डॉक्टर सुद्धा नेहमी पेरू खाण्याचा सल्ला देतात.
बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आजच्या काळात कॉम्पुटर चा उवयोग प्रत्येकाचा खूप जास्त वाढला आहे. ही गोष्ट सर्वाना माहिती आहे की जास्त कॉम्पुटरचा उपयोग केल्याने त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर सर्वात जास्त होतो. त्यामुळे डोळ्यांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. नजर चांगली ठेवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन ए ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन ए साठी पेरू हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. पेरू खाल्याने तुमची नजर चांगली राहील.
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे बरेच वेळा रातांधळेपणा होण्याची शक्यता जास्त असते. पेरू नियमित खाल्यास रातांधळेपणा होण्याची शक्यता खूप कमी असते. वाढत्या वयानुसार उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या समस्या नियमित पेरू खाल्याने कमी होऊ शकतात. विशेषज्ञांच्या मते डोळ्यांची नजर चांगली ठेवण्यासाठी पेरू किंवा पेरुचं ज्यूस अवश्य घ्यायला हवं.
पेरू काळ्या मिठासोबत खाल्यास पचनक्रिया सुधारते व पचनाच्या समस्या दूर होतात. पचनक्रियेसाठी पेटू हे सर्वोत्तम फळ आहे. छोट्या मुलांच्या पोटात जंत होत असतात तर त्यासाठी पेरू हे एक खूप उत्तम फळ आहे. पेरूच्या पानांना वाटून त्याचे पेस्ट बनवायचे आणि ते पेस्ट डोळ्यांच्या खाली लावायचे. यामुळे डोळ्यांचा खाली असणारे काळे डाग व सूज कमी होते.
जर तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या असेल तर सकाळी सकाळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खाणे खूप फायद्याचे ठरते. जर तुमच्या तोंडातून वास येत असेल तर पेरूचे पानं चावल्यास फायदेशीर ठरते. यामुळे दुर्गंधी सुद्धा दूर होते आणि दातांमध्ये त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो.
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडीओ बघा-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
हे खाल्ल्याने तल्लख होतो मेंदू, जाणुन घ्या याचे असेच सीताफळाचे फायदे…
फक्त एक चिमूट सेवन डायबिटीज, कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांपासुन वाचवेल…
Comments 2