तुम्ही प्रतिभावंत असाल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोकू शकत नाही. याचेच एक उत्तम उदाहरण बनली आहे आग्र्याची मेघा अरोरा. मेघाने लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या आयएएस परीक्षेत संपुर्ण भारतातून ८ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे मेघाचे वडील हे एक रिक्षा ड्रायव्हर आहेत तर आई प्राध्यापिका आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून असलेल्या मेघा साठी मिळालेले यश हे खूप मोठी उपलब्धी आहे.
मेघा ही लहाणपणी पासूनच अभ्यासात हुशार होती. तिची शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाची कामगिरी सुद्धा प्रशंसनीय होती. मेघाने १२ वी मध्ये ९५ टक्के मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. चांगले मार्क्स मिळाल्यानंतर तिच्या स्वप्नांना एकप्रकारे भरारी मिळाली. त्यानंतर तिने दिल्लीच्या प्रसिद्ध हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बारावी पर्यंत सायन्स मध्ये शिक्षण घेतलेल्या मेघाने पुढे आपल्या काकाच्या म्हणणे ऐकून कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला. ग्रॅज्युएशन चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कॉमर्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केले.
यानंतर मेघाने यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होण्याचा निर्धार केला. ती सांगते की तिला तिच्या काकांनी अभ्यासासाठी खूप मदत केली. मेघाने जिद्द आणि चिकाटीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत टॉपर बनून घवघवीत यश मिळवले आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात एवढे घवघवीत यश मिळवले आहे त्यावरून तिच्या मेहनतीचा तुम्ही अंदाजा लावू शकता. यावर्षी मे महिन्यात यूपीएससीची परीक्षा पार पडली व निकाल जुलै मध्ये जाहीर झाले. यानंतर मेघाला इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात आले. अंतिम निकाल २३ सप्टेंबरला जाहीर झाला. आता ११ डिसेंबर पासून मेघा ट्रेनिंग साठी जाणार आहे.
मेघाच्या या यशानंतर तिचे ८ वी पर्यंत शिकलेले वडील सुनील अरोरा म्हणाले की, ‘ तिने आमच्या सर्वांचे नाव अभिमानाने वर नेले आहे. यासाठी तिने खूप कठीण परिश्रम घेतले. हे यश आमच्या सर्वांसाठी एखादं स्वप्न खरं झाल्यासारखे आहे’. मेघाची आई सविता या एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्या म्हणाल्या की, ‘ अभ्यासात मेघा नेहमी अव्वल राहिली आहे. ती आमच्या परिवारात एकमेव आहे जिने सरकारी अधिकारी होण्याची परिक्षा पास केली आहे. मेघाचे आई-वडिल म्हणून आम्हाला याचा खूप अभिमान आहे’.
विशेष म्हणजे दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधील मेघा सोबतच्या अजून १५ जणांनी ही परिक्षा दिली होती, परंतु त्यापैकी मेघा ही एकमेव आहे जिची यामध्ये निवड झाली आहे. मेघा सांगते की तिच्या एका मैत्रिणीच्या सल्ल्याने तिने या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली होती. मेघाचा अर्थशास्त्र विषयात सखोल अभ्यास होता. परंतु मेघाला रोज ८-१० तास अभ्यास केल्यानंतर हे यश मिळाले आहे. मेघाला फिक्शन पुस्तके वाचण्याची आवड आहे व तिचे आवडते लेखक अमिताभ घोष आहेत.
मेघाच्या या यशासाठी तिचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खासरेकडून खूप खूप शुभेच्छा…
या निडर आयएएस अधिकाऱ्यामुळे गेली मंत्री महोदयाची खुर्ची…