सर्दीचे दिवस आले आहेत आणि या आकर्षक वातावरणात पेरू दिसले आणि ते न खाता राहणं शक्य आहे का? पेरू दिसताच मन करते की आता खाऊनच टाकावे. कोण असा असेल ज्याला पेरू आवडत नसतील. भेटले तरी अशा लोकांच प्रमाण खूप कमी असेल. हेच चविष्ठ पेरू एका इंजिनिअरचे आयुष्य बदलून टाकत आहेत. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील संगतपुर गावातील नीरज धांडा हे एक इंजिनिअर आहेत. परंतु त्यांचे पेरूवर एवढे प्रेम आहे की त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून पेरूची बाग लावून शेती करण्यास सुरुवात केली आहे. बिटेक चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीरज यांनी डेव्हलपर म्हणून एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांचे मन काही घर व गाव सोडून रमत नव्हते. त्यांनी शेवटी नोकरी सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विशिष्ट प्रकारचे पेरूची बॅग बनवून आपल्या आयुष्याला एक प्रकारे कलाटणी दिली आहे. त्यांच्या या पेरूची चर्चा देश-विदेशातील मोठं-मोठ्या शहरात केली जाते.
नीरज हे काही वर्षांपूर्वी रायपूर छत्तीसगड मध्ये होते. तिथे त्यांनी पेरूच्या एका विशिष्ट प्रजातीविषयी ऐकले होते. जेव्हा त्यांनी हा पेरू पहिला तेव्हा ते हैराण झाले. दिसायला खूप सुंदर आणि मोठे पेरू पाहून त्यांच्या तोंडात पाणीच आले. त्याच क्षणी त्यांच्या मनात या पेरूची बाग करण्याचा विचार आला आणि तात्काळ याविषयी नियोजन करण्यास सुरुवात केली. नीरज यांनी आपल्या ७ एकर शेतामध्ये जवळपास १९०० रोपं लावली. त्यांनी रायपुर वरूनच त्या प्रकारचे रोपं लावली. त्यांना यामध्ये भरपूर खर्च आला होता पण त्यांनी मनात ठरवलेच होते की त्यांना हे करायचं आहे.
आता त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या बागेतील पेरूंना आता पेरू येण्यास सुरुवात झाली आहे. हे पेरू एवढे मोठे असतात की त्यांना एक माणूस चांगल्या प्रकारे खाऊ सुद्धा नाही शकत. एका पेरूमध्ये माणसाचे पोट भरेल. यावर्षी त्यांना एका झाडापासून जवळपास ५० किलो फळ मिळाले आहेत, जे की खूप चांगलं उत्पन्न म्हणता येईल. त्यांनी सांगितले की जेव्हा लिंबाच्या आकाराचे पेरू होते तेव्हा त्यांनी त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. पावसापासून, वादळ आणि गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी त्यावर फोम लावले होते. जेव्हा फळ मोठे होत होते तेव्हा त्यांनी तापमान नियंत्रित करण्यासाठी पॉलिथिन आणि पेपर बांधले. ऑगस्ट महिन्यात 1 ते दीड किलोचे पेरू मिळण्यास सुरुवात झाली होती.
जितकी आगळीवेगळी कहाणी नीरज यांच्या पेरू लावण्याची आहे तितकेच हटके मार्केटिंग त्यांनी या पेरुचं केलं. ते आपले पेरू एखाद्या भाजीमंडी मध्ये विकत नाहीत. ते या पेरूची थेट ऑनलाइन विक्री करतात. जिथून त्यांना ठोक ऑर्डर मिळतात तिथे ते पेरू विकतात. त्यांना दिल्ली, चंदीगड, पंचकुला, नोएडा, गुरग्राम, गाझियाबाद सोबतच बऱ्याच जागेवरून ऑर्डर मिळतात. यासाठी त्यांनी डोअर नेक्स्ट फार्म नावाची कंपनी सुद्धा चालू केली आहे. त्यांच्या वेबसाईटवर पेरू ऑर्डर केल्यानंतर ४८ तासात डिलिव्हरी मिळते.
नीरज हे आपल्या बागेत रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खते वापरतात. यामुळे हे पेरू खूप फलदायी असतात. यामुळे काही नुकसान होत नाही. त्यांनी या झाडांना निंबोळीची पेंड, शेणखत आणि गांडूळखत टाकून शक्तिशाली बनवले आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी त्यांनी बागेजवळ एक तलाव बांधला आहे. पेरूची विशेषतः म्हणजे ते उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही सीझनमध्ये येतात. यामुळे त्यांना याचा खूप फायदा होत आहे. नीरज सांगतात की त्यांचे पेरू हे जवळ्पास ५०० रुपये किलोपर्यंत विकतात.
नीरज बागेतील झाडांची देखभाल विषेश प्रकारे करतात. झाडांना फळं आल्यानंतर जेव्हा ते लिंबाच्या आकाराचे असतात तेव्हा त्यांना हाथ नाही लावला जात. पेस्टीसाइड म्हणून लिंबाच्या तेलाचा उपयोग करतात. आणि फळं मोठी झाल्यावर ते त्यांना कागदात बांधून ठेवतात. नीरज म्हणतात की त्यांना भारतीय कृषि अर्थव्यवस्थेत बदल करायचा आहे. कारण पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांना विशेष काही फायदा होत नाही. ते म्हणतात की आजच्या काळात शेतकऱ्यांनी अशी नकली शेती करायला हवी.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: या भारतीय तरुणाने समोसे विकण्यासाठी सोडली गुगल ची नौकरी…