आपल्या सर्वांना माहिती झालं आहे की सोशल मीडियावर रोज काही ना काही नवीन फोटो वायरल होत असतात. मग ते कोणा सेलेब्रिटीचे असो किंवा एखाद्या सामान्य माणसाचे. आता सुद्धा सर्वात सुंदर पोलीस अधिकारी म्हणून एका महिलेचे फोटो प्रचंड वायरल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोतील महिलेला लोकं पंजाब पोलीस दलातील नवीन महिला एसएचओ म्हणत आहेत. तसेफ या महिलेच्या सुंदरतेवर सुद्धा अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
वायरल फोटो मागचे सत्य-
इंटरनेटवर वायरल झालेल्या फोटोमध्ये महिला पंजाब पोलिसाच्या वेशात दिसत आहे. या महिलेला अनेक जण पंजाब पोलीसची हरलीन कौर चं नाव देत आहेत. पण हे साफ खोटे आहे. या वायरल झालेल्या फोटोमागे काही वेगळेच सत्य आहे.
अभिनेत्रीचे आहेत वायरल झालेले फोटो-
तुमच्या माहिती साठी सांगतो की वायरल झालेले हे फोटो अभिनेत्री कायनात अरोराचे आहेत. कायनात आरोराचा जन्म डेहराडून उत्तराखंड येथे एका पंजाबी कुटुंबात झालेला आहे. कायनात ही प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती यांची बहीण लागते. या फोटोमध्ये असलेल्या कायनात ने एका चित्रपटात पंजाब पोलीसच्या एका महिला अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. हा एक पंजाबी चित्रपट होता ज्याचे नाव जग्गा जेऊंदा बोलले जात आहे.
इन्स्टाग्रामवर व्यक्त केली आहे नाराजी-
कायनात ने सोशल मीडियावर आपला फोटो एक पंजाब पोलिसाची एसएचओ बोलून वायरल झाल्याबद्दल नाराज झालेल्या कायनातने हे पूर्णपणे चुकीचं आहे असं सांगितले आहे.
शूटिंगच्या वेळेस काढले होते फोटो-
बोलले जात आहे की चित्रपटाच्या शुटींगच्या वेळेस कोणी तरी कायनातचे फोटो काढले व ते पंजाब पोलीसची एसएचओ म्हणून शेअर केले आहे.
सोशल साईट्सवर केले आहे जात आहे शेअर-
इंटरनेटवर कायनातचे फोटो अपलोड होताच खुप कमी वेळात ते सोशल साईटवर प्रचंड वायरल झाले आहेत व व्हाट्सएपवर सुद्धा चांगलेच शेअर केले जाते आहे.
फिल्मी करिअरची सुरुवात-
2010 मध्ये कायनातने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. कायनातने अक्षय कुमारच्या खट्टा मीठ्ठा या चित्रपटात एका गाण्यात पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केली होती. कायनातने ग्रँड मस्ती या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. फिल्म इंडस्ट्री मध्ये येण्याच्या अगोदर कायनात मॉडेल म्हणून काम करत असे. कायनातने मनकथा, लैला ओ लैला, मोगली(तेलगू), फरार(पंजाबी) या फिल्म मध्ये सुद्धा काम केले आहे. कायनातने मल्याळम चित्रपटात गाणे सुद्धा गायले आहेत.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत सावली प्रमाणे राहणारी ही महीला कोण?
Comments 1