प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत या महिलेचा फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. मोदी यांचा फोटो वायरल होणे फार मोठी गोष्ट नाही. परंतु महिले सोबत मोदीजींना पाहुन चर्चेचा हा चर्चेचा विषय झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सोबत दिसणारी ही स्त्री प्रत्येक समारंभात त्यांच्या सोबत राहते. बराक ओबामा व मोदी भेटीच्या वेळेसही त्यांचे फोटो वायरल झाले होते आज खासरेवर बघुया कोण आहे ही महीला…
मोदीजींच्या आक्रमक भाषणाच्या पाठीमागे कोणाचा हात असेल तर तो या महिलेचा आहे. मोदीजी सोबत दिसणारी या महिलेच नाव गुरदीप कौर चावला हे सांगण्यात येत आहे. तुम्हाला वाटेल की ही मोदीजींना भाषण लिहुन देत असेल तर आपण चुकिचा विचार करत आहे. ही महिला भाषण लिहत नाही तर भाषणाचे भाषांतर करते. गुरदीप कौर चावला ही एक अनुवादक Interpreter आहे. मोदीजी जेव्हा हिंदी मध्ये भाषण करतात तेव्हा ही इंग्रजीमध्ये भाषांतर करायच काम करते.
गुरदीप कौर यांनी वयाच्या २१व्या वर्षी आपल्या या करीयरची सुरवात केली होती. नरेंद्र मोदी यांच्या अगोदर अनेक दिग्गज नेत्या सोबत त्यांनी काम केलेले आहे. मागील २७ वर्षापासुन त्या हे काम करत आहे. असे सांगण्यात येते की गुरदीप ह्या अगोदर अमेरीकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सोबत काम करत असे. २०१० साली जेव्हा ओबामा भारतात आले तेव्हा गुरदीपच इंटरप्रिटेटर होत्या. परंतु सध्या त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत काम करत आहे.
गुरदीप यांचा या कामात येवढा हातखंडा बसला आहे की त्या बिना भाषण बघताच फक्त ऐकूनच तडकाफडकी ट्रान्स्लेट करतात. युएन मध्ये झालेल्या मोदिजींचे भाषण त्या दिवशी गुरदीप यांची फक्त २ तास झोप झाली होती तरीसुद्धा त्यांनी न थकता आपले काम चांगल्या पध्दतीने पुर्ण केले. गुरदीप सांगतात की लाईव अनुवाद करताना एकाग्रता आवश्यक आहे. कारण यामध्ये ब्रेक नसतो. नरेंद्र मोदी यांच्या अगोदर बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प व कॅनडाचे प्रधानमंत्रि जस्टिन ट्रुडो यांच्या सोबत काम केले आहे.
या खासरे कामाकरिता खासरेच्या शुभेच्छा…
प्रधानमंत्री मोदीजींच्या टॉप टेन ब्रेन मधील एकमेव मराठी अधिकारी..
जेव्हा काम करणारी मुलगी राष्ट्रपतींची लेक आहे हे लोकांना कळते तेव्हा…