Friday, January 27, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

सॅनेटरी पॅडना योग्य आरोग्यादायी आणि पर्यावरणपूरक पर्याय मेनस्ट्रअल कप…

khaasre by khaasre
November 20, 2017
in जीवनशैली
0
सॅनेटरी पॅडना योग्य आरोग्यादायी आणि पर्यावरणपूरक पर्याय मेनस्ट्रअल  कप…

मासीक पाळीत वापरण्याचा menstrual cup याबाबत जनजागरणाची आवश्यकता आहे. ही अजुन नवीन संकल्पना आहे भारतीय स्त्रीयांसाठी याचा प्रसार होणे गरजेचे आहे. आपल्या मनात याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे शक्य त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्हिडीओ लींक देण्यात आल्या आहेत. त्या जरूर पहा. यामुळे आपल्या शरीराची ठेवण आणी या कपचा रोल आपल्याला प्रत्यक्ष पाहता येईल.

पांढऱ्या शुभ्र कापसामध्ये ग्ल्यायको फॉस्फेटसारखी कर्करोगाला कारणीभूत असलेली द्रव्ये असतात. भारतात सुमारे ३.६ कोटी स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. दर महिन्याला १२ नॅपकिन्स या हिशेबाने वापरलेल्या ४३.२ कोटी नॅपकिन्सचे वजनच ५००० टन होईल. कुठलेही नॅपकिन्स पूर्णपणे नष्ट व्हायला शेकडो वर्षे जावी लागतात. म्हणजेच वापरून फेकून देत असलेल्या या नॅपकिन्सच्या संख्येचा विचार केल्यास दररोज प्रदूषणात किती भर पडत आहे, पर्यावरणावर त्याचा किती विपरीत परिणाम होत आहे, याची नक्कीच कल्पना येईल. म्हणूनच आता आणखी एक पर्याय समोर येतो आहे तो म्हणजे, मेनस्ट्रअल कप त्याविषयी..

या कपचा वापर करुन स्वतःची आणी पर्यावरणाची काळजी घ्या. हा कप reusable आहे. म्हणजे एक कप आपण दहा वर्षापर्यंत वापरू शकता. महीन्याला स्यानीटरी प्याडवर शंभर दीडशे रूपये खर्च होतात. हा कप खरेदी करून आपली पैशाची फार मोठी बचत होणार आहे. ४००-१०००/२००० रुपये आणी त्यापुढे या कपच्या किमती आहेत. ६००- ८०० रुपयांपर्यंत उत्तम कप मिळतो. त्यामुळे सुरुवातीला विचारात पडतो. परंतु एकुण दहा वर्षाचा हीशोब काढला तर हा खर्च नगण्य आहे. शिवाय मागणी वाढल्यानंतर किमती कमी होतीलच. या कपविषयी योग्य ती माहीती या व्हीडीओत मिळेल. लींक देत आहे जरुर पहा.

कप कसा निवडावा Small cup (S) size
नवीन किशोरवयीन मुलींसाठी , तिशीच्या आतील तरुणी, ज्यांची अजून गर्भधारणा झालेली नाही, ज्या sexyually active नाहीत म्हणजे लैंगिग संबंध नसलेल्या अशा तरुणींसाठी स्माल small cup (S) size निवडावा. किशोरवयीन मुलींसाठी आणि ज्यांची तब्येत नाजूक अथवा यूरिनरी संबंधित समस्या आहेत अशा महिला , तरुणींनी सॉफ्ट कप वापरावा. हा कप सॉफ्ट असल्याने कसलाही त्रास न होता सहजपणे योनीमार्गात सरकवता येतो. तो योनीमार्गात गेल्यानंतर उघडला कि नाही ते कपच्या खालील भागाला थोडस दाबून पाहावे. यामुळे कप ओपन होईल. परंतु ज्यांची (तरुणी, महिला )शरीरयष्टी मजबूत आहे अशाना हा कप सूट होत नाही. अशावेळी फर्म कप निवडावा. विडिओ मध्ये पाहिल्यानंतर हा फरक लक्षात येतो. सॉफ्ट कप हा लवचिक असतो.

Large (L) size तिशी पार केलेल्या तरुणी आणि महिला, तसेच ज्यांची गर्भधारणा झालेली आहे, ज्या sexually active आहेत यांच्यासाठी Large (L) size कप निवडावा. योग्य मापाचा कप निवडण्यासाठी video link देत आहे.

योनीमार्गात कप गेल्यानंतर उघडला कि नाही ते कपच्या खालील भागाला थोडस दाबून पाहावे. यामुळे कप ओपन होईल. याबाबत युट्युबवर व्हिडिओ आहेत त्या सर्च कराव्यात. menustrual cup सर्च केल्यानंतर बरेच व्हिडिओ येतील. हिंदीमध्येही आहेत यामध्ये कप कसा वापरावा, कोणता कप निवडावा, स्वच्छता कशी करावी याबाबत माहिती आहे. कोणता कप निवडावा यासाठी खाली लींक देत आहे.

आणखी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कॉपर टी (तांबी) बसवलेली असेल तर कप वापरता येईल का? याचे उत्तर सोपे आहे. तांबी गर्भाशयाच्या आत असते तर कप योनी-मार्गात. तांबी बसवल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी कप वापरायला हरकत नसावी. तसेच बाळंतपणानंतरसुद्धा काही महिन्यांनी कप वापरायला हरकत नाही. अर्थात या दोन्ही परिस्थितींमध्ये वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. कॉपरटी लावल्यानंतरही आपण हा कप सहजपणे वापरु शकता यासाठी लींक देत आहे.

कप वापरल्यानंतर चांगल्या उकळत्या पाण्यात पाच मिनिटे बुडवून त्याला निर्जंतुक करून घेणे आवश्यक आहे. तसेच वापरण्यापूर्वी आणि वापरानंतर हात स्वच्छ साबणाने धुवून घेणे आवश्यक आहे. स्वच्छता हि आपल्या निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. या कपाबाबत आपण जाणून घ्या आणि आपल्या इतर मैत्रिणींनाही माहिती द्या.

प्रातःवीधी(शी)च्या वेळी हा कप काढुन स्वच्छ करुन घ्यावा. कारण यावेळी प्रेशरमुळे कप बाहेर येण्याची शक्यता असते. लघवी कप न काढता करता येते. कारण blood and urine या वेगवेगळ्या नलीकेतुन येत असतात. याबाबतही video link देत आहे. आपण हा कप न काढता आपल्या नैसर्गीकवीधी करु शकता Don’t worry.

हा कप बाहेर कसा काढावा? लींक देत आहे.

आपले माप कसे घ्यावे, व योग्य कप कसा निवडावा यावर सुद्धा माहिती उपलब्ध आहे. बहुतेक जणींना भारतात बनवलेला ‘शी-कप’ बसतो. शी-कप एकाच साइजमध्ये मिळतो, परंतु आपण सगळ्या अगदी सारख्या नसतो. काही कप थोडे मऊ असतात तर काही जरा घट्ट. विशीतल्या मुलींसाठी लहान आकाराचे कपसुद्धा मिळतात. अमेरिकेमध्ये कितीतरी मुली वयात आल्या की लगेचच असे छोटे कप वापरायला लागल्या आहेत. कप वापरताना योनीपटल फाटू शकते, परंतु योनीपटल खेळतानासुद्धा ताणले जाऊ शकते. काही वेळा मातांना भीती वाटते की कप वापरल्यामुळे मुलीचे कौमार्य संपेल, परंतु वैद्यकीय परिभाषेनुसार कौमार्य योनीपटलावरून ठरत नाही; मुलीचा लैंगिक संबंध आला आहे किंवा नाही यावर ठरते. कपाची इंग्रजी ‘यू’ आकाराची घडी घालून तो योनीमार्गात घालायचा. मग हळूच फिरवल्यावर तो आतमध्ये उघडतो व स्राव त्यामध्ये जमतो. हवेच्या दाबामुळे तो आत व्यवस्थित बसतो. तो एकदा नीट बसला की पाच-सहा तासांची सुट्टी. पाळी आहे हेच विसरायला होतं. पुरळ, घसपटणे आणि चालताना जड वाटणे हे सगळंच बंद. गंमत म्हणजे कप वापरताना तुम्ही धावणे, पोहणे, योगा-व्यायाम अगदी निश्चिंतपणे करू शकता. कित्येक योगा शिक्षिका आणि मॅरेथॉन धावपटू आता कप वापरू लागल्या आहेत. पाळी आहे म्हणून कुठलीच बंधनं नाहीत. डागांची काळजी न करता रात्रभर गाढ झोपता येते.

आजची सॅनेटरी पॅडची गुणवत्ताही घसरत चालली आहे. पूर्वीच्या पॅडच्या मानाने जाडी कमी आणि किंमत जास्त अशी झाली आहे. त्यामुळे जास्त फ्लो असलेल्या दिवसात तर एक दिवसात तीन चार प्याड वापरावे लागतात. काही सुरक्षितही वाटत नाही शिवाय बजेट वाढते ते वेगळेच. महागडे पॅड परवडणारे नसतात. शिवाय रॅशेस वगैरे समस्या निर्माण होत आहेत. यातून कॅन्सरचाहि धोका आहे हे आता पुढे येत आहे. शिवाय या पॅडचा नाश होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात त्याखाली असलेल्या प्लॅस्टिकच्या कोटिंगमुळे पर्यावरणाला धोकाच निर्माण होत आहे. त्यामुळे हा Reusable Menstrual कप उत्तम पर्याय आहे. आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठीही विचार तर कराल? कप आपण flipkart,Amazon,SnapDeal कुठल्याही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट वर घेऊ शकता…

साभार सौ. दया सरवदे
पेज लिंक: https://www.facebook.com/माझे-कला-संग्रहालय-1509388952675648/
सौ.दया सरवदे plus.google.com https://plus.google.com/collection/QnD7TE
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा हजारो स्त्रियांना स्वयंरोजगार देणाऱ्या दोन महाराष्ट्रीयन शेतकरी महिला…

Loading...
Tags: menustrual cupsanitary napkin
Previous Post

जाणून घ्या असे काही कृत्य जे ठरू शकतात अट्रोसिटी गुन्हा…

Next Post

हमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी..

Next Post
हमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी..

हमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In