आता काही दिवसांपूर्वी एका भारतीय तरुणाने स्वतःचा देश स्थापन केल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. ऐकायला विचित्र वाटत असली तरी ही घटना नुकतीच घडली आहे. इंदोर येथील सुयश दीक्षित नावाच्या एका तरुणाने इजिप्त आणि सुदान देशांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेत स्वतःचा एक वेगळा देश घोषित केला आहे. या जागेवर बाजूच्या दोन्ही देशांचा मालकी हक्क नव्हता. याच संधीचा फायदा उचलून सुयश ने आपलं स्वतःचा वेगळा देशच इथे स्थापन करून टाकला आहे. त्याने यासंबंधी एक पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यामध्ये त्याने या देशाचे नाव ‘किंग्डम ऑफ दीक्षित’ असल्याचे जाहीर केले होते. स्वताला राजा घोषित केल्यानंतर त्याने इथे झेंडा फडकवल्याचे फोटो सुद्धा या पोस्ट मध्ये टाकले होते. इथेच न थांबता युनायटेड नेशनने या देशाला मान्यता द्यावी ही पण मागणी केली होती. सुयशने या वाळवंटी भागात विविध वृक्षांच्या बिया आणून झाडे लावण्यास सुरुवात केली होती. गंमत म्हणजे त्याने आपल्या वडीलांना या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्री म्हणून घोषित केले होते.
पण आता या तरुणाचा दावा खोटा असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने ताबा मिळवलेली जमीन जेरेमी हिटन या अमेरिकी नागरिकाची असल्याची माहिती समोर येत आहे. हिटन यांनी अगोदरच या जागेवर स्वतःचा बिर ताविल म्हणून देश स्थापन केला होता व तो स्वतः य देशाचा राजा व त्याची मुलगी राजकन्या असल्याची घोषणा केली होती.
हिटन यांनी ट्विटरद्वारे व्यक्त होताना दीक्षित यांना खोटारडा ठरवलं आहे आणि सोबत काही ती जागा त्यांची असल्याचे पुरावे ही दिले आहेत. “तू एक खोटारडा आहेस. तू तुझ्या परिवाराची इज्जत घालवली आहेस. तुला बिर ताविल ला इजिप्त मिल्ट्रीच्या परवानगी शिवाय जाणे अशक्य आहे. तूझा प्रवास खोटा आहे.” असे ट्विट हिटन यांनी केले आहे.
सूयशने माझ्याकडे बिर ताविलला जाण्यासाठी मदत मागितली होती. कारण त्याला इजिप्त मिल्ट्री कडून परवानगी मिल्ने शक्य नव्हते. मी त्याला नियम बदलल्याने हे शक्य नसल्याचे सांगितले होते, असे हिटन यांनी सांगितलं आहे. या जागेवर जाण्यासाठी मध्ये मोठे नासेर चे तळे आहे जे दोन भागांना विभागते. व तिथे काही सुविधा नाही ये की ज्याने सुयश तिथे जाऊ शकतो.
जेव्हा हिटन यांना अगोदर ही जागा कोणाच्या मालकीची नसल्याचे कळले होते तेव्हा त्यांनी तिथे जाऊन स्वतःचा झेंडा फडकावला होता. त्यांनी त्यांच्या मुलीला या जमिनीची राजकन्या बनवेल असे वचन दिले होते. एका मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार हिटन यांनी तिथे शेतीसंबंधी संशोधन आणि सुधारणासाठी एक हब तयार करण्याचे ठरवले आहे.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
या भारतीय तरुणाने समोसे विकण्यासाठी सोडली गुगल ची नौकरी…