दारू पिणे तसे बघायला गेलं तर शरीरासाठी हानिकारकच आहे. आजच्या काळात खूप लोकं दारूच्या व्यसनाधीन झाले आहेत. दारू पिल्याने माणूस अनेक आजारांना निमंत्रण देतो. काहींच्या दारू पिण्याला तर बंधनच राहिलेले नाहीये. दारूचे व्यसन असणाऱ्या जास्तीत जास्त व्यक्ती रात्री दारू पिणे पसंत करतात. अनेकांना असं वाटतं की रात्री दारू पिऊन झोपल्याने चांगली झोप लागते. परंतू असे काहीही नाहीये. डॉक्टर सांगतात की दारू पिल्यानंतर शरीर थोडं रीलक्स होते. परंतु याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. बरेच जणांना दारू पिऊन लगेच झोप लागते किंवा लगेच झोपायची सवय असते. तुम्ही असं करत असाल तर हे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे रात्री उशिरा दारू पिणे टाळा. दारू पिऊन लगेच झोपल्याने होणारे साईड इफेक्टस काय आहेत जाणून घेऊया खासरेवर.
1. झोपेवर परिमाण-
दारू पिऊन झोपणाऱ्या व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात घाम येतो किंवा सतत युरिन येण्याची समस्या निर्माण होते. यामुळे याचा झोपेवर परीणाम होतो.
2. पाण्याची कमतरता-
दारू पिल्याने आपल्याला पाणी पिऊ वाटत नाही. त्यामुळे शरीरात पाण्याची कमी भासते. दारू पिऊन झोपल्याने डीहायड्रेशन चा धोका ही संभवतो.
3. ऍसिडिटी-
ऍसिडिटी ही बऱ्याच कारणांनी होते. पण त्यात दारू पिऊन झोपल्याने होण्याची सुद्धा दाट शक्यता असते. कारण दारू पिऊन झोपल्याने शरिरात ऍसिड जास्त प्रमाणात तयार होते.
4. अल्सर-
दारू पिणाऱ्या व्यक्तींना ही समस्या नियमित सतावत असते. दारू पिणारे व्यक्ती रात्री पिऊन लगेच झोपतात यामुळे पोटातील ऍसिड वर येते व अल्सर च्या समस्येचा सामना त्यांना करावा लागतो.
5. थकवा-
दारुड्या व्यक्तीच्या शरीरातील बऱ्याच समस्या त्यांना कमजोर बनवतात. त्यातच अजून भर म्हणजे रात्री पिऊन झोपल्याने शरीरात पाण्याची कमतरता व इतर कारणांनी ग्लुकोजचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल.
6. डोकेदुखी-
दारू पिणाऱ्या हा त्रास तर सतत भेडसावत असतो. रात्री दारू पिऊन झोपल्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी हमखास डोकेदुखीचा त्रास होईल. याचे कारण असे की दरी पिउन झोपल्यास श्वास घेण्यास त्रास होतो व मेंदूतील ऑक्सिजन कमी होते. यामुळे डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो.
7. वजन वाढणे-
दारू पचायला जड असते. दारूचे नियमित सेवन केल्याने तुमचे वजन नक्कीच वाढते. त्यामुळे रात्री जास्त पिणे किंवा पिऊन झोपणे टाळा.
8. हृदय रोग-
दारूचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने ब्लड प्रेशर वाढू शकते तसेच हार्ट बिटची पण समस्या उदभवू शकते. यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक6येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
9. घोरण्याची समस्या-
दारू पिल्याने शरीरातील मसल्स रिलॅक्स होतात. घशाचे मसल्स सुद्धा रिलॅक्स होऊन घोरण्याची समस्या निर्माण होते.
अशा प्रकारच्या अनेक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे दारू सोडण्याचा प्रयत्न करा. दारू सोडल्याने तुमचे 2 आठवड्यात 5% कोलेस्टेरॉल कमी होईल, टॉक्सिनच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल, सोबतच कॅन्सर सारखा धोकादायक आजार होण्याची शक्यता नष्ट होईल, लिव्हर तंदुरुस्त राहण्यास मदत मिळेल, डिप्रेशन कमी होईल. हृदय रोगांचा धोका कमी होईल. इतकेच नाही तर कामामध्ये मन लागेल व एनर्जी मिळेल. त्यामुळे मित्रांनी असे असंख्य फायदे दारू सोडल्यास होतील. पूर्णपणे दारू बंद करता नाही आली तर हळू हळू ती कमी करण्याचा प्रयत्न करा.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
का वाढतो ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा धोका ! लक्षणे आणि बरे करण्याचे उपाय..