1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर न्यायालयीन प्रक्रियेत फौजदारी मध्ये जे मोठे वकील पुढे आले, त्यामधे शासकीय वकील उज्वल निकम यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. उज्वल निकम हे फक्त बचाव पक्षाचे वकील नसून ते गुन्हेगारी प्रकरणांवर सुद्धा राज्याची बाजू मांडतात. उज्वल निकम यांनी आपल्या करिअरची सुरुवात जळगाव या शहरातून केली. आता ते महाराष्ट्र सरकारच्या वतीने मोठ्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून जबाबदारी निभावतात. ते आरोपी आणि आरोप असलेल्या व्यक्तिविरोधात असलेल्या खटल्यामध्ये सरकारी बाजू कमी पडणार याची काळजी घेतात.
सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यामध्ये महत्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. आजपर्यंत उज्वल निकम यांना 168 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उज्वल निकम यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले उज्वल निकम हे पहिलेच कायदेतज्ज्ञ आहेत. उज्वल निकम यांचे वडील देवराव निकम हे सुद्धा वकील आणि जज होते आणि आई गृहिणी.
आतापर्यंत त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या प्रत्येक खटल्यामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली आहे. आज आपण खासरेवर जाणून घेऊया उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम केलेले सहा मोठे खटले खासरेवर.
1. 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला-
उज्वल निकम यांच्या यशस्वी वाटचालीस सुरुवात याच खटल्यापासून झाली. 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट च्या प्रकरणाची सुनावणी करताना टाडा न्यायालयाने अबू सालेम व करीमुल्लाह शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून याच खटल्यापासून सुरुवात केली होती.
2. गुलशन कुमार मर्डर केस-
12 ऑगस्ट 1997 रोजी बॉलीवूड चे प्रसिध्द निर्माते गुलशन कुमार यांची गोळी झाडून हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात संगीतकार नदीम यांना दोषमुक्त केले होते.
3. प्रमोद महाजन यांची हत्या-
भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री प्रमोद महाजन यांची हत्या 22 एप्रिल 2006 ला त्यांचे लहान भाऊ प्रवीण महाजन यांनी केली होती. या प्रकरणात प्रवीण यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
4. अजमल कसाब केस-
26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर मोठा आतंकवादी हल्ला झाला होता. जवळपास 3 दिवस आतंकवादी व पोलिसांमध्ये संघर्ष चालू होता. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले होते. 26/11 च्या दहशतवादी खटल्यामध्ये निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा ठोठावण्यात ते यशस्वी ठरले होते.
5. शक्ती मिल्स गँगरेप केस-
2013 साली ऑगस्ट महिन्यात 22 वर्षीय एक फोटो पत्रकारावर पाच लोकांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी तिघा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
6. कोपर्डि प्रकरण
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५) याला अत्याचार व खूनाच्या आरोपाखाली दोषी धरत येथील सत्र न्यायालयाने बुधवारी (वय २९) फाशीची शिक्षा सुनावली. तर संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) यांचा या कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. न्यायालयाने आज पप्पू शिंदे याला अत्याचार, खून व बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार (पोक्सो) दोषी धरले. दोष सिद्ध झाल्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांना कट रचणे, गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणे या कलमांखाली दोषी धरण्यात आले. त्यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका….
वाचा उज्वल निकम यांचा जिवनप्रवास…