इच्छाशक्ती पुढे आकाश हि ठेंगणे आहे हे सिद्ध कलकत्ता येथील रिक्षावाला सत्येन दास यांनी करून दाखविले आहे. त्याने केलेलं कामही साधेसुधे नाही तर चांगल्या चांगल्याना जमणार नाही असे आहे. ३००० किमीचा प्रवास ६० दिवसाची पायपीट करत तो लद्दाखला स्वतःच्या रिक्षाने पोहचणारा पहिला माणूस ठरला आहे. चला तर खासरेवर सत्येन दास यांचा हा साहसी प्रवास बघूया…
या प्रवासाची सुरवात झाली ११ जून रोजी कलकत्ता येथून तब्बल ६८ दिवसाचा हा प्रवास त्याने झारखंड- उत्तर प्रदेश- श्रीनगर- कारगिल- खरदुंगला करत तो १७ ऑगस्ट रोजी लदाख येथे पोहचला. ४४ वर्षीय सत्येन दास सांगतो “जेव्हा मी पठाणकोट मध्ये गेलो तेव्हा लोकांनी माझ्या भोवताल गर्दी केली. कारण होते त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात खराखुरा रिक्षा बघितला नव्हता.”
सत्येनला प्रवास करायचा होता परंतु आर्थिक परिस्थिती बेताची होती म्हणून त्याने मदत गोळा करायला सुरवात केली. तेव्हा त्याला नाकतला अग्रणी क्लब कलकत्ता तर्फे ८०,००० रुपयाची मदत देण्यात आली. क्लबचे लोक सांगतात कि त्यांना सत्येनची जिद्द त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती त्यामुळे आम्ही सत्येनला या प्रवासाकरिता मदत केली. त्याने या पैशात त्याच्या रिक्षामध्ये काही बदल केले त्यामुळे त्याचा प्रवास थोडा सोपा झाला. सत्येन सांगतो कि यात्रेतील सर्वात कठीण भाग हा होता कि त्याला खरदुंगला येथे १७,५८२ फुटापर्यंत रिक्षा चढवाव लागला. परंतु वर गेल्यावर खाली दिसणारा नजारा हा अतिशय मनमोहक होता. हे दृश्य बघून त्याला झालेला सर्व त्रास शरीराततून निघून गेला असे तो सांगतो.
प्रवासा दरम्यान अनेक लोक त्याला थांबवून त्याच्या सोबत सेल्फी काढत होते तेव्हा त्याला प्रेरणा मिळायची असा तो सांगतो. रोज ४० ते ५० किमी प्रवास करायचा हे त्याने ठरविले होते. आणि मुक्काम तो नेहमी मंदिर अथवा मस्जिद मध्ये करत असे कारण इथे त्याला सुरक्षित वाटत असे. सत्येन दास ला हा प्रवास का केला या मागचा उद्देश विचारला असता तो सांगतो कि “रिक्षा हे इको फ्रेंडली वाहन आहे हे सर्वाना सांगण्या करिता मी हा प्रवास केला” असा तो सांगतो..
सत्येन दासला खासरे तर्फे सलाम.. माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
वाचा ख-या प्रेमास भेटण्याकरीता त्याने केला ८ देशाचा सायकलने प्रवास…