भारतीय लोकशाहीमध्ये कायदा आणि न्यायप्रणालीला अनन्यसाधारण महत्व आहे. वकील म्हणजे न्यायप्रणालीचा चेहरा होय. एक वकील म्हणून विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी मोलाचे कार्य केले आहे. वकिलीतील त्यांच्या हातखंड्यामुळे अनेक निरपराधांना न्याय मिळाला असून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली आहे. अॅड. निकम यांची कामकाजाची पध्दत, बोलण्याची शैली आणि शेरोशायरी हे प्रसिद्ध आहे. गुन्हेगाराला कोर्ट शिक्षा देतेच पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा व्हायला नको, हे तत्त्व उज्ज्वल निकम यांनी आचरणात आणले आहे. त्यामुळे ते गुन्हेगारांना शिक्षा मिळावी यासाठी करावे लागणारे परिश्रम मिळणार्या धमक्या. अशातही ते मोठ्या धैर्याने उभे राहातात. तर आज आपण खासरेवर उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास बघणार आहोत..
उज्वल निकम यांचे वडील देवरावजी निकम मालेगाव येथील प्रसिद्ध वकील होते. उज्वल निकम यांचा जन्म ३० मार्च १९५३ रोजी मालेगाव येथे झाला आहे. बीएससीचे शिक्षण पूर्ण झाल्यानतर त्यांनी जळगाव येथेच वकिलीची पदवी मिळवली आणि जिल्हा न्यायालयात आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. त्यांची ओळख क्रिमिनल लॉयर म्हणून आहे. उज्वल निकम हे भारतातील एकमेव वकील आहे ज्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे कारण हि तसेच आहे त्याच्या कडे भारतातील सर्वात मोठ्या केस असतात. उज्वल निकम यांच्या सभोवताल ४७ शस्त्रधारी कमांडो नेहमी असतात. मागील वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कारहि देण्यात आला आहे.
कोर्टात नेहमी मोठमोठे युक्तिवाद करण्याकरिता उज्वल निकम प्रसिद्ध आहेच तर त्या सोबत ते एक शीघ्रकवी सुध्दा आहेत. कोर्टात त्यांनी केलेली शेरोशायरी किंवा चारोळ्या सर्वाचे लक्ष वेधून घेते. स्वतःच्या लग्नात तर साहेबांनी चक्क दीड पानाचा उखाणा म्हटला होता नाही का भन्नाट ह्या उखाण्याची सुरवात खालील प्रमाणे होती ”नाव घेण्यासाठी माझा कधीच नसतो बहाणा ज्योतीच्या नावाचा सहज होतो उखाणा…” अॅड. निकम यांच्या लग्नाची गोष्टहि तशी निराळीच आहे. एका नातेवाइकाच्या लग्नात उज्वल यांच्या आईने ज्योती परव यांना बघितले आणि त्या त्यांच्या पसंदित पडल्या. आईची पसंद निकम साहेबांना चांगलीच माहित होती त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. दोघांचा साखरपुडा झाला परंतु ८०च्या दशकात संपर्काची साधने नव्हती त्यामुळे या दोघांनी निवडला पत्रव्यवहार आणि नेहमी हे दोघे पत्राच्या रुपात एकमेकाच्या सम्पर्कात राहत असे. साखरपुडा झाल्यानंतर तब्बल ६ महिन्यांनी त्यांचे लग्न झाले तारीख ५ फेब्रुवरी १९८० हि होती.
उज्वल निकम यांचे घर म्हणजे मोते संयुक्त कुटुंब आहे. आणि त्यांच्या पत्नीचे घर म्हणजे हम दो हमारे दो बस… परंतु ज्योती यांनी लवकरच ह्या सर्व जवाबदार्या अंगावर घेतल्या आणि समर्थपणे आत्ताहि सांभाळत आहेत. निकम दांपत्याला शर्वरी ही पहिली मुलगी झाली. हा क्षण त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता. शर्वरी नंतर या दांपत्याला अनिकेत हा मुलगा झाला.
विशेष सरकारी वकील पदावर निकम यांची नियुक्ती झाली आणि मुंबई जळगाव असा प्रवास सुरु झाला. निवडीनंतर प्रचंड कामाच्या ताणातहि संयुक्त कुटुंबास कधीहि तडा जाऊ दिला नाही. ते सोमवार ते शुक्रवार आपली ड्युटी मुंबई येथे पूर्ण करायचे आणि शनिवार व रविवार जळगावला येत असे. पत्नीनेही त्यांच्या पतीच्या यशात कधी अडथळा आणला नाही त्याची बाजू नेहमी समजून घेतली. त्यांना माहिती होते कि आपल्याला दिलेल्या वेळापेक्षा वकील साहेब करत असलेली काम मोठी आहेत. १९८९ मध्ये त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली. त्यांचा पहिला गाजलेला खटला आहे इंदुबाई खून प्रकरण होय. १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील पदावर नेमणूक झाली. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची ही सुरुवात होती. १४ वर्षे चाललेल्या या खटल्यात १२९ आरोपीपैकी १०० जण दोषी ठरले. प्रत्येक खटल्याच्या मुळाशी जाऊन काम करण्याच्या सवयी आणि भक्कम पोलिस तपास यामुळे त्यांना प्रत्येक खटल्यात यश मिळत गेले.
कामानिमित्त उज्वल निकम यांना विविध टिकाणी जावे लागते ते सांगतात कि अशावेळी त्यांना एका गोष्टीची कायम आठवण येते. ते म्हणजे ज्योती यांनी तयार केलेले मासे. घरी आल्यानंतर ज्योती या आवर्जून त्यांच्यासाठी मासे तयार करतात. लग्नाचा वाढदिवस, उज्ज्वल यांचा वाढदिवस किंवा इतर काही कार्यक्रम असल्यास ज्योती हमखास गिफ्ट घेतात. पत्नीने दिलेले कोणतेही गिफ्ट उज्ज्वल यांना आवडते. ज्योती यांनी दिलेल्या अनेक वस्तू उज्ज्वल यांनी जपून ठेवल्या आहेत. मुलगी शर्वरी हिच्यावर उज्ज्वल यांचा खास जीव आहे असे ज्योती सांगतात. शर्वरीचे एमबीए झाल्यानंतर नोव्हेंबर २००८ मध्ये तिचा विवाह गोव्यातील महेश खलप यांच्या सोबत झाला.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयाने दोषी ठरविले आहे उद्या त्यांना शिक्षा मिळणार याचे सर्व श्रेय जाते सरकारी वकील उज्वल निकम यांना खासरे तर्फे वकील साहेबांना सलाम… माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
११ भारतीय सिरियल किलर च्या गोष्टी ज्या वाचून आजही तुमच्या अंगावर काटे येतील.
Comments 1