माणसाच्या शरीराला तसं बघायला गेलं तर आजारांचे घर मानले जाते. कारण मनूष्याच्या शरीरातून एक आजार गेला की दुसरा येतो. आणि हे तेव्हा घडते जेव्हा आपण आपल्या आरोग्याकडे व खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आपल्या जेवणात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात हे जाणून घेण्यासाठी वाचा खालील खासरे माहिती.
मित्रांनो मनुष्य हा आपल्या जीवनात 2 गोष्टींवर सर्वात जास्त ध्यान देतो, एक म्हणजे आपला परिवार आणि पैसा. पैसे कमावण्यासाठी एवढे कष्ट आणि पळापळ करतो की तो विसरून जातो की आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी करायला हवी. ही गोष्ट सर्व जणांना माहिती असते की आरोग्य चांगले असेल तर पैसे कमावण्याचा फायदा, पण आश्चर्याची बाब म्हणजे याकडे लक्ष कोणीच देत नाही. जास्तीत जास्त लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग बऱ्याच आजारांना निमंत्रण देतात.
जाणून घेऊया काय आहे अल्कलाईन डायट प्लॅन-
माणसाच्या शरीराचा नैसर्गिक स्वभाव हा अल्कलाईन आहे, परंतु आपण आपल्या जीवनशैली मुळे या स्वभावात एवढे बदल केले आहेत की आपल्या शरीराचे बरेच अवयव वेळेच्या अगोदरच खराब होत आहेत. ज्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अगदी कमी वयात हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, डायबिटीस, अत्याधिक वजन, किडनी फेलिअर, स्ट्रोक, कॅन्सर सारख्या गंभीर आजारांची लागण होत आहे. अगोदरच्या काळात 60 वर्षे झाले तरी लोकांना म्हातारपण जाणवत नसे. पण आताच्या तरुणांमध्ये वयाच्या चाळिशीतच ते जाणवत आहे व 60 वर्षात तर अनेक जण हे जग सोडून जात आहेत. या आजारांच्या मूळ कारणाला आपण नष्ट केलं तर आपण आपलं आरोग्य चांगले सांभाळू शकतो.
खाली दिलेल्या व्हिडीओद्वारे जाणून घेऊया अल्कलाईन डायट चार्ट काय आहे आणि याचे शरीरासाठी कसे फायदे आहेत-
जसं जसं वातावरणात बदल होतात तसे आपल्या शरीरात विविध आजारांची लग्न होण्याची शक्यता असते. परंतु पण जर चांगल्या प्रकारे आरोग्याची काळजी घेतली तर सर्व आजारांना दूर ठेवू शकतो. लोकांचे मत असते की बारीक शरीराच्या व्यक्तींना जास्त आजार होतात, पण असे काही नाहीये. जर व्यवस्थित व्यायाम केला, डायट पाळले तर आजारांना दूर ठेवू शकतो.
खाली दिलेल्या काही भाजीपाल्याच्या फायद्याविषयी जाणून घेऊया. ज्यामुळे आरोग्य सुद्धा उत्तम राहते आणि बऱ्याच आजारांना दूर ठेवण्यास मदत मिळते-
भारतात हिरव्या भाज्यांचे नाव घेताच सर्वांच्या तोंडाला पाणी येते. आपली नियमित आहारात आलू टमाटे तर हमखास असतात. पण थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाव्यात ज्यामुळे बरेच फायदे आरोग्यास होतात. जाणून घेऊया हिरव्या पालेभाज्या खाण्याचे काही फायदे-
1. हिरव्या पालेभाज्या खाण्याने शरीरात व्हिटामिन B ची कमतरता जाणवणार नाही. आणि रोज हिरव्या पालेभाज्या खाल्याने आपली त्वचा अधिक सुंदर आणि आकर्षक बनते.
2. नियमितपणे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने आपली नजर वाढते आणि हाडे सुद्धा मजबूत होतात.
3. हिरव्या भाज्याने शुगर कंट्रोल मध्ये राहते. याशिवाय मुळ्याच्या पानाची भाजी खाल्यास सर्दीपासून बचाव होऊ शकतो.
4. हिरव्या भाज्या ह्रदयाचे विकार असणाऱ्या व्यक्तींसाठी खूप फायद्याच्या असतात, यामुळे रक्त वाहिन्या स्वस्थ राहतात.
5. हिरव्या भाज्या खाल्याने ब्लडर कॅन्सर होण्याचा धोका टळतो.
6. हिरव्या भाज्या खाल्याने आपल्याला चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन A व फलीक ऍसिड भेटते. व्हिटॅमिन A डोळ्यांसाठी तर फलीक ऍसिड हे हिमोग्लोबिन साठीफायद्याचे असते.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: रात्रीची झोप पुर्ण होत नसेल तर होऊ शकतात हे आजार…
Comments 1